फूलपाखरु झालो रे मी, फूलपाखरु झालो (निमित्त कास पठार)

Submitted by कांदापोहे on 5 October, 2011 - 01:05

कास पठारावर जाण्याची ही दुसरी वेळ. मागच्या वर्षी जरासे लवकर की उशिरा गेलो होतो. यावर्षी इथली अनेकांची कासची प्रकाशचित्रे बघुन जीव कासाविस झाला होता. शेवटी जमवलेच. कास पठाराकडे जाताना नेहेमी मी रस्ता चुकतो व ठोसेघर धबधब्याकडे जातो. या वर्षीही तेच केले. Happy धबधबा बघुन पुढे चाळकेवाडीला गेलो व कासप्रमाणेच तिथलेही पठार फुलांनी फुललेले दिसले. कासला गर्दीत काढण्याऐवजी इथेच प्रकाशचित्रे काढावीत हा विचार केला व जास्तीत जास्त प्रकाशचित्रे काढुन घेतली.

तिथल्या पवनचक्क्या व फुललेले पठार बघुन मी व कुटुंब अगदी जगदीश खेबुडकरांच्या

मऊ मऊ माझ्या पंखांची, नक्षी सुंदर रंगांची
धुक्यात फिरता इकडे तिकडे दवबिंदुंनी न्हालो
फूलपाखरु झालो मी फूलपाखरु झालो

या कवितेप्रमाणे फुलपाखरु झालो होतो. या सगळ्या गडबडीत कासला पोचायला उशिर झालाच. त्यामुळे सकाळी जे कडक ऊन होते ते गायब झाले होते व वातावरण ढगाळ झाले होते. अमाप गर्दीमुळे यावेळी कास तलावापर्यंत जाता आले नाही त्यामुळे कंदीलपुष्प व इतर अनेक फुलांची प्रकाशचित्रे राहुनच गेली.

अधिक माहीतीसाठी http://www.kas.ind.in/ या साईटला भेट द्या. इथे सर्व माहीती मिळेल. आत्ता १५ सप्टेंबरपासुन चांगला सिझन आहे. कास चे एक अँड्रॉइड अ‍ॅप पण आहे. ते माहितीकरता उत्कृष्ठ आहे. या वर्षी कारवी पण फुलली आहे त्यामुले या १०-१५ दिवसात नक्की भेट द्या.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आकार फार मोठे वाटतायेत का प्रकाशचित्रांचे ?
पवनचक्क्यांचा, दुसरा, पाचवा आणि जांभळ्याअ‍ॅस्टरसदृश फुलांचे फोटो आवडले. Happy

सहीच

आकार फार मोठे वाटतायेत का प्रकाशचित्रांचे ?>>>
आकार कमी करु का? परत एकदा सगळ्या लिंक टाकाव्या लागतील.

सर्व प्रचि अप्रतिम...........कितीही वेळा पाहूनही समाधान होत नाही- इतके अप्रतिम...
कृपया, आकार कमी करु नका......

झक्क्कास!! जांभळ्या- पांढर्‍या फुलाचे फोटो जबरी!

हे कंदिलपुष्प कसे दिसते.. कासच्या सगळ्या धाग्यांवर उल्लेख आहे पण प्रचि नाही की मी नीट पाहीले नाहीये? Uhoh

काहि वेगळी फुले दिसली. फोटो सुंदरच.
चिंगी हे फूल कंदिलाच्या आकाराचेच असते. वरुन पांढरे असले तरी आतून गडद रंगाचे असते.

चिंगे मागच्या वर्षी मी गेलो होतो तेव्हा मी काढला होता कंदीलपुष्पाचा फोटो. हे बघ. http://www.maayboli.com/node/22140

वरुन पांढरे असले तरी आतून गडद रंगाचे असते>>>
दिनेश चुकीची माहीती आहे ही. वरच्या लिंकमधे बघा फोटो.

Pages