केनयाची ऑर्किड्स - भाग १

Submitted by दिनेश. on 21 October, 2011 - 05:16

काल आमच्याकडे, केनया ऑर्किड सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन भरले होते. अप्रतिम फुले होती.
आधीच नैरोबीची माती आणि हवामान फुलझाडांना फार मानवते आणि हि फुले तर खास
प्रदर्शनासाठीच जोपासलेली होती. माझा मलाच हेवा वाटावा, अशी स्थिती होती खरी काल.

पण...

पण हे प्रदर्शन एक बंदिस्त हॉलमधे होते. नैसर्गिक प्रकाश नव्हताच. (आजकाल आमच्याकडे
बाहेरही उजेड नसतोच. जी प्रकाशयोजना होती ती मंद होती कारण प्रखर प्रकाशात फुले
कोमेजली असती.

दुसरे म्हणजे हे काहि एका खास थीमचे प्रदर्शन होते, त्यामूळे प्रत्येक फूल स्वतंत्ररित्या
ठेवलेले नव्हते. कमी जागेत दाटीवाटीने फुले होती, आणि मला तर प्रत्येक फूल देखणे
दिसत होते. (थीमचे पण काही फोटो आहेत.)

फ़ोकस करताना एखादेच फ़ूल फ़्रेममधे घेणे हे जवळजवळ अशक्य होते कारण दुसरे फूल
जवळच असायचे. फ़्लॅश वापरता येत नव्हता कारण त्याने मूळ रंगसंगती झाकली जात
होती.

शिवाय सजावटीसाठी वापरल्या गेलेल्या वस्तू (प्लॅस्टीक क्रेट्स, दोरखंड, दगड, शहामृगाची अंडी, खोटे प्राणी, वॉशिंग मशीन, चमकदार कपडे, पूजेचे सामान ) निदान माझातरी रसभंग करत होत्या.

त्यामूळे हे फोटो नेहमीसारखे स्पष्ट नाहीत. खरे तर मी प्रत्यक्ष जे बघितले त्यातले शतांशानेही
मला इथे दाखवता येत नाही (संपुर्ण हॉलमधे या फुलांचा मनमोहक सुगंधही पसरला होता.)
तरी पण यावरुन थोडीशी कल्पना येईलच. थोडाफार स्पष्टपणा यावा म्हणून मी साईझ लहान
ठेवली आहे.

खुप वर्षांपुर्वी सिंगापूरच्या ऑर्किड गार्डनमधेही असाच हरखलो होतो पण त्यावेळी डिजिटल
कॅमेरा अस्तित्वातच नव्हता, आता परत जायला पाहिजे तिथे.

हे फोटो तीन भागात देतोय.
(कुठल्याही फुलाला कमी लेखू नका रे प्लीजच. जर ते इथे सुंदर दिसत नसेल तर मला त्याचा नीट फोटो काढता आला नाही, असेच समजा.)

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

28

29

30

गुलमोहर: 

ऑर्किड्स - वॉव, काय सह्ही आहेत........ एक सो एक.... ही फुले सुगंधी असतात हे मात्र आताच कळले.

सही

सुंदर !
दिनेशदा, श्रीलंकेत पेरदेनिया राष्ट्रीय उद्यानात सुद्धा असलेच एक से एक ऑर्किडस होते. माझ्या आळशीपणामुळे मी अजून ते फोटो निसर्गाच्या बीबीवर टाकले नाहीयेत. जमवते लवकर.

ऑर्किड म्हणजे काय तेही लिहा... गौरीची फुले म्हणजे ऑर्किड का? ( सगळी फुले तशीच दिसतात.. Proud )

फारच सुंदर... अप्रतिम .. अवर्णनीय अशीच आहेत... ही फुले...

ही सुगन्धी असतात हे मला पण माहीत नव्ह्ते दिनेशदा:)

छान Happy

अतिशय सुंदर!

(कृपया ऑर्किड्स या शब्दाचा नेमका अर्थ सांगावात)

आपण कोणत्याच फुलाला कमी लेखायचे नाही असे म्हणला आहात तरीही निदान एखाद्या फुलाला सर्वोत्कृष्ट म्हंटल्यास हरकत नसावी व तसे फूल मला पहिले फूल वाटत आहे.

मराठीत यांच्यासाठी आमरीची फुले किंवा विंचवाची फुले असा शब्द वापरतात. ऑर्किड हा एक गट आहे. यातली बहुतेक झाडांच्या वरच्या फांद्यांवर वाढतात पण ती बांडगुळे नव्हेत. झाडाच्या खोडाचा निव्वळ आधार घेतात. यांना आपले स्वतःचे खोड नसते. अधांतरी वाढणारी ऑर्किड्स आपल्यासाठीचे पाणी व क्षार हवेतूनच मिळवतात. त्यासाठी त्यांची मूळे खास विकसित झालेली असतात. काही ऑर्किड्स जमिनीवर तर काही जमिनीखालीही फुलतात.

पण खुपच आकर्षक रंग आणि आकार असूनही त्यांचे अचानक भरभरुन फुलणे, यामूळे ती गूढ गणली जातात.
मुंबईला नॅशनल पार्कात, ठाण्याला येऊरला, आणि वसईला किल्ल्याच्या परीसरात भरपूर ऑर्किड्स आहेत.
पूण्यात कदाचित कोरड्या हवेमुळे ती तग धरत नसावीत, पण बहुतेक कोकणपट्टीत ती आहेतच. अर्थात शोधावी लागतात.