उपयुक्त माहिती.

Submitted by supriya19 on 8 August, 2008 - 12:43

जुन्या हितगुजवर हा धागा होता. ईथे दिसला नाही आणि एक प्रश्न होता म्हणुन मी हा धागा सुरु केला.
admin, काही चुक झाली असेल तर तुम्ही हा विभाग हलवु शकता.

माझ्याकडच्या नाँनस्टीक भांड्यांवर बाहेरील बाजुने पिवळसर्-लालसर आणि तळाला(बाहेरील) काळे डाग पडले आहेत. हे डाग कसे काढायचे याविषयी कोणि काही माहीती देउ शकेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>हे लोक घरी नसतात तेव्हा त्यांना असली कामे पडत नाहीत म्हणून असतील तेव्हा खुशाल असली कामे सांगावीत. नाहीतर एरवी नाहीत म्हणून आपण करायची आणि असताना फक्त आत्ताच आहेत म्हणून आपणच?<<< अगदी अगदी ! लालू धन्यवाद ! मी ही दाखवीन म्हणते Proud

वा लालु- उत्तम पोस्ट. सहमत आहे. सुमॉ- तुम्ही दाखवाच.
आणि व्-हाडी नवरा हे पटलं पण रच्याकने- माझाही नवर व-हाडी आहे, पण घरकाम करतो. Happy

लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे, म्हणजे चांगलेच आहे......

http://www.the-gi-diet.org/lowgifoods/

मी त्या पाकिस्तानी पद्धतीने काल भात केला होता... भात छान मोकळा झाला होता. पाणी काढल्यावर तीन चार मिनिटातच मस्त फुलला..

जास्तीचे पाणी काढले , पण ते टाकणे जिवावर आले.. ते पिऊन पाहिले तर अगदी मस्त भाताची पेज होती.. Happy .. पेजेमध्ये भातामधील बी जीवनसत्वे जात असणार, ( जी मज्जासंस्थेला चांगली असतात.) कारण ही असली पेज टाकून देऊन उरलेला भात खातात, म्हणून तर पाकडे बथ्थड आणि बधिर डोक्याचे झाले असणार ! Lol Proud

जागो, पाकडे बथ्थड आणि बधिर डोक्याचे म्हणुन कस चालेल, स्वातंत्र्य मिळाल्यापासुन त्यांनीच भारतीय कसे बथ्थड आणि बधिर डोक्याचे आहेत हे सिध्द केले आहे.:अरेरे: (अर्थात आपल्या राजकारण्यांची कृपा).
विषयांतराबद्दल क्षमस्व.

रुपा, बरोबर आहे पण जागो रहातात तिथे दुसरा बासमती मिळत नाही असे वाचले. cbdg

सुमॉ आणि इतर, मला असं वाटतं की पूर्ण आठवडा बाहेर असल्यामुळं मुलांबरोबरही वेळ मिळत नसणार तर वीकएन्डला काही अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी त्यांच्याबरोबर गेलं तर तेही साध्य होईल, नाही का? शेवटी वीकएन्डला परत येणारे घराच्या चार भिंतीसाठी नाही येत, आपल्या माणसांत वेळ घालवायचा म्हणून येतात. आता सुमॉ खूपच बिझी असते म्हणते म्हणून अगदी सगळ्याच नाही पण काही ठिकाणी जरी बाबाला पाठवले तर तिला वेळ मिळू शकेल. आणि आठवडाभर बाहेर जेवावे लागते ते निदान घरी असताना घरचे जेवण मिळेल.
यात 'घरी आल्याबरोबर कामाला लावावे' असं काही सांगण्याचा हेतू नाही बरं का. Happy

(वर लिहिलेले 'उपयुक्त माहिती' मध्येच मोडते. Wink )

मी कधी कधी टोमॅटो सुप,वाटाण्याचे सुप, बटाट्याचे पराठे, मुळ्याचे पराठे ,गार्लिक ब्रेड,लझानिया
फ्रीझ करते . पण मला त्या पेक्षा एखादा,दोन दिवस अगोदर पदार्थ तयार ठेवणे, किंवा सगळ्यात महत्वाच पुर्वतयारी असण जास्त बर वाटत. २०/२५ मिनिटात स्वयंपाक तयार.:)
पास्ता, सलाद, सुप असा बेत तर अगदी पटकन करता येतो.
भरली वांगी ,दोडका करायची असतील तर मसाला भरुन airtight डब्यात ठेवते. आणि ऐनवेळी फक्त फोडणी टाकते.
w/e ला मुलीला इतर activities ,क्लासेस इत्यादीला नवरा घेवुन जातो. mommy विषयी तक्रारी discuss करायला त्यातला बराच time युटीलाईज होतो असा माझा दाट संशय आहे. Proud

सुमॉ, माझा असा अनुभव आहे की सर्व पदार्थ एकाचवेळी करत बसले तर दमायला तर होतेच पण त्यामुळे पदार्थाची चव पण बिघडते. मग वाया जाते अन्न.

म्हणुन मी भाज्या कापुन ठेवते किवा सरळ फ्रोजन कापलेल्या भाज्या आणुन ठेवते म्हणजे पटकन फोडणी दिली की झाले. डाळी, मोड आलेली धान्ये शिजवुन ठेवली की पुन्हा फोडणी आणि थोडासा मसाला घातला की झाले. असे सांबार पण झटकन होतेच. वाटण प्रकार मी कमीच करते. ३-४ दिवसाची आले-लसुण पेस्ट तयार करुन ठेवणे मला बरे वाटते म्हणजे चव ताजी असेतोवर संपवता येते. पोळ्या मात्रा ताज्या कशा ठेवायच्या ते अजुन माहीत नाही म्हणुन ताज्याच करते. इडली-डोशाचे पीठ तर तयार करतोच आपण. सुप साठी लेटुस,गाजरे, टोमॅटो, बिन्स असे फ्रीज मधे असले की झाले.

अर्थात मी स्वयांपाकाच्या बाबतीत इतकी कुशल नाही म्हणुन माझे प्रयोग साधेच असतात.
शोनु ने पण चांगले लिहिले आहे.

ड्राय यिस्ट अजुन वापरण्यास चांगली आहे हे कसे ओळखायचे(exp. date सोडुन) यिस्ट साखरेच्या पाण्यात टाकल्यावर फसफसते म्हणजे वर पांढरा फेस येतो का? वास कसा येतो उग्र्,आंबट कि आणखि कसा..
(मी यीस्ट वापरुन पिझ्झा करणार होते पण, उग्र असा नाकात जाणारा वास येत होता शिवाय मिश्रण अजिबात फसफसले नाही शंका आली म्हणुन नाहि वापरले.exp. date च्य आत वापरले होते)

वासाने नाही प्राजे, किती "मिनीटात" फेसाळत त्या यिस्टला फीड केले की. म्हणजेच योग्य तपमानाचे पाणी व साखर घूसळून त्यात यिस्ट टाकले की ते ५ मिनीटात फेसून वर आले पाहिजे.
वास येत असेल तर खराब झाले असेल. वेळ लागला तर तेवढे अ‍ॅक्टिव नाही राहिले. खूप गरम पाणी असेल तरी असे होते. नाहीतर पुर्ण मेले असले तर फेस येत नाही व नुसते एक दोन बुडबुडे.

किव्क टेस्ट करायची असेल तर त्याला एक यिस्टी वास असेल पण आंबूस नसेल. (कठिण आहे हे समजणे असे नुसते लिहुन). Happy

लवंग आणि त्रिफळा यांच्यातला दाणा आणि देठ (त्रिफळाचे फुल) यातील नक्की काय जास्त उपयोगी असते? कारण माझ्याकडच्या स्टॉकमध्ये दाणे वेगळे उरलेत ते टाकु की ऩको? त्रिफळाचे तर मी तरी फक्त फुलच वापरते (मच्छीला). तर त्या दाण्यांचे काय करता येईल?

हो हो तिरफळच म्हणायचय मला... मला वाट्ल तिरफळ हा गावचा शब्द असेल (अपभ्रंश) म्हणुन मी त्रिफळा लिहील...

लवंग आणि तिरफळ यांच्यातला दाणा आणि देठ (तिरफळाचे फुल) यातील नक्की काय जास्त उपयोगी असते? कारण माझ्याकडच्या स्टॉकमध्ये दाणे वेगळे उरलेत ते टाकु की ऩको? तिरफळाचे तर मी तरी फक्त फुलच वापरते (मच्छीला). तर त्या दाण्यांचे काय करता येईल?

प्लीज कोणीतरी या प्रश्नाचे ऊत्तर द्यावे............

तिरफळ che sangu shakate tyatle फुल उपयोगी असते. DaNe waaparat naaheet.
( English madhye lihilya baddal sorry.Achanak marathi type hot nahi aahe kay problem asel?)

लवंग (जी आपण वापरतो ती) म्हणजे लवंगिच्या झाडाचि कळि आणि ज्याला तुम्हि दाणे म्हणताय त्या पाकळ्या आहेत फुलाच्या कळि उमलेलि नसल्याने एकावर एक असतात त्या आणि जर फुल फुलु दिले तर सुट्या होतात पण त्यातिल औषधि तेलाचे प्रमाण तोपर्यंत कमि होते म्हणुन तसे करत नाहित. तात्पर्य लवंगिचे दाणे वापरायला काहिच हरकत नाहि.

Pages