'गावाकडची छायाचित्रं' - प्रकाशचित्र स्पर्धा - १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 12 October, 2011 - 02:17

'माझे गाव' हे शब्द शहरातल्या जीवनाच्या लढाईत अडकलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे एका क्षणात काही रम्य दृश्यं उभी करतात.. गावातली पहाट, पाखरांचे आवाज, चुलीतून निघालेला धूर, क्वचित रहाटाचे / पंपाचे आवाज, शेतावर, कामावर निघताना एकमेकांना दिलेल्या हाळ्या, गावची शाळा, मास्तर, गावचा पार, चावडी, जत्रा आणि देऊळ! तसंच, गावाचे नमुनेही- काही निरागस, काही बेरकी, तर बरेचसे उद्याच्या चिंतेने ग्रासलेले.

स्मृती जपायला आता मनाबरोबरच कॅमेर्‍याची भक्कम आणि उत्तम साथ आपल्याला मिळालेली आहे. तुमच्या मनात आणि अर्थातच कॅमेर्‍यात बंदिस्त असतील गावतल्या अनेक रम्य आठवणी.. तर अशीच गावाकडची खास निवडक छायाचित्रं इथे सगळ्यांबरोबर पाहूया.. इथे पोस्ट करा, तुम्ही काढलेली गावाच्या आयुष्याची छायाचित्रं.. सगळे मिळून त्या विश्वात काही क्षण डोकावून पाहूया..

स्पर्धेचे नियम -

१. एक आयडी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकेल.
२. तुमच्या प्रवेशिका तुम्ही याच बाफवर पोस्ट करायच्या आहेत.
३. मान्यवर परीक्षकांचा निकाल १ नोव्हेंबर, २०११ला जाहीर केला जाईल.

स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं!!!

पहिलं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी
दुसरं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं.
तिसरं बक्षीस - 'देऊळ'ची ऑडिओ सीडी.

तर मग सरसवा आपले कॅमेरे, आणि जिवंत करा गावाकडचे क्षण!!!

विषय: 
Groups audience: 

Pages