फुल आहिस्ता फेको, के फुल बडे नाजुक होते है!

Submitted by कांदापोहे on 23 December, 2010 - 23:51

कास पठारावर मध्यंतरी गेलो होतो तेव्हा टिपलेली भयंकर नाजुक फुले. नखाच्या पेरांपेक्षाही बारीक असणार्‍या या फुलांचे फोटो काढायला जमीनीवर झोपावे लागत होते. सोबत आणखीही काही फुले आहेतच. चालताना सुध्दा यावर पाय पडुन चिरडली जातील की काय ही भिती होतीच.

प्रचि१ नाव माहीत नाही (कास पठार)

प्रचि२ तेरडा (कास पठार)

प्रचि३ घाणेरी

प्रचि४ कॉसमॉस

प्रचि५ गणेशवेल

प्रचि६ केतकीचे बन. आंजर्ल्याच्या समुद्रकिनार्‍यावर फिरताना अनेक वेळा केतकीचे (केवड्याचे) बन बघीतले होते पण त्याची कणसे पहील्यांदाच दिसली.

प्रचि७ फड्या निवडुंग वल्द ब्रम्हकमळ Happy

प्रचि८ धनगराचं पागोटं/सफेद गेंद (कास पठार)

प्रचि९ लहान कावळा किंवा मिकी माऊस (smithia bigemina)(कास पठार)

प्रचि१० नाव माहीत नाही (कास पठार)

प्रचि११ कंदिलपुष्प (कास पठार)

प्रचि१२ नाव माहीत नाही (कास पठार)

प्रचि१३ रानजाई फुलल्यावर याचा रातराणीसारखाच मंद वास दरवळतो.

गुलमोहर: 

खूपच सुंदर आहेत, फुलंपण आणि photographs पण. कासला जाण्याचा best period कधी असतो? आम्ही october मधे गेलो होतो, पण season almost संपला होता. फारच थोडी फुलं पहायला मिळाली.

कांदापोहे प्रचंड सुंदर फोटोज. घाणेरी अन गणेशवेलीची फुले मला जाम आवडतात (बघायला Happy ). सीतेचे अश्रूंची काही पौराणकालिन कहाणी वगैरे आहे का?? पण फुले छान आहेत.

केपी.
सुंदर. छानच पुष्प गुच्छ.
फोटो पण मस्त काढलेत.
प्रचि १२ - मला गजानन दिसतायत.

धन्यवाद लोकहो. Happy सितेचे अश्रु नाहीत का ते? ही फुल इतकी छोटी होती त्यामुळे मुद्दाम झुम करुन फोटो टाकला आहे. कुंकवाच्या टिकल्यापण मोठ्या असतील. तरीही त्याचे टेक्शर आले म्हणुन खुष आहे मी.

छान आहेत फोटो. Happy
'सीतेची आसवं' म्हणून जो फोटो टाकला आहे ते प्रत्यक्षात 'धनगराचं पागोटं' किंवा 'गेंद' हे फूल आहे. (botanical name - eriocaulon sedgwickii)
प्रचि २ : लाल तेरडा (impatiens oppositofolia)
प्रचि ९ : लहान कावळा किंवा मिकी माऊस (smithia bigemina)

Pages