मायबोली शीर्षक गीत - सहभाग

Submitted by Admin-team on 30 September, 2011 - 03:57

नुकत्याच झालेल्या मायबोली गणेशोत्सवात मायबोली शीर्षकगीत स्पर्धा झाली होती. त्यात उल्हास भिडे यांच्या गीताला पहिले पारितोषिक मिळाले होते.आपले एक मायबोलीकर योग यांनी पुढाकार घेऊन प्रथम आलेल्या कवितेला संगीत देण्याचा विचार मांडला होता. तो आता प्रत्यक्षात आणायचा आहे. यासाठी तुम्हां सर्वांची सांगीतिक साथ हवी आहे. जगभर पाऊलखुणा असलेल्या मायबोलीचे शीर्षकगीतदेखील जागतिक असावे, अशी इच्छा आहे. या उपक्रमाचे प्रमुख संयोजक व्हायला योग यांनी होकार दिला याबद्दल त्यांचे आभार. तसेच श्री. उल्हास भिडे यांनीदेखील मायबोलीला हे गीत शीर्षकगीत करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार.

तर या उपक्रमात तुम्हांला किंवा तुमच्या मुलांना गायक म्हणून सहभागी व्हायचे असेल तर ८ ऑक्टोबरपर्यंत या धाग्यावर कळवा आणि तुमची खालील माहिती योग अथवा रुनी पॉटर यांना संपर्क सुविधा वापरून पाठवा.

१. तुमचे सदस्य नाव
२. खरे नाव
३. राहण्याचे ठिकाण / शहर
४. संपर्कासाठी इमेल पत्ता.

या उपक्रमात जगभर असेलल्या मायबोलीकरांनी सहभागी व्हावे, असा उद्देश आहे. त्या्मुळे खालील दोनप्रकारे तुम्ही सहभागी होऊ शकता.
१. गायक
२. विभागीय समन्वयक (Regional Coordinator).

तसेच तुमच्या माहितीत जर कोणी चांगले गाऊ शकणारे मायबोलीकर असतील तर त्यांनाही या उपक्रमाबद्दल कळवा आणि भाग घ्यायला जरूर सांगा. एकदा सहभाग समजला की पुढील प्रक्रिया आणि एकंदर वेळ याबद्दल माहिती देण्यात येईल.

सर्वांच्या सहकार्याने मायबोलीचे एक उत्तम शीर्षकगीत प्रकाशित करूया!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा....... मस्त कल्पना आहे.
मला नक्की आवडेल सहभागी व्हायला Happy
योग...... काहीही मदत लागली तर हक्काने सांग.
माधुरी..धन्यु Happy

प्रतिसाद चांगला येत आहेच, विशेषतः स्त्रीयांचे पारडे जड आहे... तेव्हा माबो वरील शूर शिपायांनो (पुरुष आयडी/गायक) जागे व्हा/गाते व्हा! Happy खेरीज बच्चे कंपनींची देखिल खबर नाही?

“श्री. उल्हास भिडे यांनीदेखील मायबोलीला हे गीत शीर्षकगीत करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार” >>>>
अ‍ॅडमिन-टीम,
मायबोलीवर गेल्या दोन वर्षात जे काही अनुभवलं त्याचीच ओंजळ भरून, अर्घ्य म्हणून मायबोलीला
अर्पण करतोय, या भावनेने ते गीत मी प्रकाशित केलं होतं. परवानगी हा व्यवस्थपनाच्या दृष्टीकोनातून आवश्यक असा केवळ एक उपचार होता. त्याबद्दल कृपया आभार नकोत.

माझ्यासारख्या नव्या मायबोलीकराची आणि काव्यक्षेत्रात नवखा असलेल्याची कविता, मायबोली शीर्षकगीत म्हणून निवडली गेली ही माझ्या दृष्टीने अतीशय आनंदाची गोष्ट आहे. याबद्दल मायबोलीचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. या गीताला चाल लावून संगीतबद्ध केलं जाणार आहे, हा या गीताला मिळालेला सन्मान आहे.
धन्यवाद.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
श्री. योग यांना मायबोलीकरांकडून भरभरून सहकार्य मिळून त्यांच्या प्रयत्नांना यश लाभावे ही शुभेच्छा.

मस्त उपक्रम ... खुप खुप शुभेच्छा
मायबोलीचे गाणे ऐकायला कानातुर झालेत ..

उकाका.....
खूप खूप खूप शुभेच्छा...
मायबोलीचे एक उत्तम शीर्षकगीत ऐकण्यास आतूर Happy

अ‍ॅडमिन टिम,
माझा मुलगा ५ वर्षांचा आहे. पाठांतर जबरी आहे आणि गाण्यातले चढ-उतार साभिनय म्हणणं हे त्याचं अतिशय आवडतं काम आहे.:)
त्याला भाग घ्यायला आवडेल. पण एवढी लहान मुले चालतील का ?

छान उपक्रम योग. अनेक शुभेच्छा. सहभागी होण्याची देखिल इच्छा आहे.

मंजूडी, अगो, चिन्नु, झेलम,

तुम्ही सहभागी व्हायला उत्सूक आहात असे ईथे लिहीले आहेत. कृ. तुमची माहिती संपर्कातून मेल केलीत तर पुढील सहभाग/संपर्क सोयीचे होईल.

८ ओक्टॉबर नंतर सर्व संबंधीतांशी ईमेल वा वेगळ्या बाफ मार्फत मी स्वतः संपर्क साधणार आहे. तूर्तास, मुंबई, पुणे, अमिराती, कुवेत, अमेरिका, युके, ईथून अनेक सहभागांची नोंद (बाफ वर वा वैयक्तीक ईमेल मधून) झालेली आहे. अजूनही अनेक मायबोलीकर ईच्छुक पुढे येतील व हा प्रकल्प खर्‍या अर्थाने मायबोली जागतिक प्रकल्प करण्यास मदत करतील अशी आशा आहे.

मुलांच्या बाबतीत: एकंदर कामाचे स्वरूप, तांत्रिक बाबी वगैरे लक्षात घेता शक्यतो १० वर्षांच्या वरील मुलांचा सहभाग अपेक्षित आहे. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना सहभागी होता येणार नाही किंवा त्यांच्या कला गुणांचे कौतूक नाही. कौतूक तर आहेच पण त्यांच्याकडून त्यांच्या पालकांना जरा जास्ती मेहेनत करून घ्यावी लागेल आणि ऐनवेळी काही अडचण (गाताना किंवा ध्वनिमुद्रीत करताना कीवा आणखिन काही) ऊपस्थित होवू नये या दृष्टीने फक्त ही वयाची अट ठेवली आहे.

याशिवाय तूर्तास मायबोली सदस्य नसलेले पण चांगले गायक (मायबोलीकरांचे मित्र, नाते संबंधी वगैरे) या प्रकल्पात सहभागी होवू शकतात का अशीही विचारणा झाली होती. फक्त या वा अशा प्रकल्पासाठी मायबोलीचे सदस्यत्व घेवून तसा सहभाग करणे "टेक्निकली" शक्य आहे हे मला माहित आहे व यापूर्वी देखिल गणेशोत्सव, दिवाळी अंक यामध्येही अशा प्रकारे सहभाग झालेला आहे हेही मला माहित आहे. पण मायबोली शी मुळात नाळ जोडलेली असणारे सदस्य आणि त्यांनी मायबोलीसाठी दिलेले हे योगदान वा सादर केलेले मायबोली गीत अशी या प्रकल्पाची संकल्पना आहे. श्री. उल्हास भिडे यांनी मायबोली वर लिहीलेले गीत हे निव्वळ गीत नसून मायबोलीची गेल्या अनेक वर्षांची परंपरा, प्रतिमा, संस्कृती याचे ते सार आहे. त्या गीतातील शब्द मायबोलीवरील सदस्यांचा वावर, वैचारीक देवाण घेवाण, मायबोलीचे काम याचे प्रतिनिधीत्व करतात असे मला वाटते. त्याला भावनिक व भौतिक न्याय मायबोलीकर यथार्थ देवू शकतील यावर माझा विश्वास आहे. (अपवाद फक्त वाद्य वृंदाचा ठेवला आहे कारण सध्या त्याला दुसरा पर्याय नाही!)तेव्हा तूर्तास अशा सर्व मायबोली बाहेरील गुणी कलाकार गायक मंडळींचा आदर ठेवून, या प्रकल्पात मायबोली सदस्य वा त्यांची मूले यांचा सहभाग अपेक्षित आहे. कृ. गैरसमज नसावा.
(या संबंधात मायबोली संस्थापक, व अ‍ॅडमिन यांची सहमती आहे. तरिही काही शंका वा प्रश्ण असतील तर संबंधितांनी संस्थापक वा अ‍ॅडमिन यांच्याशी जरूर संपर्क साधावा.)

योग, मला स्वतःलाच ही वयाची शंका आली होती. म्हणून विचारलं होतं. थोडा मोठा होईपर्यंत धीर धरायला सांगते लेकाला. Happy
शुभेच्छा.

सर्व मायबोलीकर,

भरगच्च प्रतिसादाबद्दल धन्यवाद! गायकांचा कोरम हाऊस्सफुल्ल होत आहे. मुंबई (त्यातही पश्चिम मुंबईकर), पुणे आघाडीवर आहेच. अमिराती मधील मायबोलीकर देखिल मागे नाहीत. युके मधूनही सहभाग नोंद झालेली आहे. खेरीज अमेरीकेमधून काही जुने/जाणते मायबोलीकर देखिल सहभागी झाले आहेत तेव्हा अजूनही ज्यांना सामिल व्हायचे आहे (मुख्य गायक वा समूह गान) त्यांनी ८ ऑक्टोबर पर्यंत ईथे नावे नोंदवावीत. जपान, सिंगापूर, ऑस्सी, गल्फ, व ईतर देशातील, प्रांतांतील मायबोलीकरांनो तुमचीही नावे येवू देत. ईथे जाहीर करायचे नसेल तर मला/रूनी यांना मायबोली संपर्कातून मेल केलीत तरी चालेल.

पुनः एकदा: समूहगानासाठी ताल, सूर याचे प्राथमिक ज्ञान पुरेसे आहे- तुमची ईच्छाशक्ती व ईतरांबरोबरच यात सहभागी होण्याची आवड/आनंद हे अधिक महत्वाचे.

मात्र, लहान मुला-मुलींच्या सहभागाची नावे दोन चारच आहेत. अधिक नावांच्या प्रतीक्षेत.. (शक्यतो १० वर्षाच्या वरील वयोगट. पण पालक मुख्य जबाबदारी घेत असतील- पाल्याकडून गावून घेण्याची, तर त्या खालील वयाच्या मुलांचा सहभागही चालेल. मी व इतर विभाग समन्वयक मदतीला असतीलच.)

ताकः या ऊपक्रमात आई-मुलगा/मुलगी, बहिणी, नवरा-बायको अशा जोड्यांच्या सहभागाची नोंद झालेली आहे. आता झक्की-रॉबीनहूड या जोडगोळीच्या प्रतीक्षेत! Happy

(फक्त गटग ला गाणार्‍या व ईथे सहभाग न नोंदवणार्‍या मा.बो. करांवर विशेष शिस्तभंगाची कारवाई केली जावी) Happy ~दिवे

सकारात्मक प्रतिसाद व सहभाग नोंदणीबद्दल पुनः एकदा सर्वांना धन्यवाद!

सर्व संबंधितांना लवकरच ईमेल/मोबाईल द्वारा मी/समन्वयक संपर्क करतील/करत आहेत. ऑक्टोबर मध्ये ठाणे, मुंबई, पुणे ईथल्या रिहरसल्स चालू होत आहेत. बाकी ठिकाणच्या कार्यक्रमाबाबत लवकरच ईमेल मधून कळवले जाईल.

अ‍ॅडमिन टीम,
हा धागा तुम्ही आवश्यकता वाटल्यास आता बंद करून शकता. शिवाय सर्व संबंधितांशी ईमेल/मोबाईल द्वारा संपर्क ठेवणे सोयीचे असल्याने शीर्षकगीत संदर्भातील पुढील कार्यक्रमासाठी दुसर्‍या वेगळ्या धाग्याची मला वैयक्तीक गरज दिसत नाही.

Pages