नाते -गाठी-गुंता_ प्रमेय

Submitted by bnlele on 1 October, 2011 - 04:02

नाती कशी निर्माण होतात, वाढतात, गुंततात आणि कधी तुटतात-अन जोडली जातात ?
या लेखात प्रमेय स्वरूपात एक संकल्पना थोडक्यात सुचवायचा हा प्रयत्न.
अगदी लहानात लहान कुटंबात तीन व्यक्ति मान्य केल्या तर असे कुटूंव्ब दर्शविण्यास त्रिकोणाची आकृति सोईची.
गणित शास्त्राच्या नियमांनुसार त्रिकोणाचा प्रत्येक शीर्ष त्या कुटुंबातील एक व्यक्ति दर्शवितो हे ग्राह्य धरावं.
पहिल्या नियमानुसार तीन्ही शीर्षांतून एकच वृत्त जाणार्;ते वृत्त त्या कुटुंबाचा मूल विस्तार दाखविणार.
जोडीजोडीनी दोन शीर्षांना छेदणारी वृत्त त्यात्या व्यक्तींमधील संबंधाचे प्रतिक मानता तीन अशी वृत्त दिसतील ज्यांच्या क्षेत्रात आपसात "शेअर" केलेले भाग त्यांच्या आपसातले सामंजस्याचे क्षेत्र दर्षक म्हणता येतील. ज्या शीर्षाच्या कक्षेत समंजास्याचा विस्तार अधिक तो शीर्ष कुटुंब प्रमुख मानला तर अन्य दोघांची भूमिका समजावयास्स मदत होईल. अन्य क्षेत्रांछा विचार थोडा पुढे करू.
नियम दुसरा: प्रत्ये शीर्षाला मध्य कल्पून असंख्य वृत्त काढता येतील. प्रत्येक व्यक्ति क्षमतेनुसार बाहेर्च्या जगाशी संपर्क्-संबंध विस्तारू शकतो याचे द्योतक नक्कीच.
अशा विस्तार्रामुळे कौटुंबिक नाती प्रभावित होणार आणि त्याच्या प्रभावामुळे "सामंजस्याचे" क्षेत्र संकुचित किंवा वाढलेले आपण रेखाटत असलेल्या आकृतित दिअसणारच.
अशा असंख्य कुटुंबांचा समूह म्हणजे समाज म्हणता येईल. मग सर्वच सामाजिक आणि व्यक्तिनिष्ठ आचार्-विचार, व्यवहारांचे अर्थ जमजण्यास मदत नक्कीच मिळेल. आपली विश्लेशण क्षमता पणला लावून उपयोगी आणि वास्तविक अर्थ काढता येईल.
उदाहरणानिमित्त विवाह संस्थेचा थोडा विचार वैचारिक मंथनाला गति मिळेल.
व्याही,विहिणी अशा शीर्षांतून रेखाटलेली वृत्त त्या दोन कुटुंबातील संबंध समजण्यास पूरक ठरतील एवढाच निर्देश करून हा पूर्ण करावा असे वाटले.
bnlele maayboli

गुलमोहर: