मराठी भा.पोचवा इंग्लीश मधे

Submitted by मेधावि on 7 October, 2011 - 22:13

मराठी मिडीयम मधे शिक्षण झाल्यानंतर व्यवसायाचा भाग आणि गरज म्हणून इंग्लीश मधे व्यक्त व्हावे लागते. अश्या वेळेस कधीकधी चपखल शब्द पटापटा आठवत नाहीत आणि कामचलावु शब्द वापरुन वेळ मारून न्यावी लागते. अश्या काही शब्दांची सुची आणि काही गमती जमतीसुद्धा लिहुया इथे.

१. उपासाच्या दिवशी उष्टे चालत नाही सांगताना फेफलायला झाले परवा. कोणाला "उष्टे" साठी इंग्लीश शब्द माहीत आहे का?
२. तसेच आवंढा गिळणे.
३. आम्ही नाटक बसवले असे इन्ग्लिशच काय हिंदीतही सांगता येत नाहीये मला. (हमने नाटक बिठाया? :))

लोकहो..आपापले अनुभव शेअर (आता इथे शेअर ला मराठी शब्द आठवत नाहीये...:)) कराल काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाषेच्या रुपांतरात व्याकरणाचे नियम लेखी भाषेला जसे लावता येतात अगदी तसेच्या तसे 'बोली' भाषेला लागतीलच असे नसते. फक्त मूळ शब्दातील 'भाव' दुसर्‍या भाषेतून ऐकणार्‍याच्या मनी पोचला की काम झाले असे मानले जाते. अमेरिकन इंग्लिशमध्ये "I ain't no nothing" असे बोलीभाषेत सर्रास वापरले जाणारे वाक्य असते. याचा सोपा सुलभ अर्थ आहे "मला काही माहीत नाही". भाषांतर केले तर मराठी मध्ये फक्त एकच निगेशन येईल; पण दुसरीकडे इंग्लिश वाक्यात तीन नकारांचा समावेश दिसतो. पण 'बोलीत' हे खपून जाते. अमेरिकेन लिखाणातदेखील वरील वाक्यात खरे तर "Know nothing" असे येणे गरजेचे आहे, पण लेखक वर्ग सर्रास know च्या ठिकाणी no चेच प्रयोजन करताना तुम्हाला आढळून येईल. कारण ? परत तेच - बोली भाषेचा लेहजा.

(1) "उष्टे" ही संकल्पना पूर्णपणे भारतीय आहे. त्याला इंग्लिशमध्ये समानार्थी शब्द द्यायचाच झाला तर = Touched, Used अथवा Tasted असेही म्हटले तरी चालते. वास्तविक परदेशी पाहुण्याला 'अन्न touched किंवा test केले म्हणून काय बिघडले ?" असा प्रश्न पडू शकतो, मग त्याला तसे टेस्ट केलेले अन्न आमच्या हिंदुसंस्कृतीनुसार Impure मानले जाते असा खुलासा द्यावा लागेल.

(आपल्याकडे 'उष्टे' आणि 'खरकटे' या दोन भिन्न कल्पना आहे. म्हणून 'खरकटे' ला = Left over म्हटले जाते.)

(2) "आवंढा गिळणे" : हे सोपे आहे....Lumping. उदा. While watching that horror movie, she lumped many times with fear.

(3) "आम्ही नाटक बसविले" - हा अनुवाद थेटच करता येतो : We successfully staged a drama namely Tee Phularani.

अशोक पाटील

मला खूपच उपयोग होईल या बाफचा Wink

@ अशोकजी - उष्टे बाबत अगदी सहमत. टेस्टेड फूड ही संकल्पना परदेशात नसावी बहुतेक. शिल्लक राहीलेल्या जेवणासाठी स्प्रिनर हा एक शब्द आहे. ( हे सुद्धा ताटात उरलेलं कि रात्री बनवलेल्या जेवणातून वाढल्यावर उरलेलं जेवण हे बघायला हवं )

किरण ~

Tested Food आणि Drink ही संकल्पना सर्वत्रच आढळून येईल तुम्हाला; पण तुम्ही म्हणता तसे Tasted Food बाबत मात्र दिसून येत नाही हे खरे. मुळात अमेरिकन कल्चरमध्ये सरसकट शिल्लक राहिलेल्या अन्नाला Leftover असेच नाम असल्याने ते भले अगदी ताजे असले तरी तसाच उल्लेख. Scrap ही म्हटले जातेच.

मात्र युरोपीअन देशात (इंग्लंडशिवाय) अशा शिल्लक राहिलेल्या अन्नास Orts असा जर्मन/डच भाषेचा गंध असणारे नाव आहे. नॉर्वे, स्वीडन, पोलंड अशा दुभत्या देशात असे लेफ्टओव्हर (शिल्लक..... खरकटे नव्हे) अन्न 'रीसायकलिंग' साठी वापरून त्याचे रुपांतर जनावरच्या खाद्यात करण्याचा प्रयोग करतात. जे योग्यच म्हटले पाहिजे. {आपल्याकडील गोबरगॅस तत्वप्रणाली}. त्यामुळे त्या संस्कृतीत 'उष्टे, खरकटे' अशी त्या राहिलेल्या अन्नाविषयी अप्रीती निर्माण होऊ शकणारी नामे बिलकुल नाहीत.

{तुमच्या प्रतिसादात "स्प्रिनर" चा उल्लेख आहे. याचे स्पेलिंग द्याल जरा ? माझ्यासाठी ही नवीनच संज्ञा आहे.}

अशोक पाटील

पुल स्पेशल..

याचे भाषांतर करुन दाखवा.

१."आमचा हिच्या हातच्या थालिपीठाची सर कश्शाकश्शाला नाही".

२."उद्या सर्वपितरी अमावस्या असल्याने" ----
( "Tomorrow being all fathers day" चालणार नाही Happy )

We successfully staged>>> अशोकजी, याबद्दल जरा शंका आहे. 'नाटक बसविले' चा अर्थ मला तालमी वगैरे होऊन तयार आहे असा वाटतो नेहमी. 'स्टेज्ड' चा अर्थ मी ते प्रेक्षकांपुढे दाखवून झाले असा वाटतो.

I ain't no nothing>>> हे मी सहसा I ain't know nothing असे वाचलेले/ऐकलेले आहे. व्याकरणदृष्ट्या दोन्ही चूक आहे हे खरे आहे. पण 'नो' हे इतर क्रियापदांसारखेच एक (know) वापरलेले ऐकले आहे त्यात. तुम्ही लिहीले आहे तसेही वापरले जात असेल कदाचित.

यावरून आठवले. ही स्लँग - विशेषतः आफ्रिकन अमेरिकन्स ची- कधीकधी इतकी समजायला अवघड असते, की त्याचे जबरी उदाहरण 'एअरप्लेन' या एका धमाल विडंबनपटात तसे दोन जण बोलत असताना खाली आपल्याला समजणार्‍या इंग्रजीत सबटायटल्स दिलेले आहेत Happy

१. फारएण्ड
~ वेल, तुम्ही म्हणता तशी पूर्णत्वाची छ्टा Staged मध्ये येते हे मी मान्य करतो. पण सुमेधा यांची भूमिका 'नाटक बसविले' म्हणजे ते पूर्ण झाले अशा अर्थानेच घ्यावे लागेल. त्यानी 'नाटक बसवित आहोत' असे म्हटलेले नाही. तसे असते तर मग "For this winter session, we are planning to set Shakespeare's Midsummer Night's Dream" अशा धर्तीचे वाक्य होऊ शकेल. सादरीकरण झाल्यावर मग ह्याच वाक्याला आपण वर म्हटल्याप्रमाणे During this winter session our team successfully staged Shakespeare's Midsummer Night's Dream म्हणू.

२. I ain't no nothing असे थेट स्पेलिंगचे रूप खूपशा अमेरिकन 'पॉप्युलर' कादंबर्‍यामध्ये वाचण्यास मिळेल. ब्रिटिशांचेदेखील शुद्ध तुपातील इंग्लिश असते असे बिलकुल मानू नये. तिथेही उच्चाराच्या कॉकनी, वेल्श आणि आयरिश टिन्ट्स डोक्याला झिणझिण्या आणतात.

I ain't no nothing चे एक उदाहरण पाहा :
एखाद्या वेंधळ्या बाब्याला 'तुला व्यवहारातले काय समजते रे ?" असे मालकाने खडसावून विचारले तर तो उत्तर देतो : (हे लेखीही नेमक्या यास स्पेलिंगने आहे)

I ain't no nothing but a chicken wing, Master.

इथे आपल्या मायबोली मराठीत याचा अनुवाद अतिशय ग्राम्य कोल्हापुरी भाषेतही करता येईल, पण नको. साधारणतः अर्थछटा अशी होईल की, "सायबानू मला फक्त कोंबडीची पिसं काढता येतात, बाकी कायबी न्हाई."

आफ्रिकन-अमेरिकन नेटिव्हांची भाषा तर वेगळा बाफचा विषय होऊ शकतो इतकी त्यात अगम्यता आहे.

अशोक पाटील

पण अश्विनीमामी ~

१. परदेशी पाहुण्याला 'उष्टे' ही संज्ञा समजावून सांगायची झाल्यास तुमच्या वरील वाक्याला "According to our custom...." ची झालर लावणे अपरिहार्य आहे.

२. I gulped चा अर्थ काहीही 'गिळले' असा होतो....म्हणजे थेट physical substance.....e.g. water, piece of fruit. पण सुमेधा याना 'आवंढा गिळायचा' असल्याने Lump चे प्रयोजन (मला) योग्य वाटले.

{अर्थात "अपमान" ही गिळला जाऊ शकतो, पण त्यावेळी मी gulp च्या ऐवजी Swallowed down the insult असे म्हणेन.}

३. Doing a play ~ लिहायला आणि वाचायला खटकते. [अर्थात हे वैयक्तिक मत आहे]

अशोक पाटील

>> आम्ही नाटक बसवले
we rehearsed a play named.. असं म्हणता येईल. तालमी केल्या.

>> I ain't no nothing>>> हे मी सहसा I ain't know nothing असे वाचलेले/ऐकलेले आहे.
फारेन्ड +१.
I don't know nothing असंही म्हणतात.

अशोकजी, धन्यवाद.
मराठी बोलताना सारखे इंग्रजी शब्द मधे मधे घुसडून आपण किती सुधारलेले, सुशिक्षित आहोत असे दाखवायची पद्धत आहे, पण तरीहि कधी कधी उष्टे, इ. शब्दांना इंग्रजीत काय म्हणतात हे माहित नसल्याने नाईलाजास्तव मराठीच शब्द वापरावे लागत. आता त्यांना इंग्रजीत काय म्हणतात हे कळल्याने मराठी बोलताना उगाच मधे मधे मराठी शब्द वापरून आपले अज्ञान, खेडवळपणा दाखवायला नको!
Proud

काय परदेसाई, न्यू मराठी प्ले कधी पुट टुगेदर करणार?
(ऑक्टोबरमधे पुण्या मुंबईला जायचे आहे, तिथे बोलायची सवय करतो आहे. त्यांना अमेरिकन मराठीत नवीन नाटक कधी बसवणार असे म्हंटले तर म्हणतील, हा कोण यडा, अशिक्षित, (सॉरी, स्टुपिड, अनएज्युकेटेड) गांवढळ, माणूस आला?!

I can't eat food touched by others on the days I fast.

या टच्ड मध्ये दुसर्‍या कोणी शिजवलेले असाही अर्थ निघतो. म्हणजे अन्य कोणी कापलेली भाजी, लाटलेल्या पोळ्या याही चालणार नाहीत. (डे ऑफ फास्ट म्हटल्यावर पुन्हा समोरून why do you need to eat food when you fast ?असाही प्रश्न यायचा Happy )
I don't eat food portion out of which somebody else has eaten. हे कसं वाटतंय?

चांगला बाफ आहे.
उष्टे साठी soiled हा शब्द मला योग्य वाटतो.

अशोकजींनी लिहिलेले "We successfully staged a drama namely Tee Phularani" योग्य वाटते.

"we performed a drama"