महालेखापरीक्षण कितपत संवेदनाशील आहे?

Submitted by गामा पैलवान on 3 October, 2011 - 08:03

लोकहो,

भारताच्या महालेखपालांच्या दिल्लीतील मुख्यालयाचं कामकाज, लेखा यांचे परीक्षण ‘ऑडिट एजन्सी ऑफ ऑस्ट्रेलिया’कडून होणार आहे!

वरील बातमीस पुष्टी : http://www.indianexpress.com/news/a-150yearold-watchdog-with-more-bite-t...

देशबाह्य संस्थेला भारताच्या महत्त्वाच्या खात्याचे परीक्षण करायला द्यावे का? यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होते का?

कृपया अधिक विचारमंथन व्हावे.

आपला नम्र,
-गामा पैलवान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@गामा पैलवान
>>कृपया अधिक विचारमंथन व्हावे.<<
हा धागा 'फक्त ग्रूप सभासदांसाठी' असा झाला आहे. कृपया तो सार्वजनिक करा.
म्हणजे चर्चा करायला सोईचे होईल.

ऑडिट एजन्सीज डेटा कॉन्फिडेन्शियल ठेवायला बांधील असतात... शिवाय मॅनेज्म्ट, फायनास यासाठी आजकाल आंतरराष्ट्रीय मानक असणे चांगलेच तर असते.... त्यातून चांगलेच निष्पन्न तर होईल..

ऑडिट एजन्सीज डेटा कॉन्फिडेन्शियल ठेवायला बांधील असतात...
----- बांधिल असतांत... पण हलगर्जी मुळे तो बाहेर आल्यास त्याची जबाबदारी कुणाची?

देशबाह्य संस्थेला भारताच्या महत्त्वाच्या खात्याचे परीक्षण करायला द्यावे का?
------ भारताने वकिलातींची संबंधित काही महत्वाच्या कामांचे कंत्राट व्हिएफएस ला दिले आहे. हे कशासाठी? पारपत्रांची हाताळणी, कोणाला परवानगी मिळावी अशी महत्वाची तर कधी नाजुक माहितीची भविष्यात तडजोड झाल्यास?

युरोपीय महासंघ (European Union) प्रथम एका व्यापारसंघाच्या रूपात होता. त्याने हळूहळू चक्क कायदे करायला सुरुवात केली. असंच ऑस्ट्रेलियन लेखापालाच्या बाबतीत झालं नाही म्हणजे मिळवलं.

आ.न.,
-गा.पै.