आप्पे / येलापे

Submitted by प्रिति १ on 7 November, 2011 - 07:03

आप्पे / येलापे ;-

लागणारा वेळ ; ४० मिनिटे.

लागणारे जिन्नस ;- १ वाटी उडीद डाळ, १ वाटी तांदुळ, १/२ वाटी पातळ पोहे, थोडी कोथींबीर, १ चमचा हरभरा
डाळ, थोडे नारळाचे काप., १ ईंच आले, १ मिरची.थोडे मीठ.

चटणीसाठी ;- १/२ नारळ, १ चमचा पंढरपुरी डाळ, ४-५ हिरव्या मिरच्या, १ बुटुक चिंच, मीठ, चवीला थोडी साखर.

कॄती ;- आदले दिवशी सकाळी उडीद डाळ आणि तांदुळ भिजत घालावेत. रात्री ते बारीक वाटुन घ्यावेत.
वाटताना त्यातच १/२ वाटी पोहे मिक्स करावेत. मग सकाळी त्यात थोडी कोथींबीर घालावी. व १ ईंच आल्याचा
तुकडा आणि १ मिरची वाटुन घालावी. व मीठ घालावे.

त्यात आपण तयार केलेले नारळाचे काप आणि हरभरा डाळ घालावी. नंतर आप्याच्या तव्यात थोडे थोडे तेल घालुन ते मिश्रण घालुन मंद गस वर झाकुन ठेवावे. ३-४ मिनिटांनी ते उलटे करुन परत ३-४ मिनिटे ठेवावेत. मग ते चटणी किंवा सौस बरोबर खाण्यासाठी तयार .

चट्णी ;- वर दिलेले सगळे जिन्नस वाटुन त्याची चटणी करावी. वाटताना अंदाजाने थोडे पाणी घालावे

कधी कधी बदल म्हणुन तांदळाच्या ऐवजी बाकीच्या डाळी आणि बारीक रवा घालुन पण आप्पे करु शकतो. करायला अतिशय सोपा आणि चवीला छान व लवकर होणारा असा हा पदार्थ आहे.

वरील प्रमाणात साधारण ४० ते ४२ आप्पे होतात.

माहितीचा स्त्रोत :- आई.
पीठ ;-
1.JPG

आप्प्याचा तवा
2.JPG

खोबर्याच्या कातळ्या /काप
3.JPG

गॅस वर ठेवताना
4.JPG

झाकण ठेवल्यावर
5.JPG

उलटुन ठेवलेले आप्पे
6.JPG

Ready to serve
7.JPG8.JPG

चटणी
9.JPG

खायला तयार ;-
10.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिती, फोटो मस्त आलेत ग. आप्पे चवीला पाठवून दे. म्हणजे कसे झालेत ते पण सांगेन म्हणते. Wink नाही काय असतं ग, प्रत्येकाने केलेल्या पदार्थाची चव निराळी असते ना? Proud

प्रिति१, हा लेख आहारशास्त्र आणि पाककृती विभागात हलवण्याची विनंती अ‍ॅडमिनांना केली आहे.
पुढच्या वेळेपासून आपल्या पाककृती याच विभागात लिहित चला, म्हणजे सगळ्या पाककृती एके ठिकाणी राहतील आणि वाचकांना शोधणे सोपे होईल.

वेताळ २५, जागोमोहनप्यारे ला अनुमोदन ; पंढरपुरी डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ. Happy
शोनु-कुकु, समु, दिनेशदा सगळ्यांना खुप खुप धन्स.;)
शोभा, घरी कधी येतेस? म्हणजे तुला आप्पे स्पेशल करुन घालीन बरं का..:) आणि फोटोची आयडिया तुझ्या
कडुनच ढापली.. (तुझे ते स्पेशल मोदक ).

मंजुडी, लेख पाककृती विभागात हलविण्याची विनंती बद्द्ल खुप धन्स.. मला खरं तर तिथेच पाठ्वायचा होता
पण पद्धत माहित नव्ह्ती.

kharech karayala sopa chaveela chan aahe ha padaarth...anumodan

दक्षिणा बहुतेक झाकण ठेवल्याच्या फोटुबद्दल म्हणत आहेत. झाकणात तबल्याचे प्रतिबिंब दिसते आहे.