कवितेचे दान.....

Submitted by पुरंदरे शशांक on 5 October, 2011 - 06:20

कवितेचे दान.....

वेडा वेडा पाऊस वेड्या वेड्या मनात
नभाची गाणी इवल्या इवल्या फुलात

मेघांची दाटी पश्चिम क्षितीजात
अंकुरते बीज धरती उदरात

पिसात चोच पाखराची रात
उडण्याची स्वप्नं नव्याने भरात

विहरतो वारा गोड गाणी गात
हिरवी हिरवी पात लवलवते तालात

झुंजुमुंजु झालं दूर डोंगरात
लख्ख उजाडलं नितळ मनात

समई ज्योत शांत देवघरात
प्रार्थना उमटे खोल अंतरात

शब्दांचे मोती मन शिंपल्यात
कवितेचे दान रित्या पदरात....

गुलमोहर: 

शब्दांचे मोती मन शिंपल्यात
कवितेचे दान रित्या पदरात....>>>छान.

“पिसात चोच पाखराची रात
उडण्याची स्वप्नं नव्याने भरात”
.... छान
आशावादी कविता.