तुर्रा

Submitted by परागकण on 5 August, 2008 - 15:11

IMG_4368

मोठ्या आकारात पाहण्यासाठी: http://farm4.static.flickr.com/3197/2725233669_a173d6d9fe_b.jpg इथे टिचकी मारा.

गुलमोहर: 

सुंदर!
त्या पांढर्‍या पाकळीवरची गुलाबी झाक खूप छान आहे.

रंग खुप छान आहेत. IMHO निगेटीव्ह स्पेस खुप जास्त झालेय.Minimalistic फोटो/चित्र ,किंवा जिथे दिशा दाखवायची असेल त्यात निगेटीव्ह स्पेस चांगली वापरता येते . ईथे मात्र ती अप्रस्तुत वाटते.

मला अजय चे मत नाही पटत ..! दरवेळेस काही कारणानेच नीगेटिव्ह स्पेस सोडायला पाहिजे असे काही नाही. फोटोग्राफरला तेवढे स्वातंत्र्य असते आणि असायलाच पाहिजे. जर कोम्पोझिशन साठी ते छान वाटत असेल तर जरुर करावे. (जसे इथे छान वाट्ते आहे)

बिपिन- प्रत्येक प्रकाशचित्र नियमात बसवुनच काढायचे असं मीही म्हणत नाहीये. अर्थात नियम मोडायचे की फक्त वाकवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. Happy या फोटोतला background bokeh डोळ्याना सुखद नक्किच आहे पण थोडा कमी भाग व्यापला असता आणी फुलाना अधिक जागा दिली असती तर मला ते जास्त आवडलं असते. अर्थात ही जागा मुद्दाम सोडलेय की background मधला येखादा busy spot/ hotspot avoid करण्यासाठी तसं केलय ते परागकणच सांगु शकेल.

अजय, आक्षेप मान्य आहे. ही आवृत्तीदेखील क्रॉप केल्या नंतरची आहे.
कारणं दोन - १. मला पूर्ण फूल अथवा पाकळ्यांपेक्षा त्या बाजूला आलेल्या पुंकेसरांना छायाचित्रच्या मध्यभागी ठेवायचं होतं. (प्रयोग अर्थातच तितकासा योग्य नव्हता.) २. कॅमेरा आणखी डावीकडे वळवला असता तर डाव्या बाजूच्या वरच्या कोपर्यातला रंगीबेरंगी दगड अगदीच अस्थायी दिसला असता, तो टाळण्याचा प्रयत्न.

परागकण

अजय - नवीन काहीतरी करुन बघताना काही वेळेस नियम वाकवायलाच काय मोडायला सुद्धा लागतात. Lol आणि जसे परागकण म्हणतो आहे तश्या अडचणी सुद्धा येतातच की....

आवडला फोटो. वेगळा आहे. फुलांचे कलर अजुन (अगदी)थोडे व्हायब्रंट करता येतील का फोटो शॉप मध्ये? फुलाचा कलर ब्राईट झाला तर निगेटीव्ह स्पेस जास्त वाटणार नाही अस वाटत.