सर आयझॅक न्यूटन - एक महामानव ( भाग- १ )

Submitted by अमिताभ on 26 October, 2011 - 03:42

खर तर न्यूटनने जरी 'द्वीपद प्रमेय' ( Binominial Theorem ) आणि कलनशास्त्र ( Calculus ) याच गोष्टी फक्त शोधल्या असत्या तरी त्याचं एक महान गणिती म्हणून इतिहासात स्थान नक्की होते . इतर विज्ञानातील उपद्याप करण्याचीही त्याला गरज नव्हती , पण तसे व्हायचे नव्हते. लिंकनशायरमधील हा कोवळा तरुण पुढे त्याच्या हयातीतच इतका कीर्तिमान झाला की ब्रिटीश कवी अलेकझानडर पोप याने त्याच्याविषयी लोकप्रिय अशा पक्ती लिहून ठेवल्या -

" Nature and Nature's Laws lay hid in Night ,
God said ' Let Newton be' , And all was light "

१६४२ साली म्हणजे ज्या वर्षी महान संशोधक गलिलिओ मरण पावला त्याचं वर्षी न्यूटनाचा जन्म झाला .सर आयाझाक न्यूटन याचा जन्म २५ डिसेम्बेर १६४२ रोजी इंग्लंडमध्ये वूल्ज्थोर्प्मध्ये झाला. जन्मापूर्वीच वडील मरणे, अशक्तपणामुळे लहानपणीच मरता मरता कसेबसे वाचणे, आईने दुसरे लग्न करूनही न्यूटनला आजोळी ठेवणे, तिथेही त्याला प्रेम न मिळणे वैगरे गोष्टींचे त्याच्यावर खोल परिणाम झाले. आईला व सावत्र वडिलांना घरासकट जाळून टाकण्याच्याही धमक्या न्यूटनने दिल्या होत्या.

न्यूटन लहानपणापासूनच उतोमोत्तम खेळणी बनवायचा , उंदराच्या गतीमुळे चालणारी पवनचक्कीही त्याने बनवलेली होती. १६६५ मध्ये तो केंब्रीज विद्यापीठातून बी.ए. उत्तींर्ण झाला. त्याचे गणिताचे गुरु सर आयझाक यांनी न्यूटनची बुद्धीमत्ता ओळखून त्याच्यासाठी गणितातल्या ल्युकेशीयन प्रोफेसर या अतिशय प्रतिष्ठीत पदाचा राजीनामा दिला. न्यूटनने जेव्हा एका वर्गाला व्याख्यान दिलं तेव्हा फक्त तीनच मुलं हजर होती , दुसरयाला एकही मुलगा नव्हता , पण हट्टाने न्यूटनने पुढील १७ वर्षे रिकाम्या वर्गाला व्याख्याने दिली.

१६६६ साली बल किंवा फोर्सेसची कल्पना मांडून न्यूटनने अ‍ॅरिस्टॉटलच्या कल्पनांचे राज्य उलथून टाकले. त्याने गतीचे ( Motion ) तीन नियम मांडले. त्याने मांडलेल्या समीकरणांचा उपयोग करून आता अतिशय अचूकपणे पुष्कळ हालचालीविषयी भाकीत करता यायला लागली. अ‍ॅरिस्टॉटलने काही शतकापूर्वी असे मांडले होते की सगळ्या निर्जीव वस्तूही सजीव वस्तुचेच अनुकरण करतात आणि त्याप्रमाणे हालचाल करतात. न्यूटनच्या नियमांमुळे त्या वस्तूंची इच्छा किंवा भावना काय आहेत आणि त्याप्रमाणे ते केव्हा कुठे पडतील किंवा कुठून कुठे आणि कसे जातील याविषयी उगाचच तर्क करत बसण्यापेक्षा आता त्याचे गतीचे नियम वापरून अचूकपणे त्यांच्या गतीविषयी बोलणे शक्य झाले. प्रत्येक खाली येणार्‍या दगडाचा किंवा पानाचा प्रवासमार्ग ( Trajectory ) हा त्यांचावरचा बलांची बेरीज करून आपल्याला आता काढता येऊ लागला. याचा औद्योगिक क्रांतीमध्ये आणि अनेक महत्त्वाच्या घडामोडींमध्ये उपयोग होणार होता. वाफेच्या इंगीनाची शक्ती असो , जहाजांची हालचाल किंवा वेग असो व कुठल्याही मोठ्या इमारतीतील कुठलीही वीट असो , या सर्वांवरील ताण ( Stress ) , घर्षण ( Friction ) , आणि इतर अनेक बलांचा विचार करूनच अनेक यंत्रांची रचना करणे शक्य होणार होते , आणि त्याच्या हालचालींविषयी भाकितही !यानंतर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाची नवीन थिअरी मांडली. वूल्ज्थोर्पला एका झाडाखाली बसला असताना एक सफरचंद पडताना त्याने पाहिले , आता सफरचंद खाली पडण्याचा प्रसंग हा काही वेगळा नव्हता, पण न्यूटनला तो वेगळा वाटला ,त्याने स्वत:शीच एक प्रश्न विचारला की , चंद्र पृथ्वीभोवती फिरताना
सरळ रेषेत का निघून जात नाही ? तसेच सर्व ग्रह सूर्याभोवती का व कसे फिरतात ? शिवाय त्याला असेही वाटले की ते बल जर झाडाच्या उंचीएवढ्या अंतरावर लागू पडत असेल , तर मग ते आणखी दूरपर्यंत लागू पडेल. अगदी वेगळ्या ग्रहापर्यंतही ! आणि मग त्याने त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांच्या द्वारे सगळ्या ग्रहांच्या हालचाली , भ्रमणे यांच्यावर विचार करून गणिते मांडायला सुरुवात केली. हा चंद्र सरळ रेषेत निसटून न जाता गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे पृथ्वीकडे आकर्षिला जातो. पण फळाप्रमाणे पृथ्वीवर आदळत नाही. गोफणीला लावलेला दगड केंद्रयामी ( Centripetal ) बलामुळे जसा आपल्याभोवती गोल फिरतो तसाच काहीसा गुरुत्वाकार्ष्णामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. एका क्षणार्धात हे विश्व चालवणारे ते अदृश्य बल ( Force ) न्यूटनने शोधून काढले होते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान माहिती.

विनंती- तुम्हाला लेखाच्या शेवटी (मागच्या आणि पुढच्या धाग्याची) लिंक देता आली तर वाचकांना सर्व माहिती मिळण्यास सुलभ जाईल. असो, पुढील लेखनांस शुभेच्छा.