भारतीय लोकसंगीत

Submitted by माधव on 12 October, 2011 - 02:07

प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे त्या देशाचे लोकसंगीत. भारताला तर लोकसंगीताची समृध्द परंपरा आहे. भारतीय अभिजात संगीताचा उगम या लोकसंगीतामधूनच झाला. पण दुर्दैवाने वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरातल्या माणसांची या संगीत प्रकाराशी फारकत होत गेली. आज मला महाराष्ट्रातल्याच लोकसंगीताची पुरेशी ओळख नाही. मराठी लोकसंगीत म्हटले की फक्त लावणी आणि कोळीगीतेच समोर येतात. पोवाडा, भारुड, गोंधळ असे अनेक प्रकार आज सहसा ऐकू येत नाहीत. वासुदेवगीते, ओव्या हे प्रकार तर त्यापेक्षाही दुर्मिळ.

लोकसंगीताचे शब्द, त्यांचे अर्थ, लोकसंगीताचे प्रांतवार प्रकार आणि त्यांचे संदर्भ, आज बाजारात उपलब्ध असणारे ध्वनीमुद्रीत पण अस्सल (अनुराधा पौडवालांच्या आवाजातले नव्हे) लोकसंगीत या सर्वांची चर्चा करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सस्नेह आमंत्रण.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकमें कबीर.... कबीर प्रोजेक्ट च्या अंतर्गत पाकिस्तानातील सूफी काव्य गायक अरीफ भाईंनी गायलेले.... (हद अनहद मधील एक क्लिप)

भला हुआ मेरी गगरी फूटी

गुरु बिन कैसे गुन गांवे
गुरु ना माने तो गुन नहीं आवे
और गुनियन में बेगुनी कहावे

भला हुआ मोरी गगरी फूटी
मैं पनिया भरन से छूटी
अरे मोरा सरसे टली बला हो...

कबीरा कूँआ एक हैं
पानी भरे अनेक
अरे भांडे में ही भेद है
पानी सब में एक

तो भला हुआ मोरी गगरी फूटी!
मैं पनिया भरन से छूटी!

राम नाम खूंटी गाडी सूरज ताना तंता
चढते उतरते दम की खबर ले फिर नहीं आना बनता कबीरा....

माला जपूँ ना कर जपूँ और मुखसे कहूँ ना राम
राम हमारा हमें जपे रे हम पायो विश्राम कबीरा

हद हद टपे सौं औलिया और बेहद टपे सौं पीर
हद अनहद दोनो टपे सौं वाको नाम फकीर कबीरा....

हद हद करते सब गये और बेहद गयो ना कोय
अनहद के मैदान में रहा कबीरा सोये... कबीरा

भला हुआ मोरी माला टूटी मैं राम भजन से छूटी रे...

@ अरुंधती कुलकर्णी
मांगणियार लोकांनी गायलेलं केसरिया बालम मस्तच. धन्यवाद.

शोभा गुर्टु यांनी गायलेलं राजस्थानी गीत.

http://www.youtube.com/watch?v=LvV9aqtGVh8

यातले photos पण लाजवाब...
गीताचे बोल सुद्धा यात आहेत.

Pages