मठरी..

Submitted by सुलेखा on 23 October, 2011 - 02:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी बारीक रवा.
१ वाटी मैदा..
अर्धी वाटी गरम तेलाचे मोहन..
१/२ चमचा मीठ..
१ चमचा तीळ..
१चमचा ओवा..
१ चमचा खडबडीत वाटलेले मिरे..
१ चमचा मेथीदाणा रवाळ वाटुन घेणे..
पाणी लागेल तसे..
तेल तळणीसाठी..

क्रमवार पाककृती: 

रवा,मैदा,मीठ,ओवा,तीळ,मिरे पुड,मेथीदाणा पुड गरम तेलाचे मोहन घालुन सगळे मिश्रण छान एकत्र करुन घ्या..मोहन सगळी कडे छान मिक्स झाले पाहिजे..
आता पाणी घालुन हे पिठ पुरीसारखे घट्ट भिजवुन घ्यावे..२० मिनिटे तसेच झाकुन ठेवावे..
कढईत तेल मंद आचेवर तापायला ठेवावे..
भिजवलेले पिठ तेलाचा हात लावुन मळुन घ्यावे..
लहान लहान गोळे [पुरी सारखे]करुन ठेवावे..साधारण १५ तरी होतील..
पाणीपुरी च्या पुरीएवढी पण थोडी जाड पुरी लाटावी..
त्यावर सुरी किंवा काट्याने टोचे मारुन घ्यावे..
एकावेळी ५-६ मठरी किंवा त्यापेक्षा जास्त [कढई व तेलाच्या आकारमानाप्रमाणे] तापलेल्या तेलात सोडुन मंद आचेवर तळाव्या.अगदी .हलका गुलाबी रंग दिसु लागला कि बाहेर काढुन टिशु पेपर /पेपर वर काढुन पसराव्या..
थंड झाल्या कि डब्यात भरुन ठेवाव्या..

वाढणी/प्रमाण: 
एकावेळी ४ तरी हव्यातच..
अधिक टिपा: 

या मठरीत मेथीदाण्या ची रवाळपुड घातली आहे त्याची चव छान लागते..कडु लागत नाही..
मिर्‍याचा खडबडीत करुन घातले आहेत त्याचा सुरुर मस्त लागतो..
आवडत असल्यास प्रत्येक मठरीच्या मधे एक मिरा ठेवुन त्यावर लाटण्याने हलकेच मारायचे [मिरा चेपला जातो]
मेथीची पाने चिरुन ती पिठात भिजवताना टाकावी..
या मठरी तेल पीत नाही..खुट्खुटीत होतात व टिकतात..

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती,मीठ / तिखट /मीरे/हिरवी मिरची/आले/लसुण यांचे प्रमाण चवीप्रमाणे कमी-जास्त घ्यायचे असते..थोडेसे चमच्याच्या आकारावर वर ही अवलंबुन असते..तेव्हा चव पाहुन तसे घ्यावे..
बिल्वा,प्रवासाला जाताना तर फारच छान आहेत..तेलकट अजिबात लागत नाही..अति भूक लागल्यावर २ खाल्ल्या कि भूक थोडी शांत होते..

माझी पंजाबी शेजारीण करुन द्यायची मला. रेसिपी विचारली कि म्हणायची, मै हू ना ! जब खाने का जी करे, बोल दो.

नेहेमीप्रमाणे छान आहे रेसिपी. तुमच्या रेसीपीज हटके असतात आणि चविष्ट.

करून देणारी पंजाबी शेजारीण नसल्यामुळे आम्हालाच कराव्या लागणार. आणि मग म्हणतो, हम है न! Happy

स्वरुप्,मठरी तळुन झाल्यावर मॅगी मसाला भुरभुरला तर चिकटुन राहील..माझ्यासाठी नवीन आहे तेव्हा मी पण करुन पाहीन..

आरती,मीठ / तिखट /मीरे/हिरवी मिरची/आले/लसुण यांचे प्रमाण चवीप्रमाणे कमी-जास्त घ्यायचे असते >> तुम्ही स्पेसिफिक १/२ चमचा लिहिले म्हणुन विचारले. बरेचदा चवीप्रमाणे मीठ असे लिहिलेले असते.

पुर्‍या करताना कधि आपण चिमुटभर मीठ घालतो, कधी चवीप्रमाणे, यात नक्की काय अपेक्षित आहे ते मला कळाले नव्हते. गैरसमज नसावा.
असो.
मठर्‍या केल्या, मस्त झाल्या, तळतानाच मिर्‍याचा आणि मेथीचा मस्त वास येत होता. Happy
धन्यवाद.

दीपा, मेथी /मेथीची पाने/कसुरी मेथी नाही घातली तरी चालेल..काहीही न घालताहि मठरी छान लागतात..तीळ,ओवा घालुन ही छान लागतात..
मृण्मयी ,बेक करुन पहा..१-२ दिवसानंतर ही तशाच खस्ता लागतात क ते सांग..तसे या मठरी तळताना तेल जास्त लागत नाही..
जागु,धन्यवाद

सुलेखा, बेक्ड मठरी मस्त झाली.

तुम्ही सांगितलेलं प्रमाण घेतलं. फक्त गरम तेलाचं मोहन न घालता 'अर्थ बॅलन्स' नामक बटर सब्स्टिट्यूट आणि सा(व)र क्रीम घातलं. जरासं इनो फ्रूट सॉल्ट घालून बर्फाच्या पाण्यात भिजवलं. घट्टं मळून दोन तास झाकून ठेवलं. नंतर मोठी पोळी लाटून चाकूने लांब पट्ट्या कापल्या. काट्याने त्यांना छिद्र करून ३०० डि. फॅ. वर बेक केलं. रंग बदलल्यावर सगळ्यांना उलटं केलं. पुन्हा बेक केलं. (लागलेला वेळ लक्षात ठेवला नाही.) २ दिवसांपूर्वी केलेली मठरी आजही खुट्खुटीत आहे.

धन्यवाद!

मस्तच लागतात ह्या मठर्‍या. तेलकट नव्हत्या झाल्या. मेथी दाणे आणि मिरं घातल्याने चव मस्त आली होती.