फोटोतली व्यक्ती ओळखा स्पर्धा - २

Submitted by माध्यम_प्रायोजक on 13 October, 2011 - 00:23

हे बघा... अगदी परग्रहावरचं कुणीतरी दिसतंय ना? नाही हो, व्यक्ती इथलीच आहे. ओळखू येतेय का तुम्हांला?

photoolakha2.jpg

'देऊळ'च्या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा गमतीशीर खेळ. छायाचित्रातली व्यक्ती ओळखायचा हा खेळ आहे.

वर दिलेल्या छायाचित्रातला कलाकार ओळखा आणि बक्षीस म्हणून मिळवा 'देऊळ'ची ध्वनिफीत!!!

एकापेक्षा अधिक स्पर्धकांनी बरोबर उत्तर दिलं, तर कोणाला बक्षीस द्यायचं हे लकी ड्रॉनं ठरवण्यात येईल.

हा एक गंमतखेळ आहे. तुमच्या सूचना आम्ही लक्षात घेतल्या आहेत, सर्व प्रतिसादांची लगेच नोंद घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. संपादनाची सोय बंद करणं, हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. Happy

या स्पर्धेचं अचूक उत्तर उद्या सकाळी जाहीर केलं जाईल.

करा तर मग सुरूवात...

विषय: 
Groups audience: 

आधीच्या 'फोटोतली व्यक्ती ओळखा' स्पर्धेच उत्तर कुठे जाहिर केलय कळेल का??>>>शुभे, "फोटोतली व्यक्ती ओळखा स्पर्धा - १" चे उत्तर त्याच धाग्यावर पान क्र. ४ वर जाहिर केलंय. Happy

बरोबर उत्तरः स्वानंद किरकिरे.

बरोबर उत्तर दिलेल्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला लॉतरी पद्धतीने बक्षीस देण्यात येईल. विजेत्यांचे नाव १ नोव्हेंबरला प्रकाशीत करण्यात येईल.

उत्तर जाहीर करण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. आधिचे उत्तर त्याच धाग्यावर शेवटी प्रतिसादात दिले आहे.

Pages