लिव्हरपूल, लेक डिस्ट्रीक्ट, ब्लॅकपूल

Submitted by webmaster on 7 August, 2008 - 01:12

लिव्हरपूल आणि आसपासचे मायबोलीकर

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार
कोणाला "लेक डिस्ट्रिक्ट", "ब्लैकपूल" ला फ़िरायला जायचे असेल आणि १-२ रात्री रहाण्याची सोय हवी असेल, तर तुमचे स्वागत आहे. मी लिवरपूलमध्ये राहतो. मी "भट" असल्यामुळे फ़क्त शाकाहारी जेवणखाणे मिळेल. घर लहान आहे पण दरवाज़ा पाहूण्यान्साठी सदैव उघडा आहे. हौल, १ बेडरूम आणि छोटे कीचन. गरिबाची झोपडी आहे... Happy

नरेंद्र,अगदी मस्तच एन्ट्री घेतली ,वा.आपल्या ग्रुपमधुन सोनालीने नुकताच
तिकडचा टुर केला होता.

नमस्कार,

मी राहुल,

लन्दन ला झ्होन १-३ मधेय घर शोधत आहे, काहि मदत हावि होति.
२९मे ची तिकित आहे. सध्या तिअर १ वर येत आहे. रूम शरिन्ग मधेय घेत्तला आहे का?

मला मेसेज कर.

राहुल

नमस्कार,

मी एक रूम शोधत आहे लन्दन ला. झ्होन १-३ मधेय बघत अहेय.

२९ ला येत आहे,काहि हेल्प झाली तर बरा होइल.

राहुल

सगळ्यानी हात जोडा रे....

तर देवा म्हाराज्या रवळनाथा,

तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)

दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्‍या, वाचणार्‍या आणि अंकाची कामा करणार्‍या सगळ्यांचो हात आसा.

कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.

तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.

म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.

तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.

आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)

. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्‍याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...

अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.

thangathang_final.jpg

नमस्कार मंडळी!!

गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला, रिकामं रिकामं वाटतय ना; बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून निरोप दिला तरी निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!

नवरात्र, कोजागरी आणि इतर कामांच्या गडबडीत तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू नये म्हणून हा प्रपंच ! याही वर्षी अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. त्याची माहिती पुन्हा एकदा वाचायची आहे? ही काय या इथे दिवाळी अंकाची केव्हाच घोषणा झाली आहे! तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. आपल्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या. आम्ही आपल्या कलाकृतींची वाट पाहत आहोत.

तुमचं साहित्य २ ऑक्टोबर, २०११ च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?

दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २०११

नमस्कार मंडळी,

https://www.lms2017.org.uk/

युके मधील पहिलं वहिलं जागतिक मराठी संमेलन २, ३, ४ जून ला लंडन येथे आयोजित केले गेले आहे. भरपूर कार्यक्रम, भारतीय मान्यवरांची व कलाकारांची उपस्थिती, बिझिनेस नेट्वर्कींग, थेम्स क्रूझ, तडका मराठी जेवण, स्थानिक कलाकार असे ३ दिवस संपूर्ण मराठी धमाल आहे.
लवकरात लवकर तुमची तिकीटे बूक करा. वेब्साईट्वर किंवा मला संपर्क करा. १० पेक्षा अधिक तिकीटांवर सौलत आहे.
कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास मला वि.पू. मधून संपर्क करू शकता. किंवा ईथे ईमेल पाठवा
ypjoshi@hotmail.com

योग
LMS-2017 Programme Committee