'गावाकडची छायाचित्रं' - प्रकाशचित्र स्पर्धा - १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 12 October, 2011 - 02:17

'माझे गाव' हे शब्द शहरातल्या जीवनाच्या लढाईत अडकलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे एका क्षणात काही रम्य दृश्यं उभी करतात.. गावातली पहाट, पाखरांचे आवाज, चुलीतून निघालेला धूर, क्वचित रहाटाचे / पंपाचे आवाज, शेतावर, कामावर निघताना एकमेकांना दिलेल्या हाळ्या, गावची शाळा, मास्तर, गावचा पार, चावडी, जत्रा आणि देऊळ! तसंच, गावाचे नमुनेही- काही निरागस, काही बेरकी, तर बरेचसे उद्याच्या चिंतेने ग्रासलेले.

स्मृती जपायला आता मनाबरोबरच कॅमेर्‍याची भक्कम आणि उत्तम साथ आपल्याला मिळालेली आहे. तुमच्या मनात आणि अर्थातच कॅमेर्‍यात बंदिस्त असतील गावतल्या अनेक रम्य आठवणी.. तर अशीच गावाकडची खास निवडक छायाचित्रं इथे सगळ्यांबरोबर पाहूया.. इथे पोस्ट करा, तुम्ही काढलेली गावाच्या आयुष्याची छायाचित्रं.. सगळे मिळून त्या विश्वात काही क्षण डोकावून पाहूया..

स्पर्धेचे नियम -

१. एक आयडी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकेल.
२. तुमच्या प्रवेशिका तुम्ही याच बाफवर पोस्ट करायच्या आहेत.
३. मान्यवर परीक्षकांचा निकाल १ नोव्हेंबर, २०११ला जाहीर केला जाईल.

स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं!!!

पहिलं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी
दुसरं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं.
तिसरं बक्षीस - 'देऊळ'ची ऑडिओ सीडी.

तर मग सरसवा आपले कॅमेरे, आणि जिवंत करा गावाकडचे क्षण!!!

विषय: 
Groups audience: 

अमित मोहरे तुमचे पहिले दोन फोटो फार आवडले.
पहिला फोटो तुम्ही या आधी पण टाकला होता का? मायबोलीवरच बघितल्यासारखा वाटतोय.

बर्‍याच दिवसानी आलो. फोटोच्या धाग्यावर वेळात् वेळ काधुन मी नजर ठेवत होतो.>>>>झकास, वेलकम ब्याक Happy

इतक्या मोठ्या कालावधीत काढलेले फोटोच कौतुक कोणाकडुन ऐकणार जर अपलोड करायला वेळच नाही मिळाला तर.>>>>सुरूवात कर आम्ही आहोतच कि Happy Happy

>>>> मायबोलीकरांनो या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद द्या >>>>
तिनच फोटु टाकायची परवानगी हे, त्याला काय "भरघोस" म्हणायच होय?>>>लिम्बुदा, मला "सगळ्या मायबोलीकरांनी" सहभाग घ्या असं म्हणायंच होतं. Happy

अमित मोहरे, दुसरा फोटो प्रचंड आवडला Happy

झाडांची गर्द सावली लपेटुन शांत पहुडलेल माझ घर.....
DSCN0761-1.JPG

देवघरातील पुर्वजांच्या पतवा...
DSCN0752.JPG

आणि हा कोकणातला वेडा पाऊस....
DSCN0736.JPG

माझं गाव - हलशी (जि.बेळगाव) - आमराईतून घराकडे जाणारी पायवाट

IMG_0778.jpg

'धन्वंतरी' गल्लीतलं आमचं घर 'आत्रेय सदन'

IMG_0780.jpg

'धन्वंतरी' गल्लीच्या सुरुवातीला असलेलं 'कदंब'कालीन नृसिंह-वराह मंदीर

DSC02753.jpg

मी तिनच + डिस्काऊण्टमधे जादाचा एक असे फोटो टाकतोय! Proud

१) तर, हे रेडकू
gaavaakaDil jagaNe redaku-small.JPG

२) ही पावसाळ्यापूर्वीची तयारी
gaavaakaDil jagaNe pavasaLyachii tayari-small.JPG

३) ही २१व्या शतकाकडे जाण्याची तयारी.... Proud
gaavaakaDil jagaNe 21vya shatakaakaDe-small.JPG

४) आणि डिस्काऊण्ट मधे हे बघा "दो बिघा जमिनीचे" कारभारी कारभारीण
gaavaakaDil jagaNe do bigha jaminiche kaarabhaarii kaarabhaariiN-small.JPG

(नोटच प्लिजचः रेडकू सोडून बाकी सर्व फोटुत लिम्ब्या आहे. Proud अर्थात, रेडकूचा फोटू मीच काढलाय, पण "अरे बाबान्नो, कुणीतरी घ्या तो क्यामेरा अन आतातरी काढा माझा फोटू" असे सान्गुन बाकीचे फोटु "जो कोण हाती सापडेल", त्याचेकडून काढून घेतलेत.
काये ना, गावाकडे देखिल, अमके काम फक्त अमकाच करु शकतो असे असले तरी त्याच्या हाताखाली वगैरे मात्र, कोणत्याही "कामात" कोणीही जुम्पला जाऊ शकतो, तसच काहीस हे)

स्पर्धा आहे म्हणून हात आखडता घेतलाय मी. पण या फोटोतल्या सर्व ठिकाणी मला जायची ईच्छा होतेय एवढे मात्र नक्की !

>>> पण या फोटोतल्या सर्व ठिकाणी मला जायची ईच्छा होतेय एवढे मात्र नक्की ! <<<< आँ??? Lol
आऽरंऽऽ बाबोऽ, तुमच्यात येकवीसाव्व शतक आल नय व्हय अजुन? Wink काय राव खेचताय आमची, तरी बर म्हमईत र्‍हाता नव्ह तुमी? Proud

अजय - दोस्ती झकास Happy
लिंबू - रेडकाचा फोटो आवडला.
विनार्च - पतवा म्हणजे काय?
इंद्रा, तुझे दोनही फोटो आवडले एकदम. भिवरी गाव मस्त दिसतंय!

रत्नागिरीतील एक गाव घाटिवळे
कुणीतरी आपला फोटो काढतोय याचच अप्रुप वाटतय यांना

या काचेतुन सर्व सुंदर दिसतय पण बाहेर जग निराळच आहे.

असुन या जगात मी का एकाकी, करुन बेरीज पिढ्यांची उरली वजाबाकी.

हा आमच्या सोनगाव (चिपळुन) च्या ग्रामदैवत रामवर्दयिनी देवीच्या मंदीराबाहेरचा परीसर.

Photo0301.jpg

ही आमच्या सोनगावच्या घराची ओटी आणि त्यावरचा झोपाळा

DSC02684.JPG

ही गावात होळीला निघणारी पालखी

DSC02491.JPG

Pages