तारे जमीन पर

Submitted by स्वातीपित्रे on 11 October, 2011 - 09:44

अग तुला घाबरण्याचे काही एक कारण नाहीये, अज्जीबात नाही, फोनवर एक छोटासा आवाज बोलला.आणि तेही मी घाबरलेली नसतानाच..मला फ़क़्त तशी अक्टिंग करायची होती..पण तो फोन वर सुटलेलाच होता..म्हणाला छोट्या मला, अग माणूस तर शंभर वर्ष जगतो, आपण १० हजार बिल्लीअन इअर्स बद्दल बोलतोय..हा लहानगा आवाज म्हणजे सहा वर्षांचा एक माझ्या भावाचा संगीत शिक्षेचा विद्यार्थी...आणि हा मग माझी का समजूत घालतोय? मी तर त्याला ओळखतही नाही..

तो छोट्या आतापासूनच आकाशाचा वेध घेतो..तारकांचे शास्त्र म्हणजे astronomy मध्ये रस घेतो आणि समजतो कि सर्वच जण त्याच्या ह्या भाकीताने अथवा सिद्धांताने घाबरलेले आहेत आणि हो, म्हणूनच तो सर्वांना समजावतो ही..कि सुमारे १० हजार बिल्लीअन वर्षांनंतर सर्व सृष्टी नष्ट होणार आहे..आणि तेंव्हा सूर्य सुद्धा जगायचा थांबेल तेंव्हा हे सगळा होईल आणि आपण आता ह्या मोठ्ठ्या संकटाला घाबरून जाणे योग्य नाहीच आहे ..कारण तर्क असा आहे की आपण तर अशी ही क्षणभंगुर माणसं, ह्या विश्वाच्या पसाऱ्यात..आणि एवढा वर्षांच्या मोठ्या timeline शी तुलना केली तर आपण एकदम सुरक्षित आहोत..आपल्यालाहा सृष्टीचा विस्फोट बघायला लागणारच नाहीये सो स्वातीताई तू अज्जीबाआआआत घाबरू नकोस..सकाळी सकाळी घाईगडबडीत असताना हा फोन येऊन अशी धम्माल उडवली ना..

मला सुद्धा मग अक्टिंग ला चेव चढला. त्याला म्हंटला, अरे doomsday च्या साध्या कल्पनेने सुद्धा माझी रात्रीची झोप गेल्ये बघ..मला तुझ्या music teacher ने सांगितले काल..काही सुचत नाहीये मला.. ..मग मीच त्या लहानग्या कडून खूप आधार देणारे बोल ऐकत राहिले..बरेच ताराकांबद्दल काही बोलला.. आणि मी Mr. तारे जमीनपर च्या गप्पा ऐकत राहिले....

गुलमोहर: 

छोट्या सही आहे.. असेच अवांतर.
पण सुर्य ४.६ बिलियन वर्षाचा आहे. त्याचे एकुण आयुष्य सध्याच्या माहितीनुसार १० बिलियन च्या आसपास असेल. मध्ये इतर कोणतीही वाइट घटना घडली नाही तर अजुन ४ बिलियन वर्ष पृथ्वीवर जीवसृष्टी राहिल.