Submitted by विशाल कुलकर्णी on 4 October, 2011 - 00:00
दिवसास माझे किती हे दिलासे
संध्याकाळ माझी करते खुलासे
तुझा विरह का हा दाटून येतो
होतात सिगरेटचे, 'कश' माझे उसासे
तशी फारशी ही नसे आर्तता
तू जाता उदरी, सरते व्यर्थता
दिव्यांचे 'बार'च्या होई चांदणे
तूझा स्पर्श ओठा, तिच सार्थता
घेऊन फिरतो सिगरेटी कुणाच्या
बहरतात गात्री आठवा कधींच्या
हलकेच ग्लासात तिज ओततो मी
चुकवुन नजरा अधाशी सोबत्यांच्या
थेंब पाण्याचे घसा जाळतात
अखेरचे घोट का मला टाळतात?
हरवून जाते कधी शुद्ध माझी,
इशारे साकिचे तसेही पाळतात
आता सांज होईल गडे 'चांदणी'
असावी वोडका, अन साथ रमणी
हाणुन चखणा मग मी धुंद व्हावे
किती ग्लास झाले चिंता 'बिलाची' !
हुकुमावरून....
अखिल सिंहगड रोड "चांदणीबार" सदस्य समिती
गुलमोहर:
शेअर करा
पिले पिले पिले,पिले पिले
पिले पिले पिले,पिले पिले पिले
गावटी देशी पिउन यारो
झुम झुम तुम झिंगलो यारो
पिले पिले पिले,पिले पिले पिले.
तुमची मस्त्,पहिल्या धारेची.
तुझा विरह का हा दाटून
तुझा विरह का हा दाटून येतो
होतात सिगरेटचे, 'कश' माझे उसासे
दिव्यांचे 'बार'च्या होई चांदणे
तूझा स्पर्श ओठा, तिच सार्थता >>>>> हे भारीय विश्ल्या... 'तर्राट' झालो !!!
तू जाता उदरी, सरते
तू जाता उदरी, सरते व्यर्थता
दिव्यांचे 'बार'च्या होई चांदणे
तूझा स्पर्श ओठा, तिच सार्थता >>>>
हे मस्तच .....
(No subject)
अखिल सिंहगड रोड "चांदणीबार"
अखिल सिंहगड रोड "चांदणीबार" सदस्य समिती>> का एव्हडी बदनामी
बदनाम हुये तो क्या नाम तो
बदनाम हुये तो क्या नाम तो हुवा ना
हिक् हिक् हिक् हिक्
हिक् हिक् हिक् हिक्