उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

Submitted by जिप्सी on 14 November, 2011 - 23:16

भाग १ —
कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

===============================================
===============================================
ठरल्याप्रमाणे शनिवारी ५ तारखेच्या रात्री निघुन पहाटे बेळगावात पोहचलो. मित्राचे घर बेळगावपासुन साधारण ४० किमी अंतरावरील खानापूर तालुक्यातील गुंजी या गावात होते. आंघोळ, नाश्ता करून तासभर विश्रांती घेऊन लगेचच बेळगाव परीसरातील भटकंती केली.

राजहंस गड
बेळगाव जिल्ह्यातील येल्लुर गावी असलेल्या या किल्ल्याला येल्लुरगड असेही म्हणतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याकडील पोर्तुगीज व कोकणातील जंजिर्‍याच्या हबशांच्या फौजावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकण व गोवा सरहद्दीजवळ असणा‍र्‍या अनेक किल्ल्यांचा खुबीने उपयोग करून घेतला होता. चंदगड तालुक्यात असणारा कलानंदीगड व महिपाळगड, बेळगांव तालुक्यातील राजहंसगड, खानापूर तालुक्यातील भीमगड, पारगड, गडहिंग्लज तालुक्यातील सामनगड, हिक्केरी तालुक्यातील वल्लभगड, आणि सौंदती तालुक्यातील पारसगड या आठ गडांचा उपयोग छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला होता. या प्रत्येक गडावरून दुसरा गड दृष्टिपथात येत असल्याने एका गडावरून दुसर्‍या गडावर सांकेतिकपणे संदेश देणे सहज शक्य होत असे [ संदर्भ: वल्लभगड, विकिपिडीया]. याव्यातिरीक्त किल्ल्यासंबंधी जास्त काही माहिती नाही.
या किल्ल्यावर "बॉक्साईट" सापडल्याने खोदकाम चालु आहे अशा बातम्या सध्या स्थानिक वर्तमानपत्रात वाचावयास मिळत आहे. Sad

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
कमल बस्ती (बेळगाव किल्ला)
शहराच्या मध्यभागी असलेला हा परीसर मिलिट्रीच्या ताब्यात आहे. एक तटबंदी सोडल्यास किल्ला म्हणावा असा आतील परीसर वाटला नाही. सुरूवातीलाच दूर्गामातेचे एक सुंदर मंदिर आहे. तेथे स्थानिक लोक लिंबाच्या सालीत दिवे लावून ते देवीला अर्पण करत होते (फोटो काढण्यास बंदी :(). येथुनच थोडे पुढे जैन समुदायाचे भगवान पार्श्वनाथाचे एक सुंदर मंदिर आहे, हेच कमल बस्ती. १२०४ सालातील चालुक्य शैलीतील हे मंदिर आहे. मुख्यमंडपात छतावर कोरलेले एक भव्य आणि अतिशय देखणे "कमळ" पाहण्यासारखे आहे. यावरूनच याला कमलबस्ती हे नाव पडले असे सांगण्यात आले (फोटो काढण्यास बंदी :(). हे मंदिर उत्तम वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे.

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
मलप्रभा नदीकिनारीचे गाव "असोगा"
तुम्हाला "अभिमान" चित्रपटातील "नदिया किनारे हे राई, आई कंगना, ऐसे उलझ गए, अनाडी सजना"
हे जया भादुरीवर चित्रीत केलेले गीत आठवतंय का? या संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण मलप्रभा नदिकिनारी असलेल्या या भागात केले आहे. अतिशय निसर्गरम्य आणि शांत असा हा परीसर खानापूर रेल्वेस्टेशनजवळ आहे. नदीच्या पाण्यात विकएण्ड साजरा करण्याकरीता सध्या येथे पर्यटकांची भरपूर गर्दी असते. येथील प्रसिद्ध शंकर मंदिराच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे.
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
बेळगावातील प्रसिद्ध मिलिटरी महादेव मंदिर आणि परीसर

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
खानापूरजवळील एक धरण

प्रचि २४

प्रचि २५
कणबर्गी
मायबोलीकर म्हमईकर यांनी आवर्जुन पहा असे सुचवलेले, बेळगाव - गोकाक रस्त्यावरील (बेळगावपासुन साधारण १० किमी अंतरावर) हे एक शांत आणि निसर्गरम्य महादेवाचे मंदिर. एका टेकडीवर हे मंदिर वसले आहे. सध्या या मंदिरात आणि पूर्ण टेकडीवरच भरपूर मधमाशा आणि मधाची पोळी असल्याने आम्हाला वर मंदिरात न जाण्यास एका पहारेकर्‍याने सांगितले. येथे एकाच नारळाला तीन फांद्या फुटल्याचे त्याने दाखवले. या चमत्काराला आणि माडाच्या झाडाला "ब्रह्मा, विष्णु आणि महेश" असे संबोधतात.

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
माडाचे झाड
प्रचि ३०
गुंजी गावातील श्री माऊली देवीचे मंदिर

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

बेळगाव फिरून फिरून दमला कि वो, तवा खाऊनच सोडा म्हणतो कि मी .......कुंदा, पेढे आणि कर्दंत वो. काय समजलेत Proud

बेळगावातील प्रसिद्ध "कुंदा"
प्रचि ३४
प्रसिद्ध "धारवाडी पेढे"
प्रचि ३५
गोकाकचा प्रसिद्ध "कर्दंत"
प्रचि ३६
(क्रमश:)

गुलमोहर: 

प्रचि ९ - फोटोशॉप्ड आहे का...नसेल तर कापर रंग मिळालेत...
बैलगाडीचा फोटो तर उच्च आलाय आणि पेढ्यांचा पण...
साखरेचा क्रिस्पीपणा उतरलाय फोटोत मस्तपैकी

मिलिटरि महादेव मंदिर तर आमच फेव्हरेट....खूप वर्षानि तुमचा फोटोतून बघायला मिळाल.खूप छान वाटल.
चोठस प्राणी संग्रहालय अजून होत का जेव्हा तुम्ही गेला होता ??

एक सांगावेसे वाटते, हिक्केरी नाहि हुक्केरी तालुका आहे तो.माझ जे मूळ गाव आहे तिथुन २० किमि वर Happy

जिप्सी कय सुन्दर फोटो!किति नॉस्टीलजिक केलत.इतक सुन्दर आहे अम्च्या बेळ्गाव्चा परिसर्?घरकि मुरगी डल बराबर सारख झाल होत.तुम्च्या फोटोनी सौंदर्य उलगडुन दाखवल.लहानपणापासुन्च्या किति किति आठवणी.सगळ्यांशि निगडित.असोग्याला शिवरात्रिला जत्रा भरते.शाळेत असताना खानापुरहुन चालत जायच.तांदुळ दाळ वगैरे घेऊन तिथ चुल मांडून स्वयन्पाक करायचा.दिवसभर रहायच पाण्यात डुंबायच,प्रची १८ मध्ये कुण्ड दिस्त तिथ खाली पींड आहे.त्याला हात लावायचा.कोणि पाहुणे आले की असोगा ठरलेल.आता रस्ता आहे. पुर्वि नव्हता.अभिमान्च्या शुटींगला तर गाव लोटलेल. त्यावेळि जया अमिताभच लग्न व्हायच होत.अजुन.गुन्जिचि जत्रा भरते. तेंव्हाही ट्रक्म्धुन ३०/४० लोक जायचे.आता भर्पुर वाहन झालि.गुन्जिहुन सायकलवर मुल शाळेला यायची.इतक्या छोट्या छोट्या गोष्टित आनंद असायचा..... बाप रे आठवणी थांबत नाहित.लिहिण्याचा वेग कमी पड्तोय.धन्यवाद.आम्चा सुन्दर परिसर आम्हाला आणि दाख्व्ल्याअद्दल आणि इतराना दाखवल्याबद्दल.

Pages