उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

Submitted by जिप्सी on 14 November, 2011 - 23:16

भाग १ —
कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

===============================================
===============================================
ठरल्याप्रमाणे शनिवारी ५ तारखेच्या रात्री निघुन पहाटे बेळगावात पोहचलो. मित्राचे घर बेळगावपासुन साधारण ४० किमी अंतरावरील खानापूर तालुक्यातील गुंजी या गावात होते. आंघोळ, नाश्ता करून तासभर विश्रांती घेऊन लगेचच बेळगाव परीसरातील भटकंती केली.

राजहंस गड
बेळगाव जिल्ह्यातील येल्लुर गावी असलेल्या या किल्ल्याला येल्लुरगड असेही म्हणतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याकडील पोर्तुगीज व कोकणातील जंजिर्‍याच्या हबशांच्या फौजावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकण व गोवा सरहद्दीजवळ असणा‍र्‍या अनेक किल्ल्यांचा खुबीने उपयोग करून घेतला होता. चंदगड तालुक्यात असणारा कलानंदीगड व महिपाळगड, बेळगांव तालुक्यातील राजहंसगड, खानापूर तालुक्यातील भीमगड, पारगड, गडहिंग्लज तालुक्यातील सामनगड, हिक्केरी तालुक्यातील वल्लभगड, आणि सौंदती तालुक्यातील पारसगड या आठ गडांचा उपयोग छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला होता. या प्रत्येक गडावरून दुसरा गड दृष्टिपथात येत असल्याने एका गडावरून दुसर्‍या गडावर सांकेतिकपणे संदेश देणे सहज शक्य होत असे [ संदर्भ: वल्लभगड, विकिपिडीया]. याव्यातिरीक्त किल्ल्यासंबंधी जास्त काही माहिती नाही.
या किल्ल्यावर "बॉक्साईट" सापडल्याने खोदकाम चालु आहे अशा बातम्या सध्या स्थानिक वर्तमानपत्रात वाचावयास मिळत आहे. Sad

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
कमल बस्ती (बेळगाव किल्ला)
शहराच्या मध्यभागी असलेला हा परीसर मिलिट्रीच्या ताब्यात आहे. एक तटबंदी सोडल्यास किल्ला म्हणावा असा आतील परीसर वाटला नाही. सुरूवातीलाच दूर्गामातेचे एक सुंदर मंदिर आहे. तेथे स्थानिक लोक लिंबाच्या सालीत दिवे लावून ते देवीला अर्पण करत होते (फोटो काढण्यास बंदी :(). येथुनच थोडे पुढे जैन समुदायाचे भगवान पार्श्वनाथाचे एक सुंदर मंदिर आहे, हेच कमल बस्ती. १२०४ सालातील चालुक्य शैलीतील हे मंदिर आहे. मुख्यमंडपात छतावर कोरलेले एक भव्य आणि अतिशय देखणे "कमळ" पाहण्यासारखे आहे. यावरूनच याला कमलबस्ती हे नाव पडले असे सांगण्यात आले (फोटो काढण्यास बंदी :(). हे मंदिर उत्तम वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे.

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
मलप्रभा नदीकिनारीचे गाव "असोगा"
तुम्हाला "अभिमान" चित्रपटातील "नदिया किनारे हे राई, आई कंगना, ऐसे उलझ गए, अनाडी सजना"
हे जया भादुरीवर चित्रीत केलेले गीत आठवतंय का? या संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण मलप्रभा नदिकिनारी असलेल्या या भागात केले आहे. अतिशय निसर्गरम्य आणि शांत असा हा परीसर खानापूर रेल्वेस्टेशनजवळ आहे. नदीच्या पाण्यात विकएण्ड साजरा करण्याकरीता सध्या येथे पर्यटकांची भरपूर गर्दी असते. येथील प्रसिद्ध शंकर मंदिराच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे.
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
बेळगावातील प्रसिद्ध मिलिटरी महादेव मंदिर आणि परीसर

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
खानापूरजवळील एक धरण

प्रचि २४

प्रचि २५
कणबर्गी
मायबोलीकर म्हमईकर यांनी आवर्जुन पहा असे सुचवलेले, बेळगाव - गोकाक रस्त्यावरील (बेळगावपासुन साधारण १० किमी अंतरावर) हे एक शांत आणि निसर्गरम्य महादेवाचे मंदिर. एका टेकडीवर हे मंदिर वसले आहे. सध्या या मंदिरात आणि पूर्ण टेकडीवरच भरपूर मधमाशा आणि मधाची पोळी असल्याने आम्हाला वर मंदिरात न जाण्यास एका पहारेकर्‍याने सांगितले. येथे एकाच नारळाला तीन फांद्या फुटल्याचे त्याने दाखवले. या चमत्काराला आणि माडाच्या झाडाला "ब्रह्मा, विष्णु आणि महेश" असे संबोधतात.

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
माडाचे झाड
प्रचि ३०
गुंजी गावातील श्री माऊली देवीचे मंदिर

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

बेळगाव फिरून फिरून दमला कि वो, तवा खाऊनच सोडा म्हणतो कि मी .......कुंदा, पेढे आणि कर्दंत वो. काय समजलेत Proud

बेळगावातील प्रसिद्ध "कुंदा"
प्रचि ३४
प्रसिद्ध "धारवाडी पेढे"
प्रचि ३५
गोकाकचा प्रसिद्ध "कर्दंत"
प्रचि ३६
(क्रमश:)

गुलमोहर: 

जिप्सी, अरे इथे चोंबडेगिरी म्हण हवे तर, पण सांगायचा मोह आवरत नाहीये. मा. आबु ला दिलवाडा मंदीरातील १००० वर्षापुर्वीचे कोरीव काम अप्रतिम आहे. फोटो नाही काढता येत. पण तुझ्या सारख्या कलारसिकाला सांगावेसे वाटले म्हणुन सांगितले :).
आधिच पाहीले असल्यास पोस्ट दुर्लक्षित करणे.

तू डोळे मिटून जरी फोटो काढलेस ना तरी ते अप्रतिमच येणार....... त्यामुळे फोटोज ना काही विशेषण (सुंदर, अप्रतिम...) देऊ शकत नाही Happy Happy Happy ...... यावर कडी म्हणजे माहितीही छान...
फक्त एकच तक्रार - ते पेढे, कुंदा, कर्दंत असे तोंपासु फोटो टाकत जाऊ नको रे Happy Happy Happy .......

मित्रा...भन्नाट फोटो काढतोस यार तु... या वेळी भारतात आलो कि तुझ्या कडे "शिकवणी" लावणार आहे... गुरुदक्षिणा काय घेणार बोल Wink

छान

मस्तच फोटो... माऊली देवी मंदिर आणि बैल गाडी च्या फोटो मधलं वतावरण मस्त वाटतय.. एकदम पावसळ्या सारख...कुंदा तर काय सांगु.... नाश्ता करतात तसा खाल्ला Happy सॉलिड टेस्टि!!! आणि कर्दंत सुध्धा... Happy

प्रचि ३३... सुपर्ब!!

योग्या तुझे फोटो म्हणजे मेजवानीच जणू.. भन्नाट, अप्रतिम, अतिसुंदर वगैरे वगैरे Happy

अरे जिप्सी.. राजहंसगड बघताना उन खूपच जास्त होते असे दिसतेय..
बाकी फोटोसहीत माहिती छान.. तुझ्यामुळे फुकट सफर होते रे.. Happy
बैलगाडी.. क्लास काढला आहेस..

जिप्स्या, सगळे भारी फोटु रे.
रोज इकडे येता आल नाही तरी सगळे फोटोचे धागे बघतो मी.
तुझं फ्रेमिन्ग जबरी आहे. तु काढलेले सगळे फोटु मला आवडतातच. Happy

जिप्सी, फोटो, माहिती नेहमीप्रमाणेच... सुंदरच !
पेढे, कुंदा पाहून तोंडाला खरेच पाणी सुटले... Happy

Pages