हितगुज दिवाळी अंक २०११ - मुदतवाढ

Submitted by संपादक on 4 October, 2011 - 15:23

हितगुज दिवाळी अंक २०११ साठी साहित्य पाठवण्याची मुदत संपली!

काय म्हणता??? वेळ थोडा कमी पडला? अहो अजून दोन-तीन जणांकडूनही असंच काहीसं ऐकलं.

ह्यावर्षीच्या हितगुज दिवाळी अंकाला तुमच्या उत्तमोत्तम साहित्याने सजवावं हाच आमचाही मानस; तेव्हा साहित्य मागवण्याच्या मुदतीचे काटे आम्ही थोsssडे मागे करतोय, केवळ तुमच्याकरताच!

हितगुज दिवाळी अंक २०११ साठी साहित्य पाठवण्याची मुदत वाढवून ९ ऑक्टोबर २०११ केली आहे.

तेव्हा तुमचं साहित्य पाठवताय ना?

Diwali-3_updated.jpg