मोडायचे नियम

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

परागकण च्या येका प्रकाशचित्रा वर मी दिलेल्या प्रतिक्रियेवर ultimatebipin यांची माझं मत पटत नसल्याची प्रतिक्रिया आली
http://www.maayboli.com/node/2940#comments
अर्थात कलाकार स्वतःला कोणत्याही नियमात बांधुन घ्यायला तयार नसतात पण आम्ही शिकाऊ लोकं (न्-कलाकार) मात्र नियम शिकायचा प्रयत्न करतो.
अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद असतातच आणि तीथे नियम मोडणे आवश्यक होते.
असेच काहि फोटोग्राफीचे मोडायचे नियम
१.पोर्टेट फोटोग्राफी- नियम सांगतो कि पुर्ण फ्रेम भरली पाहिजे म्हणजे झुम करुन जितक क्लोज जाता येईल तितक चांगलं. (याचा अर्थ खुप टाईट कंपोझिशन चांगले असा नाहि)
मोडलेला नियम- एय्खादि चांगली बॅकराउंड, वास्तु जर त्या पोर्टेट ला उठाव देत असेल तर खुप झुम न करताहि चांगल व्यक्ती चित्र बनवता येते. याच वेळी आवश्यकते प्रमाणे बॅकराऊंड ब्लर केला तर याहुन उत्तम.
जर साईड प्रोफाईल/ १/३ चेहरा असे पोर्टेट केले तर ज्या दिशेने नाक असेल किंवा नजर असेल त्याबाजुला मोकळि जागा सोडली तरी चांगली वाटते.

२.रुल ऑफ थर्ड्/गोल्डन रेशो/ मुख्य सब्जेक्ट ऑफसेंटर असवा- हे नियम तर सगळ्याना ठाउक असलेले बेसिक नियम
मोडालेला नियम - जर येखादा सब्जेक्ट खुप जास्त महत्वाचा दाखवायचा असेल तर फोटोच्य अगदी मध्यभागी ठेवता येतो

३. क्षितिज अगदि मध्यावर नसाव
-मोडलेला नियम- येखाद सुंदर रिफ्लेक्शन असेल आणि बर्‍यापैकी सिमिट्रीक असेल तर क्षितीज चित्राला अगदी मध्यभागी विभागत असेल तर उत्तम.

अर्थात सवयीने हे सगळे नियम आपोआप डोक्यात बसतात , तर चला इथे लिहत बसण्या पेक्षा थोडे फोटो काढुयात Wink
माझि काहि नियमात न बसणारि तरिही मला आवडणारी प्रकाशचित्र
ab.jpgac.jpgad.jpg

विषय: 
प्रकार: 

अजय,
नियमात बसणारी आणि न बसणारी अशी दोन्हीही उदाहरणे देणार का म्हणजे
आमच्या सारख्यांना समजायला अजुन जास्त सोपे जाईल. Happy
--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs

व्वा ! तुमचा पहीला फोटो हा फारच छान आहे, पायर्‍यांचा वापर फार म्हणजे फारच छान केला आहे.

तुमच्या प्रतिक्रीया वाचल्यावर......
तुम्ही नियम पाळता की धाब्यावर बसवता याला इथे तितकेसे महत्व नाहिये ! फक्त ते माहित असणे जरुरीचे आहे, कारण ही दृष्य भाषा आहे, त्या वेळेस जे कॉम्पोझ तुम्हाला भावलं ते तुम्ही मिळवलं मग त्यावर थोडंफार संस्करण केलं अन् सादर केलं, विचार प्रक्रियेचा कालावधीच अतिशय थोडा असतो
इथे, मुळात छायाचित्रण ही कला प्रथम चित्रकलेच्या तत्वावर विकसीत झालेली आहे. चित्र काढताना सर्वगोष्टिंचा यथासांग विचार होत जातो कारण तेव्हढा वेळ तिथे दिलेला असतो, कुठल्याही क्षणी चित्रात बदल करता येण्याजोगा असतो. छायाचित्रणात असे करता येत नाही, इथे सर्व तांत्रिक गोष्टीं वर प्रभुत्व मिळवल्यावर सौंदर्यानुभुतीचा विचार सुरू होतो आणि नियम वैगरे आपण कृती झाल्यावर पड्ताळून पहातो.
आता आपण दृष्य रचना, चौकट (फ्रेम अथ्वा कॉम्पोज), छाया प्रकाशाचे अस्तित्व व खेळ, रंग, कोन (ऍंगल), पोत, बॅकराऊंड याचा विचार किंवा सराव करु लागतो. यासर्वांचं क्षणिक द्विमिती उत्तर देण्याचं कार्य कॅमेरा व आपण मिळुन करतो. त्यामूळे इथे दोनच पर्याय उपलब्ध आहेत एक म्हणजे चांगले आणी वाईट छायाचित्र. चांगले अधिक चांगले कसे होईल व वाईट कसे काढून टाकता येईल म्हणजे छायाचित्रणाचा डोळस अभ्यास.... असो अजून खूप लिहीण्यासारखे आहे काळ काम वेगाच्या गणितात बसवून लिहिन.....
गोदेय

रुनी- प्रयत्न करेन.. Happy
ultimatebipin - धन्यवाद

गोदेय- तुमचं मत बरचसं पट्तं. मात्र छायाचित्रण (प्रकाशचित्रण ? ) हि येक स्वतंत्र कला आहे हे जर मान्य केले तर त्याचा स्वतंत्रपणेच विचार झाला पाहिजे.
तांत्रिक गोष्टी समजण आणी अमलात आणणे तस सोप्प आहे, प्रश्न आहे कलात्मक दृष्टीचा.
दृष्य कलेतिल कंपोझिशन चे नियम ( खरं म्हणजे गाईड्लाईन्स) सारख्याच असणार मात्र त्याचा अंमल विचारपुर्वक झाला पाहिजे.
फोटोग्राफीत विचार करायला फार वेळ नसतो हे मान्य नाही. अगदी स्पोर्ट , ऍक्शन , वाईल्ड लाइफ फोटोग्राफीत सुद्धा त्या खेळांचा, जनावरांच्या सवईंचा अभ्यास करुन काय फोटो अपोर्चुनेटिज असतील त्याचा आधिच थोडाफार अंदाज घेतलेला असतो.जे फार विचार न करता काढलेले स्नॅपशॉट्स असतात त्याचे कलामुल्य तरी काय असते त्यामुळे मी त्याबद्दल बोलत नाहिये.
येक लँड्स्केप चित्र जलरंगात रंगवायचे म्हटलं तर तास दोन तास सहज लागतात. त्या वेळेत प्रकाश पुर्ण बदलेला असतो. काहि ओब्जेक्ट्स (माणसं, वाहन, होड्या इत्यादी) हाललेले असतात. येव्हढे सगळे डोक्यात ठेउन आपण ते चित्र पुर करतो. फोटो काढताना काहि मिनटं लाईट, कंपोझिशन ,कोन आणि एक्स्पोजर चा विचार केला तर नंतरच्या संस्करणा चा वेळ वाचतो . (फोटो वर कितपत संस्करण योग्य हाही वादाचा मुद्दा).

आज डिजीटल फोटोग्राफी मुळे बरेचसेजण खुप कॅज्युअली क्लीक करतात- शटर रिलिजपुर्वी थोडा विचार करावा येव्हढच माझं म्हणणं.

मला असं वाटत की मुळात हा विषय परागकणच्या ज्या फोटोमुळे चालु झाला त्यातील विषयाला धरुन नाहीच आहे (तुम्ही हा जो लेखनाचा धागा चालु केला आहे त्याबद्द्ल बोलतो आहे मी) तीथे तुम्ही दिलेली प्रतिक्रिया ही त्या फोटो बद्द्ल तुमचे मत असु शकते पण प्रत्येकाचा फोटो काढतानाचा विचार वेगळा असतो आणि त्या फोटो मध्ये ती निगेटिव्ह (?) स्पेस मला तरी खटकत नाही.
आणि इथेही तुम्ही स्वतः च असे म्हट्ले आहे की तुमची वरील प्रकाशचित्रे ही नियमात बसत नाहीत तरीही तुम्हाला ती आवडतात.
<माझि काहि नियमात न बसणारि तरिही मला आवडणारी प्रकाशचित्र >
त्यामुळे आता इथे ही चर्चा वेगळ्या गोष्टींचा उहापोहो करीत आहे. पण जे काही चालले आहे ते चांगले चालु आहे.
तुमचे चालु द्या.