RA _ONE

Submitted by मुरारी on 27 October, 2011 - 00:55

मुंबईच्या लोकल मधून अचाट स्टनट्स करणारा शाहरुख उर्फ जी - वन,... भयानक वेगात फिरवलेले क्यामेरे ... ब्रेक्स नसलेली सुसाट सुटलेली लोकल .. हिरवीण चक्क मोटरमन च्या जागी .. शेवटी.. लोकल चे डबे वेगळे करून लोकांना वाचवण .. फक्त मोटरमनच्या डब्याच प्रचंड वेगाने CST स्टेशनात धडकण .. चक्क स्टेशनच्या बाहेर लोकल चा डबा येण.. त्या धक्क्याने जुन्या स्टेशनच्या इमारतीला तडे जाण, त्या वरची विक्टोरीयाची मूर्ती कोसळण....हळू हळू.. स्टेशन ची इमारतच खचण. अफाट सर्वच अफाट... हा संपूर्ण चित्रपटातला hi- point म्हणता येईल .
प्रचंड उच्च दर्जाचे VFx. compositing . करून बनवलेला रा - वन बघायला गेलो तेंव्हा खूपच अपेक्षा होत्या.. शिवाय काही मित्रही VFX च्या टीम मधले.. दिवस रात्र त्यांना या प्रोजेक्ट वर खपताना पहिल्याने.. शारुख असला तरी हा पिक्चर बघणारच होतो .
पहिल्या सीन मध्ये डोक ओउट झाल .. तेजायचं शारूक सुरकुतलेल्या बाडीने कुठल्यातरी यंत्रावर उडताना दाखवलंय.. मग उगाचच संजय दत्त ची एन्ट्री.. प्रीयाक्ना चोप्राचे दर्शन.. बाळबोध मारामारी... काहीच गरज नव्हती.. इथेच चित्रपट हातातून निसटायला सुरुवात झाली... ते त्याच्या वयापेक्षा अक्कल आणि डोक्यावरचे केस जास्त असलेल्या मुलाच स्वप्न असत. तो गेमिंग चा वेडा असतो... karina त्याची बायको दाखव्लीये.. चित्रपटाच्या सुरुवातीला म्हणे ती शिव्यांवर थिसीस करताना दाखव्लीये (काय संबंध? ) असो . शारुख कुठल्याश्या गेमिंग कंपनीत गेम बनवत असतो.. मुलाच्या सांगण्यावरून तो असा गेम design करतो कि ज्यात विलन हिरो पेक्षा वरचढ दाखवलाय. पण तिथे अशी टेकनोलोजी त्यांच्या कंपनीने देवेलोप केलेली असते कि digital सिग्नल आपल्या डोळ्यांना दिसू शकतात.. आणि त्या द्वारे निर्माण झालेल्या चित्रांना आपण हात लावू शकतो आणि बोलू सुधा शकतो.. ( ब्वार्र ) तर अशा गेम मध्ये काहीतरी बिघाड होतो.. आणि त्यातला विलन खर्या जगात अस्तित्वात येतो . आता हा बिघाड कसा झाला. ते दाखवण्याचे कष्ट अजिबात घेतलेले नाहीत.. इथून पुढे सर्व खेळ special efects . VFX, आणि 3D चा आहे..
माया, after effects 3d max सारख्या software चा सढळ हस्ते वापर करून.. भारतीय लोकांनीही आपण कुठेही मागे नाही हे दाखवून दिले आहे... . सर्वच सिन्स मस्तच जमलेले आहेत..
तर तो विलन शारूक च्या मुलाच्या मागे लागतो.. कारण शेवटचा गेम तोच त्याच्याबरोबर खेळलेला असतो. त्याच दिवसी शारूक ला तो विलन संपवतो... मग पुढची ईश्तोरी काय सांगायची. जसा विलन खर्या जगात येतो. तसाच त्याचा अक्कल जास्त असलेला मुलगा. जी वन ला पण जिवंत करतो .. मग सगळ्या पिक्चर ची वाट लावलेली आहे.. फालतू इमोशन... उगाच सलमान छाप कॉमेडी .. मधेच बाळबोध सिन्स ... टुकार गाणी ... पिक्चर कुठलीही वळण न घेता सरळसोट मार्गाने संपतो ...
शारूक चा वय आता जाणवू लागल आहे.. तो कुठल्याही बाजूने Action हिरो वाटत नाही. त्याच्या आईवजी रितिक चालला असता

चित्रपटाच्या फसलेल्या बाजू :

१.कुठल्याही प्रकाराने सुपरहिरो वर आधारित चित्रपट वाटत नाही
२.स्वत शारुख
३.विलन च्या नावाने चित्रपटाचे नाव ठेवले.. तर तो विलन तेवढा ठळकपणे कधी समोरच येत नाही. ८०% शारूकच दिसतो
४.टुकार पटकथा
५.अमिताभ चा थकलेला आवाज , मधेच रजनी, संजय दत्त, प्रियांका चोप्रा यांच्या वापरलेल्या कुबड्या रसभंग करतात

चित्रपटाच्या जमलेल्या बाजू :

१.प्रचंड फ्रेश लुक
२.अत्त्युत्तम VFX, आणि 3D ,
३.बेमालूमपणे केलेलं compositon
४.संपूर्ण भारतीय बनावट.

बघायचाच असेल तर 3D बघा.. नाहीतर बघू नका

माझे रेटिंग : 0 .५ (चित्रपटाला)
२ (VFX, 3D , Special Effects )

२.५ / ५

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. काल पाहीला हा चित्रपट. मलाही ते लोकलचच दृश्य आवडलं. बाकी संपुर्ण चित्रपटभर मी एखादा व्हिडीओ गेम पाहतोय की काय? असं वाटत होतं.

मीही पाहिला हा चित्रपट .
तुमच्या लेखासारख्या आणी थोड्या जास्त जहाल प्रतिक्रिया ही ऐकल्या .
थोडा शाहरूख (तुमच्या भाषेत शारूख) विरोधाचा चष्मा काढून पाहिला तर आवडेल असा आहे . मी स्वत : हॉलिवूडच्या सुपरहीरो पटाचा पंखा आहे . अनेक सुपरहिरो चित्रपट मी पाहिलेत . त्यातल्या बर्याच चित्रपटापेक्षा याची पट्कथा जास्त चांगली आहे . लहान मुलांसाठी शिकवण ही आहे यात झालच तर .
आणी मुख्य म्हणजे मला आपल्या पब्लिकच काही कळत नाही .
म्हणे गेममधून रा१ बाहेर कसा येतो , अस कधी होत काय ? आणी हेच लोक कोळी चाऊन स्पायडरमॅन झाला किंवा क्रिप्ट्न वरून सुपरमॅन आला अस म्हट्ल की काय त्या लोकांची कल्पनाशक्ती म्हणून टाळ्या वाजवतात .
शाहरूख च काम वाईट झालय अस लेखकाला का वाटल ते मला माहीत नाही पण टाकाऊ तरी नक्कीच नाही .
एकूणच क्रिश आणि द्रोणा पेक्षा हा चित्रपट नक्कीच पुढच पाऊल आहे . अगदी परफेक्ट नसेलही पण एक कूल भारतीय सुपरहिरो (मिथिकल किंवा जादू नसलेला) देण्याचा प्रयत्न केला आहे , त्याला शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे ?

प्रसन्न, यापेक्षा सविस्तर वाचायला आवडलं असतं.. कधी बघेन तेव्हा बघेन.

पण हा केवळ मोटरमनचा डबा वेगळा होण्याचा इफेक्ट तर द बर्निंग ट्रेनमधेही होता. (आता बाळबोध वाटेल तो.)

kedaar laa prachand anumodan......
je sp.effects aahet te hollywood chya todi che aahet....te baghtanaa kuthe hi vaatat nahi ki aapan ek bollywood film baghtoy..

super hero. ase stunt nahi karnar mag kon karel....
ithe bollywood madhe tar sadha inspecter, bodyguard suddha ase stunt karataana dakhavtaat.. te kase patate...? Happy

kahi univaa nakkich asatil...pan ek suruvaat yaa film ne dili aahe...ki hollywood effects aata bollywood suddha karu shakto...

@ केदार जाधव

>>>>मीही पाहिला हा चित्रपट .
तुमच्या लेखासारख्या आणी थोड्या जास्त जहाल प्रतिक्रिया ही ऐकल्या .

ह्म्म्म्म

>>>>थोडा शाहरूख (तुमच्या भाषेत शारूख) विरोधाचा चष्मा काढून पाहिला तर आवडेल असा आहे .

मी वर आधीच लिहिले आहे. कि शारूक पेक्षाही मी VFx पाहण्यासाठीच गेलो होतो.
आणि त्याला Action येत नाही हे सर्व मान्य आहेच.. त्याची शरीरयष्टीच तशी नाही..
हे तुम्ही "शारूक प्रेमाचा" चष्मा बाजूला ठेवून पाहिलेत तर जास्त चांगल होईल कि नाही Wink

>>>>मी स्वत : हॉलिवूडच्या सुपरहीरो पटाचा पंखा आहे . अनेक सुपरहिरो चित्रपट मी पाहिलेत . त्यातल्या बर्याच चित्रपटापेक्षा याची पट्कथा जास्त चांगली आहे . लहान मुलांसाठी शिकवण ही आहे यात झालच तर .>>>

याचा संदर्भ काही लागला नाही असो Happy

>>>>>आणी मुख्य म्हणजे मला आपल्या पब्लिकच काही कळत नाही .
म्हणे गेममधून रा१ बाहेर कसा येतो , अस कधी होत काय ? आणी हेच लोक कोळी चाऊन स्पायडरमॅन झाला किंवा क्रिप्ट्न वरून सुपरमॅन आला अस म्हट्ल की काय त्या लोकांची कल्पनाशक्ती म्हणून टाळ्या वाजवतात .>>>>>

तुम्ही तुमच्या प्रश्नच उत्तर दिलाय .
स्पायडर मॅन कसा बनला ? = कोळी चावून
सुपर म्यान कसा आला ? = कुठल्याश्या ग्रहावरून..

प्रत्येक गोष्टीच काही न काही justification तिकडचे चित्रपट देतातच .
पण इकडे तो रावण बाहेर कसा येतो त्याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही

>>>>एकूणच क्रिश आणि द्रोणा पेक्षा हा चित्रपट नक्कीच पुढच पाऊल आहे . अगदी परफेक्ट नसेलही पण एक कूल भारतीय सुपरहिरो (मिथिकल किंवा जादू नसलेला) देण्याचा प्रयत्न केला आहे , त्याला शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे ?>>>

सहमत आहे .
पण आपण आपल्यापेक्षा चांगल्या दर्जाची तुलना केली तरच सुधारणा करू शकू .
वाईट चित्रपटांशी तुलना करण्यात काय अर्थ आहे

@ उद्य ओने

kedaar laa prachand anumodan......
je sp.effects aahet te hollywood chya todi che aahet....te baghtanaa kuthe hi vaatat nahi ki aapan ek bollywood film baghtoy..

मीही तेच लिहिलंय

super hero. ase stunt nahi karnar mag kon karel....
ithe bollywood madhe tar sadha inspecter, bodyguard suddha ase stunt karataana dakhavtaat.. te kase patate...?

मी Stunts बद्दल कुठे काय बोललो ...
तुम्ही नीट वाचलेलं दिसत नाहीये
तांत्रिक बाबींवर चित्रपट सरसच आहे

kahi univaa nakkich asatil...pan ek suruvaat yaa film ne dili aahe...ki hollywood effects aata bollywood suddha karu shakto...

मग मी हि तेच लिहिलंय....
Lol

प्रत्येक गोष्टीच काही न काही justification तिकडचे चित्रपट देतातच .
पण इकडे तो रावण बाहेर कसा येतो त्याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही
>> प्रसन्न , तुम्ही चित्रपट सुरूवातीपासून पाहिला नाही बहुधा . त्यात याच स्पष्टीकरण आहे .

shah ruk chi body nahi aahe....manya aahe....pan ti kaa nahi aahe he suddha kuthe vaachale aahe kaa.. kasarati karanya sathi eka sports player pramane body havi hoti...mhanun...jast body na fugavataa...nivval cuts var jast bhar dila gela aahe... by the way...tyacha trainer ha MARATHI aahe.. Happy

slow aahe film..pan tumhi tulanaa KRISSH, SPIDERMAN2,3 shi karu naye...kaaran te sarv after being superhero...yaa prakaratale aahet...yaa film madhe tyala intro kele gele aahe....

dokyat KRISSH theun gelat tar nirasha hoil..tya pekshaa KOI MIL GAYAA..etc 1 version films dokyat thevavi... Happy

digital waves signal je aapalya bhovati asataat jya tun te photonna haat lau shakto..ase je tecnology tayar keli asate compny ne...tya tecnologicha vaapar karun RAONE ya jagaat yeto..karan system ne sarv compny chya branches na jodalele asate...

suruvatila ji CUBE dakhavli geli tichach vapar hoto... Happy

chuka aahet...jase ki SHAH RUKH melya var chathelic paddhatine antim sanskar dakhavlet...ani nantar chya shot madhe ASTHI visarjan karataana dakhavle aahe ... Happy he kase..?

chuka aahet...jase ki SHAH RUKH melya var chathelic paddhatine antim sanskar dakhavlet...ani nantar chya shot madhe ASTHI visarjan karataana dakhavle aahe ... स्मित he kase..?

अगदी अगदी.. हा तर कहर आहे...

शिवाय तो पोरगा त्याच्या अस्थी खिशात ठेवतो.. आणि नंतर त्या वापरतच नाही =))

हा चित्रपट क्रिशच्या पासंगालाहाई पुरत नाही.. क्रिशचा विलन तगडा होता.. त्याला विलन व्हायला काहीतरी सबळ कारण होत. टाइम मशिनचा सर्वेसर्वा होणं

रा वन मध्ये एक खेळातला अर्धा राहिलेला डाव एका मुलाबरोबर खेळायला विलन बाहेर येतो.. अगदीच फालतू कारण वाटते.. शिवय ७५ % पिक्चरात त्याला बिचार्‍याला चेहराच नाही.. अगदी शेव्चटी शेवटी अर्जुन रामपालचा चेहरा मिलतो.

शिवाय तो पोरगा त्याच्या अस्थी खिशात ठेवतो.. आणि नंतर त्या वापरतच नाही =))

आता त्या अस्थीपासून पुन्हा नवीन शाहरुखही तयार होऊ शकेल..

शाहरुख मेल्यावर त्याला कॉफीनमधून नेतात.. मला वाटले तो ख्रिस्चन असेल.. मग लगेच अस्थीविसर्जन .. मग कळले तो हिंदुच होता.. Proud लंडनमध्ये तिरडी, गुलाल, झेंडूचे हार वगैरे नसतात का? Proud

अचाट! आणि आचराट!

आधी वाटले की लहान मुलांसाठी सुपरहिरो वगैरे पिक्चर आहे.

एकदम बघितले तर त्या झिपरू मुलाच्या वर्गातल्या एका पोराने त्यांच्या बाईचा "स्वतःला एक्स्प्रेस करतानाचा" (अश्लिल नव्हे!) व्हिड्यो लावलेला अस्तो.. Uhoh

मग त्या गेम च्या रिलिज डे पार्टी मधे त्या गोर्‍या बाया आणि केवळ दारूच्या अमलांखांलीं आलेली असल्यानेच्च खरी मात्र एकदम घरेलु असलेली करिना पण किती उठाबशा काढल्यागत डानस करते.... आवरा हिला असे वाटते.

आणि मग येतो अंगभर पिअर्सिंग केलेला जी. वन
त्याच्या तोंडाव पिअर्सिंग आहे , जे दिसते. मग तो तोंड उघडून तोंडात पण आहे दाखवतो. अरे आवरा! इथून पुढचे कशाला दाखवा.

रावन त्या पोराला शोधत येतो आणि बिल्डींगवरून जो दिसेल त्याला स्कॅन करतो. पण बिल्डींगच्या खालीच उभा असलेला झिपरू त्याच्या स्कॅन मधे येत नाही.

मग पाठलाग... आई आणि बच्चा जोरात जात असता बस फोडून बाहेर आरपार! बसचा भुगा आणि गाडी इण्टॅक्ट.

सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे जी-वन हे नाव त्यांना किती नॅच्युरली सुचते हे दाखवले आहे.

इण्डियन सुपरहिरो वगैरे ठिक आहे, स्टंट्स / ग्राफिक्स हॉलिवूडच्या तोडीचे आहे का त्यांनीच करुन दिले आहे असा प्रश्न आहे. आपणच केले असेल तर मात्र मानले!

तासाभराहून अधिक बघणे अशक्य. रजनी 'सर' (मधेच, उगाच ) येऊन गेल्यावर पुढे काय होते काय माहित..

ऋयाम, स्वतंत्रपणे लिहि बघू.... आणि करिना कंगनापेक्षा कित्त्ती कित्त्त्त्ती वाईईईईईट्ट्ट्ट दिसते ते पण लिहि.

प्रयत्न छान आहे.........मी तरी इतरांसारखा तुलना करणार नाही......रा-वन ची तुलना तुम्ही क्रिश, स्पायडर मॅन यांच्याशी करु नका .....कारण क्रिश मधे रितिक अधिच सुपर हिरो असतो तो कसा होतो ते कोइ मिल गया मधे दाखवले आहे..त्यात तर काहीच नव्हते... स्पायडर मॅन हा आपल्याला कॉमिक्स मुळे काय आहे हे माहीती होते.. त्यामुळे रा-वन हा सुरवातीचा चित्रपट असल्याने थोडा स्लो झाला आहे... काही ठिकानी फसला गेला आहे..
रा-वन मधे हिरोची माहीती देण्यातच अर्ध्यापेक्षा जास्त वेळ वाया गेला आहे त्यामुळे फरक पडला.. जर शाह रुख ने हिंमत करुन पार्ट २ बनवला तर तो नक्कीच सर्व अपेक्षा पुर्ण करेल...

मी रा-वन ची तुलना टर्मिनेटर -१ शीच करेल कारण तो पन एक काही नविन हिरो चे पदार्पण चित्रपट आहे..
बाकिचे सुपर हिरोंना पदार्पण करायची गरज नव्हती कारण कॉमिक्स वगैरे मुळे ते आधीच माहीती झालेले आपल्याला........

बाकी प्रतिक्रिया देणार्यांच्या आवडीची माहीती आहे.. Happy बॉडीगार्ड,रेडी,रास्कल इत्यादी सारख्या तद्दन फालतु चाळे असलेल्या चित्रपटाला आवडीने पाहणार्याना काय म्हणावे..काही लोक चकण्या कंगणाला रास्कल मधे सुध्दा आवडीने बघतात... Happy
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी रास्कल पाहिलेला नाही. पण त्यातही प्रोमोमधे बघू तेवढे तरी ती सुंदरच्च्च्च दिसते. ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठाम मत!
आता ती कोण विचारू नका.
आणि करीना ह्या चितरपटात दिसते हो सुंदर.
पण बघा कसे लोक आहेत. कोणी म्हणणार नाही की ह्याची दृष्टी सुंदर आहे. ह्याला म्हणता कलियुग.

हे भगवान्न उ ठा ले... मुभ्फे नहीं..... :लोल:

Ra.one Jokes Collection
1. Govt also declared 26th Oct as public
holiday to celebrate the end
of Ra1 promotions !!
2= Govt. of India just announced Rs
... 50,000 relief to all
... those who watched RA1 . Rs 25,000
for those who left at interval.
3=Breaking News!!!! Crocin, Disprin,
Combiflam, Adol Panadol, Diclomol and
all
Headache Tablets Stock over after
RA.ONE's release
4=Salman to SRK after watching ra.one ,
"mujh par
ek ehsaan karna,duba ra aisi movie
mat banana"
5=Rahul Gandhi to meet people
affected after
seeing Ra.One
6=Even Ra.mu doesn't wanna waste
time watchin Ra .one !!
7=Nahi chala RA.ONE ab srk bolega buy
one get one
aur ek week ke baad bolega RA.ONE
coming soon on sahara one and star
one.
8=All bachelors see #RaOne and
understand what PAIN means to
married men.

शाहरुख मेल्यावर त्याला कॉफीनमधून नेतात.. मला वाटले तो ख्रिस्चन असेल.. मग लगेच अस्थीविसर्जन ..>>>>> हे अतिशयच अचाट आणि अतर्क्य आहे. कॉफीन मधे पुरल्यावर न जाळता कुठुन अस्थी मिळवल्या याच्या. लोकांना काय येडे समजतात का?

भारतात परत आल्यावर (नवरा गेला म्हणून, त्याची यादे इथे आहेत वगैरे वगैरे) करीना बरी लगेच लाल लोवेस्ट साडी घालून ड्यान्स वगैरे करायला लागते Proud

परदेशात (हिंदुंमध्येसुद्धा) बर्‍याचदा बॉडी घरी आणण्यासाठी किंवा विद्युत दाहीनीत नेण्यासाठी casket वापरावी लागते त्यात नवीन असं काही नाहीये.

Pages