२ पाऊंड (साधारण १ किलो) मटण
१ चमचा आले-लसूण पेस्ट
१ चमचा हळद
१ चमचा तिखट
१ चमचा लिंबाचा रस
मीठ
सुके वाटण
२ चमचे धणे
१ चमचा जिरे
१ चमचा तीळ
१ चमचा खसखस
१ चमचा बडीशेप
१ छोटा चमचा काळे मिरे
२-३ लवंगा
२-३ लाल मिरच्या
छोटा दालचिनीचा तुकडा
२ चमचे सुके खोबरे
ओले वाटण
१ मध्यम कांदा उभा चिरुन
अर्धी वाटी कोथिंबीर
३-४ लसूण पाकळ्या
१ इन्च आले
फोडणी
१ लहान कांदा बारीक चिरुन
२ तमालपत्रे
हिंग
तेल
पाणी
- म्हणजे 'काळे मटण'. नवीन नाव दिलंय.
- मटण धुवून त्याला हळद, मीठ, तिखट, आले-लसूण पेस्ट, लिंबाचा रस लावून ठेवावे.
- सुक्या वाटणाचे सगळे जिन्नस थोडे तेल टाकून खरपूस, खमंग भाजून घ्यावेत आणि वाटावेत. हे वाटण तसे सुकेच असते आणि काळपट दिसते. यातला १ चमचा वाटण मटणाला चोळून ठेवावे. अर्धा तास तरी ठेवावे.
- ओल्या वाटणाचा कांदा तेलावर रंग बदलेपर्यंत परतावा, त्यातच मग कोथिंबीर, आले, लसूण घालून परतावे. मग थोडे पाणी घालून वाटावे.
- पातेल्यात किंवा स्टीलच्या कुकरमध्ये तेल तापवून हिंग, तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा टाकावा. परतून घ्यावा आणि मग मॅरिनेट केलेले मटण टाकून भाजून घ्यावे. मटण सगळ्या बाजूने भाजले जावे इतपत परतावे. मग उरलेला कोरडा मसाला घालून पुन्हा परतावे.
- आवश्यकतेनुसार मीठ-तिखट घालावे.
- ओले वाटण घालून मिसळून घ्यावे आणि अगदी आवश्यक तेवढे पाणी घालून शिजवावे, फार पातळ करु नये. याला अंगाबरोबरच दाट रस्सा असतो.
ही पारंपारिक रेसिपी आहे. कोल्हापुरात मिळते ते काळे मटण अगदी असेच असते का कल्पना नाही. मी हा पदार्थ बाहेर कधी खाल्ला नाही.
झकास दिसतय! रेसिपी ही सोपी
झकास दिसतय! रेसिपी ही सोपी वाटतेय. करुन बघतो, मग फोटो टाकतो.
वॉव.. टेस्टी वाटतीये रेसिपी..
वॉव.. टेस्टी वाटतीये रेसिपी.. एकदा नागपूर ला सावजी मटनाचा प्रकार चाखला होता.. झणझणीत..
तसलाच काही असावा हा प्रकार
सुक्या वाटणाचे पदार्थ ,भाजून घ्यायचेत कि तसेच वाटायचे???
नाव आणि फोटो तर मस्तच !!
नाव आणि फोटो तर मस्तच !!
ऑसम. सांगलीला चुलत
ऑसम. सांगलीला चुलत सासुबाईंच्या हातचे खाल्ले आहे. फार मस्त लागते. बरोबर गरम पोळी. करेंगा जी.
वा वा! मस्तच दिसतंय .. मसाले,
वा वा! मस्तच दिसतंय .. मसाले, वाटणं बघता, झकास लागत असेल ..
आम्हिही कृष्ण'करी' करू, फक्त कुठल्यातरी भाज्या वापरून .. :p
व्वा! मस्त पाकृ!
व्वा! मस्त पाकृ!
जय जय राम कृष्ण करी
जय जय राम कृष्ण करी
धन्यवाद. वर्षू, भाजून
धन्यवाद.
वर्षू, भाजून घ्यायचे. कृतीमध्ये लिहिले आहे बघ. हवं तर त्या मसाल्यात एक मसाला वेलची आणि थोडे जायफळ घालू शकता.
कसलं तोंपासू दिसतंय!!
कसलं तोंपासू दिसतंय!!
सही दिसतय, लैच काव्यत्मक नाव
सही दिसतय, लैच काव्यत्मक नाव की वो
मस्त दिसतंय. नवं नावही आवडलच.
मस्त दिसतंय. नवं नावही आवडलच.
या वीकेंडला करणार .
या वीकेंडला करणार .
आहाहा.. वाचतावाचताच तोंडाला
आहाहा.. वाचतावाचताच तोंडाला पाणी सुटले....
तोंपासू
तोंपासू
मी फक्त पाव किलो मटणाचीच केली
मी फक्त पाव किलो मटणाचीच केली पण फार मस्त होते. इतकी वर्शे मटण बनविले पण ही चव जमली नव्हती. कोरडा मसाला भाजल्यावर मिक्सर मधून काढतो व झाकण उघडतो तो ह्या रेसीपीचा इट मोमेंट आहे.
बाकी सर्व प्रोसीजर. पोळी तसेच भाता बरोबर आउट स्टँडिंग. अगदी फोटो मधल्यासारखीच दिसते.
खुपच मस्त रेसिपी.... फोटो पण
खुपच मस्त रेसिपी.... फोटो पण मस्त आलाय.
अश्विनी मामी, तुमचा उत्साह खरचं वाखाणण्यासारखा आहे.:)
लोला मटणाची अशीच एखादी अजुन
लोला मटणाची अशीच एखादी अजुन झणझणीत पाककृती येऊदद्यात की
लोला.. पुन्हा वर आलीये ही
लोला.. पुन्हा वर आलीये ही रेसिपी... आहाहा.. माझ्या आवडत्या दहात!!!!
मस्त रेसिपी, आजच हा धागा
मस्त रेसिपी, आजच हा धागा बघितला.
आगागा फोटो खतरा आहे. करुन
आगागा फोटो खतरा आहे. करुन बघणार.
लोला, ही 'कृष्ण' करी बनवायचा
लोला, ही 'कृष्ण' करी बनवायचा विचार आहे. एक किलो मटणाकरता वर दिलेले चमचाचे माप टीस्पून वापरायचे आहे कि टेबलस्पून?
मस्त होते ही करी!
मस्त होते ही करी!
मस्त झाली होती. वाह! वीकेंड
मस्त झाली होती. वाह! वीकेंड सत्कारणी लागला.
मस्त रेसीपी. माझी आजी काळे
मस्त रेसीपी. माझी आजी काळे चिकन बनवायची त्याची आठवण आली.
घ्या!
घ्या!
दिमा, मस्त फोटो ! आज
दिमा, मस्त फोटो ! आज आमच्याकडे देखील कृष्णकरी मात्र मटण ऐवजी चिकनची .
फोटो बघुनच पोट भरीन म्हणतो...
फोटो बघुनच पोट भरीन म्हणतो.....