केरळमध्ये ३ मुले असणार्‍याना तुरुंगवासाची शिक्षा?

Submitted by जागोमोहनप्यारे on 30 September, 2011 - 11:57

केरळमध्ये ३ मुले असणार्‍याना तुरुंगवासाची शिक्षा?

केरळमध्ये ३ किंवा अधिक मुले असनार्‍याना तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा कायदा होणार आहे म्हणे! महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात अस कायदा करावा काय?

याबाबत अल्पसंख्यांकांचा दृष्टीकोन कसा असू शकेल? हिंदुंच्यातही पूर्वी बहुपत्नित्वाची आणि भरपूर मुले असण्याची प्रथा होती... ध्रुवबाळाच्या वडिलाना आवडती आणि नावडती अशा दोन बायका होत्या. कृष्णाला १६००० होत्या. पांडवाना , दशरथाला अनेक पत्नी होत्या.. छत्रपती शिवाजी महाराजाना ८ ( की ९) होत्या..

१९-२० शतक येईअपर्यंत हिंदुंची क्रयशक्ती इतकी कमी झाली की १ बायको आणि १-२ मुलेच परवडतील हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यानंतर मग एका पत्नीचा कायदा झाला, तो हिंदुनी सहजपणे स्वीकारला. .. त्याचप्रमाणे हे जेंव्हाअल्पसंख्यांकांच्या लक्षात येईल, तेंव्हा आपोआपच बायका पोरे कमी होतील आणि कदाचित तेंव्हाच हा कायदा तेही आपोआप स्वीकारतील. Proud संपूर्ण जगभरात मुसलमानाना अनेक मुले होण्याचे प्रमाण घटत आहे म्हणे.. ही आकडेवारी.. http://www.prb.org/Articles/2009/karimpolicyseminar.aspx

याबाबत भारतातील आकडेवारी काय सांगते? महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात असा कायदा येईल का? सध्या महाराष्ट्रात ३ मुले असणार्‍याना लोकप्रतिनिधी होता येत नाही.. अशा व्यक्तींचे पद रद्द झालेल्या बातम्या पेप्रात येत असतात ( संपूर्ण भारताचे माहीत नाही.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिसेंबर २००९ मधे दोन माजी आमदारांना वैद्यकीय खर्च परत करावा लागला होता (त्यांना ७ व ५ अशी अपत्ये होती - आमदारांकडे गरिबी नसावी :स्मित:) असे वाचलेले आहे, पण आमदारकी रद्द होत नाही.

http://www.thehindu.com/news/national/article68040.ece

केरळमध्ये ३ मुले असणार्‍याना तुरुंगवासाची शिक्षा?
शीर्षकावरून असा बोध होतो की, मुले जर केरळमध्ये असतील तरच शिक्षा होईल!!! म्हणजे, एखाद्यास ३ पेक्षा जास्त मुले असतील परंतु केरळमध्ये त्याने त्यापैकी दोनच मुले ठेवली तर त्याला शिक्षा होणार नाही!!!

Pages