फोटोतली व्यक्ती ओळखा स्पर्धा - २

Submitted by माध्यम_प्रायोजक on 13 October, 2011 - 00:23

हे बघा... अगदी परग्रहावरचं कुणीतरी दिसतंय ना? नाही हो, व्यक्ती इथलीच आहे. ओळखू येतेय का तुम्हांला?

photoolakha2.jpg

'देऊळ'च्या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा गमतीशीर खेळ. छायाचित्रातली व्यक्ती ओळखायचा हा खेळ आहे.

वर दिलेल्या छायाचित्रातला कलाकार ओळखा आणि बक्षीस म्हणून मिळवा 'देऊळ'ची ध्वनिफीत!!!

एकापेक्षा अधिक स्पर्धकांनी बरोबर उत्तर दिलं, तर कोणाला बक्षीस द्यायचं हे लकी ड्रॉनं ठरवण्यात येईल.

हा एक गंमतखेळ आहे. तुमच्या सूचना आम्ही लक्षात घेतल्या आहेत, सर्व प्रतिसादांची लगेच नोंद घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. संपादनाची सोय बंद करणं, हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. Happy

या स्पर्धेचं अचूक उत्तर उद्या सकाळी जाहीर केलं जाईल.

करा तर मग सुरूवात...

विषय: 
Groups audience: 

अवधुत गुप्ते

शंकर महादेवन नक्कीच नाही, कारण शंकर महादेवन माईक नेहेमी डाव्या बाजुने पकडून गात असतो.

>>>शंकर महादेवन नक्कीच नाही, कारण शंकर महादेवन माईक नेहेमी डाव्या बाजुने पकडून गात असतो. Happy
पण अवधुत गुप्ते पण नक्कीच नाही, कारण उजव्या हातात मनगटावर तुळशीच्या माळेसारखी माळ घालण्याइतपत सज्जन-धार्मिक-देवभोळा तो नक्कीच वाटत नाही Wink
माझ्यामते हा "गिरीश कुलकर्णी" च Proud

Pages