सोपा केक..

Submitted by सुलेखा on 30 October, 2011 - 13:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

४ अंडी..
३/४ वाटी लोणी/बटर/साजुक तुप..
१ १/२ वाटी मैदा.
१ वाटी साखर..
१ १/४ टी स्पून [सपाट] भरुन बेकिंग पावडर..[वेकफील्ड/रेक्स कं]
चुटकीभर मीठ..
काजु,बदाम्,केक मधे घालायचे पपईचे रंगीबेरंगी पाकवलेले तुकडे निलोन्स कं चे मिळतात..हे विड्यात घालतात..त्याला हेमामालिनी असे ही म्हणतात
१टी स्पून एसेन्स..[वॅनीला,पायनाप्पल,किंवा कोणतेही.]
केक साठी अल्यु.चा डबा,,
केक भाजायला ओव्हन../बारीक वाळु.कढई,तवा

क्रमवार पाककृती: 

१] मैदा ,मैद्याच्या चाळणीने मीठ+बे .पा.घालुन ३ दा चाळुन घ्या..
२] मिक्सर मधे अंडी फोडुन घाला.एकदा मिक्सर मधुन फिरवुन घ्या..
३] त्यात क्रमाने लोणी/तुप ,साखर घालुन प्रत्येकी ३-४ वेळाफिरवुन घ्या.
३] एसेन्स घालुन एकदा फिरवा..
४]एका पातेल्यात/गंजात हे मिश्रण काढुन घ्या..
५]त्यात थोडा थोडा मैदा घालुन चमच्याने हे मिश्रण नीट मिक्स करा..
६]केक च्या भांड्याला आधी थोड्या तेलाचा [ १/४ टी स्पून]हात फिरवुन त्यावर मैदा भुरभुरवुन कोटींग करुन घ्या म्हणजे भाजलेला केक चिकटणार नाही..अलगद सुटेल..
७]केक मधे घालायच्या सुक्या मेव्याला पाव चमचा मैद्यामधे घोळवुन घ्या..
या ६ व ७ च्या स्टेप्स पुर्व तयारीत करा..
८]पातेल्यातल्या केक मिश्रणाला हळुवार केक च्या भांड्यात ओता..मिश्रणाची एक्सारखी सपाटी दिसली पाहिजे..सुकामेवा वरुन एक्सारखा पसरा..
९] १८० वर ओव्हन चे टेम्प.सेट करुन प्री-हीट करा..त्यात केक चे भांडे ठेवा.
१५ मिनिटाने केक भाजण्याचा वास येवु लागतो ..साधारण ४० मिनिटात केक तयार होतो.,,विजेचे बटन बंद करा..ओव्हन मधेच थंड करा..
जर इले.ओव्हन नसेल तर एका कढईत साधारण अर्धी भरेल इतकी वाळु तापवुन घ्यावी..एक तवा थोडा तापवुन घ्यावा..वाळु तापली कि त्यात केक चे भांडे मधे रोवुन ठेवावे..वरुन तापलेला तवा ठेवावा..पहिली ५ मिनिटे गॅस हायवर ठेवुन नंतर कमी करावा..साधारण २५ ते ३० मिनिटात केक तयार होतो..१५ मिनिटानीएक दोनदा तवा सरकवुन पाहावे ,,सुरी खुपसुन ती कोरडी बाहेर आली तर केक झाला असे समजावे..केक बाहेर काढुन थंड करावा..
कोंबट असताना सुरीने अलगद कडा सोडवुन प्लेट मधे काढावा..
१०]घरगुती केक तयार आहे..आपल्या कल्पनेप्रमाणे सजावट करा..आयसिंग करा..
.

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तितका..
अधिक टिपा: 

वाटीप्रमाण आहे..अजिबात चुकत नाही..मस्त केक तयार होतो..घरगुती आहे त्यामुळे सर्वांना पोटभर खाता येतो..
ड्रिंकिंग र्चॉकलेट+इंस्टंट कोफी घालुन चॉकोलेट केक तयार होतो..
स्ट्राबेरी तुकडे व त्याचाच एसेन्स घालुन स्ट्राबेरी केक तयार होईल..
अनुभवाने यात नवनवीन प्रयोग करता येतील..
मैदा मिक्सर मधल्या मिश्रणात थोडा थोडा घालुन मिक्सर मधेच मिक्स केला तरी चालेल..
त्यामुळे साधारण १० मिनिटात केक मिश्रण केक च्या भांड्यात टाकता येते..
केक भाजायला ठेवला कि लगेच मिक्सर चे भांडे थोडेसे पाणी व सर्फ घालुन फिरवुन घ्या ..स्वच्छ होईल वास जाईल..[साखर्+लोणी च्या चिकटामुळे मिक्सर ची पाती जाम होतात]

माहितीचा स्रोत: 
स्व-प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी सोपा प्रकार.
हेमामालीनी!!!!

छान.

दिनेश दा,हो ना..ही हेमा मालिनी,आणि थंडीत खजुर घालायचा तर त्याला राजेश खन्ना म्हणायचे..[बरोबर बारीक-बारीक हेमा मालिनी असायचीच..खजुराची उभी फाक करायची त्याचे सुरीने २ तुकडे करायचे..बाकी काजु-बदाम नाही घातले तरी चालायचे..दर ८-१५ दिवसानी असा केक करायचा..गोड आवडते/केक आवडतो मग खा भरपुर...कधी जायफळ्,लवंग,दालचीनी यांची पुड घालुन त्यात २ चमचे साखरेचे कॅरेमल घालुन ब्राउन केक करायचा..बाकी ऑरेंज्,रोज्,पायनॅपल्,कॉफी+कोको घालुन कॉफी केक असे प्रकार करायचे..
केक ओव्हन मधे ठेवला अन मधेच वीज गेली कि लगेच वाळु त केक भाजायचा..तिच वाळु थंड झाली कि भरुन ठेवायची..कारण हा धोका असायचाच..
मैदा कमी असला तर चक्क कणीक घालायची वा रवा केक करायचा...फार तुपलोणी नको असेल /घरात नसेल [कारण विकतचे आणायचे नाही] तर रिफाईंड तेलात ला केक ही छान लागतो.
घरगुती केक बाजार इतका ओला/मऊ होत नाही पण चवीला उजवा होतो..
अभिजीत्,बिनधास्त करुन पहा..साखर १ १/४ वाटी घातली तरी चालेल..त्यापेक्षा जास्त नको..बाकी बिनधास्त करा..२-३ वेळा केला कि तुम्ही तरबेज व्हाल..
जागु, धन्यवाद..

खरच सोपा वाटतोय. वाटीचे प्रमाण आहे त्यामुळे चुकायचे चान्सेस नाहीत. लगेच करुन बघावासा वाटतोय.

सुलेखा, ह्या कृतीने माझा केक अफलातून झाला. माझा आजवरचा सगळ्यात चांगला केक. मधे दिवे गेले. मग मी कढईत खडेमिठ घातले..वाळूऐवजी...कारण वाळू नव्हती कुठे...व खडेमिठावर भाजला. खूप खूप धन्यवाद.

सुमेधा.खरं तर मी अगदी सहज लिहीलं होतं ---दिवे गेले तर्--.या प्रमाणानुसार तू केक केलास अन वीज गेल्यावरचा अनुभव ,छान अनुभवलास !! वाळु नसेल तर माती घेतली तरी चालते.

अगं...मिठ तर घरातच होते. परत बरणीत भरून ठेवले. Happy
अजून एक गंमत सांगु का...मी लाल चेरी असते ना....ओली नाही...सुकी..वाण्याकडे मिळते ती....त्याऐवजी बिटाचे तुकडे करून घातले..मस्त दिसत आहेत व लागतायतही बेश्ट्....लोण्याऐवजी रिफाइंड तेल व मैद्याऐवजी कणीक घातली तर फार जास्त फरक पडेल का गं ?

चवीत किंचित फरक जाणवतो तो ही बॅटर मधें..नंतर आपण त्यात एसेन्स/दालचिनी+जायफळ+लवंग पूड घालतो ना तेव्हा तर अजिबात कळत नाही..मैद्याचा केक रंगाला कणकेच्या केक पेक्षा उजवा दिसतो व थोडा जास्त फुगतो पण कणकेचा पौष्टीक/हेल्दी असतो. कणिक व साखरेचे कॅरेमल +कॉफी/कोको+ दा+जा+ल पूड व सुका मेवा ,हेमा मालिनी + राजेश खन्ना घालुन मसाल्याचा डार्क ख्रिसमस केक सगळ्यांना आवडतो.

थँक्स सुलेखा...आणि तेलाचा फरक जाणवतो का चवीत? लोणी आणि तेल ह्यात फरक कळून येतो का?
ख्रिसमस केकची वर सांगितलेली सविस्तर कृती प्रमाणासकट पाठवशील का सुलेखा?

>>>बारीक-बारीक हेमा मालीनी>>><<
आधीची की आताची?

गंमत करतेय. चांगली दिसतेय रेसीपी. सध्या गॅस नसल्याने ... Sad
सुलेखाजी,
तुम्ही फोटो टाका ना... केकचा. Happy

सुमेधा , मुख्य केक चे माप तेच आहे..फक्त त्यात २ चमचे इंस्टंट कॉफी किंवा १ चमचा कोको [स्टाँग असतो,जास्त घातला तर कडू होईल.]घालायचा.त्यानंतर ब्राऊन रंग येईपर्यंत साखरेचे कॅरेमल [थंड करुन,केक मिश्रणात घालायचे.गरम ओतले तर कॅरेमल मधली साखर जमते] घालायचे व एसेन्स च्या ऐवजी दा-जा-ल पुड घालायची..अक्रोड,बदाम,खजुर भरपूर घालायचे.एकदा करुन पहा.
लोणी/बटर/तूप ऐवजी रि.तेल वापरले तर चवीत विशेष फरक जाणवत नाही..वनीला /रोज/पायनेप्पल/ओरेंज एसेन्स /मसाला मुळे
झंपी , सध्या केक करणे जमणार नाही.त्यामुळे तू किंवा इतर कोणी केला तर बरे !!!

सुलेखा...चालेल्..मी नक्की करून पाहीन. हे कॅरेमल प्रकरण जरा नीट सांगशील का प्लीज, मी पूर्वी नॉनस्टीक पॅनमधे साखर करपवली होती कॅरेमलसाठी, तेव्हा ते कॅरेमल पातेल्याला एवढे चि़कटले होते की पातेल्यासकट मी सगळे फेकून दिले होते. Happy

पॅन्/लहान फोडणी देतो ती कढणी गॅसवर तापायला मंद आचेवर ठेवायची..त्यात ३-४ चमचे साखर घालायची व चमच्याने सतत ढवळायचे.त्या साखर विरघळुन त्याचा डार्क रंगाचा पाक व्ह्यायला लागेल आता त्यात १ चमचा पाणी घालुन पुन्हा ढवळायचे .गरज असेल फार घट्ट वाटले तर अजुन १-१ चमचा पाणी घालायचे.आता उरलेली /खाली चिकटलेली साखर विरघळेल .रंग डार्क ब्राउन दिसेल .गॅस बंद करायचा .थंड करुन केक मिश्रणात हा पाक घालायचा ..
एकदा साखर मेल्ट व्हायला सुरवात झाली कि मग पाणी घातले तर तयार झालेल्या पाकाचा रंग डार्क ब्राऊन च रहातो.असे३-४ चमचे पाणी केक मिश्रणात घातले गेले तर पाण्यामुळे केक छान मऊ होतो..
बर्‍याचदा केक मिश्रणात दुध,कन्डेन्स मिल्क घालतो ना.असाच अर्धी वाटी मावा मोकळा करुन /किसुन मिश्रणात टाकायचा.बाकी प्रमाण तेच..छान मावा केक तयार होतो.

अरे रामा, माझ्या हेमामालिन्या पाण्यावरच्या ख्रिस्ता सारख्या तरल्या ना? माकाचु?
सगल्या वरच राहिल्या Sad

शिरीन, हेमा मालिनी/ड्राय फ्रुट्स १/२ टी स्पून मैद्यात घोळवुन टिन मधल्या केक मिश्रणात घालायचे...किंवा अर्धे मिश्रण पसरल्यावर थोडे घालायचे बाकी सगळ्यात वर...

हेमा मालिनी/ड्राय फ्रुट्स १/२ टी स्पून मैद्यात घोळवुन टिन मधल्या केक मिश्रणात घालायचे...किंवा अर्धे मिश्रण पसरल्यावर थोडे घालायचे बाकी सगळ्यात वर...>>>>> काय करायचे कळाले, का ते नाही.

<< केक भाजायला ठेवला कि लगेच मिक्सर चे भांडे थोडेसे पाणी व सर्फ घालुन फिरवुन घ्या ..स्वच्छ होईल वास जाईल..[साखर्+लोणी च्या चिकटामुळे मिक्सर ची पाती जाम होतात] >>

हे सगळ्यात बेस्ट आहे

सहेली,सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट ला थोडयाशा मैद्यात घोळवुन केक बॅटर मधे घातले तर ते तळाशी न जता केक मधे पसरतात.खुप बारीक तुकडे असल्यास त्यातील अर्धे ,केक मिश्रण अर्धा भाग टिनमधे घातल्यावर पसरायचे व उरलेले अर्धे ड्राय फ्रुट ,बाकीचे उरलेले केक मिश्रण घातल्यावर सर्वात वर पसरायचे.म्हणजे सगळीकडे पसरतीलव तयार केक च्या प्रत्येक घासात चव येईल.

डश,
मिक्सरमुळे केक करणे सोप्पे होते पण मिक्सरच्या भांडयातली पाती साखर,तुप/लोणी/तेल यामुळे नंतर जाम होते .अंडी/इसेन्स चा वास ही येतो.तेव्हा ते स्वच्छ करण्याचा झटपट पर्याय हवाच ना ..

रिया,
कच्च्या पपईचे पाकवलेले लहान लहान रंगीत--[लाल-पिवळा-हिरवा ] तुकडे..निलॉन्स किंवा इतर तयार मिळतात...केक,पानवाल्यांकडचे विडयाचे तयार पान, काही मिठायांमधे वापरतात ..काही टिकाणी "कतरी" असेही म्हणतात