RA _ONE

Submitted by मुरारी on 27 October, 2011 - 00:55

मुंबईच्या लोकल मधून अचाट स्टनट्स करणारा शाहरुख उर्फ जी - वन,... भयानक वेगात फिरवलेले क्यामेरे ... ब्रेक्स नसलेली सुसाट सुटलेली लोकल .. हिरवीण चक्क मोटरमन च्या जागी .. शेवटी.. लोकल चे डबे वेगळे करून लोकांना वाचवण .. फक्त मोटरमनच्या डब्याच प्रचंड वेगाने CST स्टेशनात धडकण .. चक्क स्टेशनच्या बाहेर लोकल चा डबा येण.. त्या धक्क्याने जुन्या स्टेशनच्या इमारतीला तडे जाण, त्या वरची विक्टोरीयाची मूर्ती कोसळण....हळू हळू.. स्टेशन ची इमारतच खचण. अफाट सर्वच अफाट... हा संपूर्ण चित्रपटातला hi- point म्हणता येईल .
प्रचंड उच्च दर्जाचे VFx. compositing . करून बनवलेला रा - वन बघायला गेलो तेंव्हा खूपच अपेक्षा होत्या.. शिवाय काही मित्रही VFX च्या टीम मधले.. दिवस रात्र त्यांना या प्रोजेक्ट वर खपताना पहिल्याने.. शारुख असला तरी हा पिक्चर बघणारच होतो .
पहिल्या सीन मध्ये डोक ओउट झाल .. तेजायचं शारूक सुरकुतलेल्या बाडीने कुठल्यातरी यंत्रावर उडताना दाखवलंय.. मग उगाचच संजय दत्त ची एन्ट्री.. प्रीयाक्ना चोप्राचे दर्शन.. बाळबोध मारामारी... काहीच गरज नव्हती.. इथेच चित्रपट हातातून निसटायला सुरुवात झाली... ते त्याच्या वयापेक्षा अक्कल आणि डोक्यावरचे केस जास्त असलेल्या मुलाच स्वप्न असत. तो गेमिंग चा वेडा असतो... karina त्याची बायको दाखव्लीये.. चित्रपटाच्या सुरुवातीला म्हणे ती शिव्यांवर थिसीस करताना दाखव्लीये (काय संबंध? ) असो . शारुख कुठल्याश्या गेमिंग कंपनीत गेम बनवत असतो.. मुलाच्या सांगण्यावरून तो असा गेम design करतो कि ज्यात विलन हिरो पेक्षा वरचढ दाखवलाय. पण तिथे अशी टेकनोलोजी त्यांच्या कंपनीने देवेलोप केलेली असते कि digital सिग्नल आपल्या डोळ्यांना दिसू शकतात.. आणि त्या द्वारे निर्माण झालेल्या चित्रांना आपण हात लावू शकतो आणि बोलू सुधा शकतो.. ( ब्वार्र ) तर अशा गेम मध्ये काहीतरी बिघाड होतो.. आणि त्यातला विलन खर्या जगात अस्तित्वात येतो . आता हा बिघाड कसा झाला. ते दाखवण्याचे कष्ट अजिबात घेतलेले नाहीत.. इथून पुढे सर्व खेळ special efects . VFX, आणि 3D चा आहे..
माया, after effects 3d max सारख्या software चा सढळ हस्ते वापर करून.. भारतीय लोकांनीही आपण कुठेही मागे नाही हे दाखवून दिले आहे... . सर्वच सिन्स मस्तच जमलेले आहेत..
तर तो विलन शारूक च्या मुलाच्या मागे लागतो.. कारण शेवटचा गेम तोच त्याच्याबरोबर खेळलेला असतो. त्याच दिवसी शारूक ला तो विलन संपवतो... मग पुढची ईश्तोरी काय सांगायची. जसा विलन खर्या जगात येतो. तसाच त्याचा अक्कल जास्त असलेला मुलगा. जी वन ला पण जिवंत करतो .. मग सगळ्या पिक्चर ची वाट लावलेली आहे.. फालतू इमोशन... उगाच सलमान छाप कॉमेडी .. मधेच बाळबोध सिन्स ... टुकार गाणी ... पिक्चर कुठलीही वळण न घेता सरळसोट मार्गाने संपतो ...
शारूक चा वय आता जाणवू लागल आहे.. तो कुठल्याही बाजूने Action हिरो वाटत नाही. त्याच्या आईवजी रितिक चालला असता

चित्रपटाच्या फसलेल्या बाजू :

१.कुठल्याही प्रकाराने सुपरहिरो वर आधारित चित्रपट वाटत नाही
२.स्वत शारुख
३.विलन च्या नावाने चित्रपटाचे नाव ठेवले.. तर तो विलन तेवढा ठळकपणे कधी समोरच येत नाही. ८०% शारूकच दिसतो
४.टुकार पटकथा
५.अमिताभ चा थकलेला आवाज , मधेच रजनी, संजय दत्त, प्रियांका चोप्रा यांच्या वापरलेल्या कुबड्या रसभंग करतात

चित्रपटाच्या जमलेल्या बाजू :

१.प्रचंड फ्रेश लुक
२.अत्त्युत्तम VFX, आणि 3D ,
३.बेमालूमपणे केलेलं compositon
४.संपूर्ण भारतीय बनावट.

बघायचाच असेल तर 3D बघा.. नाहीतर बघू नका

माझे रेटिंग : 0 .५ (चित्रपटाला)
२ (VFX, 3D , Special Effects )

२.५ / ५

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६. साउथ इंडियन लोक करवचौथ साजरी करतात का?
<< करिना पंजाबी दाखवलीये ना पण, बोलताना दाखवलीये सारखी.
पण एक अ आणि आ. म्हणजे करवा चौथ दसर्‍याच्या आधी आलेले दाखवलय (बहुदा) Proud
महा बोरिंग-अति भयानक मुव्ही.. शेवट पर्यंत पहाणं शक्य नाही !
कसला तो थकेला जी वन , मला तर गाणी पण नाही आवडली.

शाहरूख खानचा आता सद्दी संपलेला राजेश खन्ना होतोय बहुतेक.. त्याला पण आपली जादू संपलीये हे कित्येक वर्षे कळ्ळंच नव्हतं !

चित्रपटात ज्या लोकांची मातृभाषा/राज्य वगैरे स्पष्ट केलेले नसेल ते बाय डीफॉल्ट पंजाबीच असतात.

Pages