मासे ३६) घोये

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2011 - 13:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घोये मासे७-८ किंवा त्याचापेक्षा जास्त.
हळद पाव चमचा
मसाला ७ चमचा
मिठ गरजे पुरते
तेल तळण्यासाठी
थोडा लिंबू रस (ऑप्शनल)
आले-लसुण वाटण (ऑप्शनल)

पुर्वीच्या काळच्या लेंग्यासारखे वाटतात ना ? Lol

क्रमवार पाककृती: 

माश्यांचे शेपुट, पर, खवले काढावीत.
पोटाच्या जागेवर चिर पाडून आतली घाण काढून मासे ३ पाण्यांमधून स्वच्छ धुवुन घ्यावेत.
धुतलेल्या माश्यांना मिठ, हळद, मसाला आणि हवा असल्यास थोडा लिंबाचा रस किंवा आले, लसूण चे वाटण चोळून थोडा वेळ ठेवावे.

गॅसवर तवा गरम करून त्यात तेल सोडून मासे तव्यावर अलटी- पलटी करून खरपूस तळावेत.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

घोये मासे हे खाडीत जास्त प्रमाणात मिळतात.
तसे चविला चांगले असतात पण थोडे काटेरी असतात.
हे मासे शक्यतो तळूनच चांगले लागतात.
रस्सा करायचा झाल्यास इतर माश्यांच्या रश्याप्रमाणे करावा.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा बर्‍याच दिवसांनी आले मासे ! तळलेले भारी दिसतायत..

गर्दीत्_त्याचे_सौंदर्य्_नीट्_दिसत_नाहीय्ये. >>>> जागूच्या रेसिप्यांमधल्या माश्यांचं सौंदर्य वगैरे कुठे शोधताय.. चव घ्यायचं बघा.. Happy

>>पुर्वीच्या काळच्या लेंग्यासारखे वाटतात ना ?>> Proud पक्क्या मासेखाऊंना जागूची फाको दिसलीच नाही.
जाऊ देत जागू, मी वाचली.

पुर्वीच्या काळच्या लेंग्यासारखे वाटतात ना ?>>> Lol लेंगे जरुर लेंगे
लेंगे असो नाहीतर काष्टा की फरक पैंदा ! मासे बघुन तोंपासु !

पक्क्या मासेखाऊंना जागूची फाको दिसलीच नाही. जाऊ देत जागू, मी वाचली. >>> मी पण वाचली Lol अगदी गिरगाव पंचे डेपोतलं लेंग्याचं कापड Proud

अलटी- पलटी करून खरपूस तळावेत.>> positivo1.gif अगदी अगदी..!!

'लेंगामासा' मस्तय दिसायला... Happy

(जागुतै, घोळीची रेसिपी टाक न)

घोये मासे ...मि तर हे पहिल्यान्दाच पाह्तिये...पुण्यात मिळत नसतिल का?

दिनेशदा परत मिळाले की काढेन स्वतंत्र फोटो.

पराग, सायो, वर्षू, नूतन, श्री, अश्विनी, अनुसया धन्यवाद.

चातक हा बाहुला कितव्या नंबरच्या आवडीचा ?

अनुसुया आता एकदा मला पुण्याच्या मच्छीमार्केट मध्ये यावच लागेल.

साती खाडीतले सगळेच मासे टेस्टी असतात नाहीका ?

दक्षे आता नजर काढायला लागेल सगळ्या लेंगाफिशची.