मायबोली शीर्षक गीत - सहभाग

Submitted by Admin-team on 30 September, 2011 - 03:57

नुकत्याच झालेल्या मायबोली गणेशोत्सवात मायबोली शीर्षकगीत स्पर्धा झाली होती. त्यात उल्हास भिडे यांच्या गीताला पहिले पारितोषिक मिळाले होते.आपले एक मायबोलीकर योग यांनी पुढाकार घेऊन प्रथम आलेल्या कवितेला संगीत देण्याचा विचार मांडला होता. तो आता प्रत्यक्षात आणायचा आहे. यासाठी तुम्हां सर्वांची सांगीतिक साथ हवी आहे. जगभर पाऊलखुणा असलेल्या मायबोलीचे शीर्षकगीतदेखील जागतिक असावे, अशी इच्छा आहे. या उपक्रमाचे प्रमुख संयोजक व्हायला योग यांनी होकार दिला याबद्दल त्यांचे आभार. तसेच श्री. उल्हास भिडे यांनीदेखील मायबोलीला हे गीत शीर्षकगीत करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार.

तर या उपक्रमात तुम्हांला किंवा तुमच्या मुलांना गायक म्हणून सहभागी व्हायचे असेल तर ८ ऑक्टोबरपर्यंत या धाग्यावर कळवा आणि तुमची खालील माहिती योग अथवा रुनी पॉटर यांना संपर्क सुविधा वापरून पाठवा.

१. तुमचे सदस्य नाव
२. खरे नाव
३. राहण्याचे ठिकाण / शहर
४. संपर्कासाठी इमेल पत्ता.

या उपक्रमात जगभर असेलल्या मायबोलीकरांनी सहभागी व्हावे, असा उद्देश आहे. त्या्मुळे खालील दोनप्रकारे तुम्ही सहभागी होऊ शकता.
१. गायक
२. विभागीय समन्वयक (Regional Coordinator).

तसेच तुमच्या माहितीत जर कोणी चांगले गाऊ शकणारे मायबोलीकर असतील तर त्यांनाही या उपक्रमाबद्दल कळवा आणि भाग घ्यायला जरूर सांगा. एकदा सहभाग समजला की पुढील प्रक्रिया आणि एकंदर वेळ याबद्दल माहिती देण्यात येईल.

सर्वांच्या सहकार्याने मायबोलीचे एक उत्तम शीर्षकगीत प्रकाशित करूया!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या प्रकल्पाला माझ्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्याकडून जर काही मदत होण्यासारखी असेल तर मी नक्कीच करायला तयार आहे.

व्वा. हार्दिक शुभेच्छा!!.
उल्हास काका, अभिनंदन.

ग्रेट!!! Happy

जगभर पाऊलखुणा असलेल्या मायबोलीचे शीर्षकगीतदेखील जागतिक असावे<<< उत्तम कल्पना Happy

अ‍ॅडमिन, रुनी, योग आणि उल्हासकाका धन्यवाद Happy

उपक्रमाला भरपुर शुभेच्छा!

लवकरच मायबोलीचे शिर्षक गीत ऐकायला मिळु दे Happy

विभागीय समन्वयक म्हणून नक्की कश्या प्रकारचं काम असेल? माझ्या आवाक्यातलं असेल तर मी करायला तयार आहे.

उल्हास काका, अभिनंदन आणि प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा!
मला वाटते वर उल्हास भिडे यांच्या गीताची लिंक द्यावी. ज्यांनी वाचले नसेल त्यांना शोधायला जास्त कष्ट पडणार नाही.

व्वा

मस्त उपक्रम आणि उपयुक्तही ! उल्हासरावांचे व टीमचेही अभिनंदन!

माझ्या माहितीत, जूनी मायबोलीकर सई उत्तम गाते. मी स्वतः तिचे गाणे ऐकलेय.
दक्षिणा... प्लीज आग्रह करणार का ?

सहिये. Happy

अ‍ॅडमिन टिम,
धागा ऊघडल्याबद्दल आभार. वैयक्तीक वा ईतरांच्या ओळखीतून संपर्क पेक्षा या धाग्यावर सर्वांना एकत्र करणे अधिक सोयीचे व सुलभ होईल, विशेषतः जगभरातील मायबोलीकरांना सहभागी करायचा प्रयत्न आहे म्हणून.

मराठी अभिमान गीतासारखेच असे जागतिक मायबोली शीर्षक गीत करायचे हे शिवधनुष्य पेलायला तुमची मदत नक्कीच हवी. तेव्हा सर्व मायबोलीकरांना प्रेमाचा आग्रह: तुमच्यातील कलाकाराला या निमित्ताने मायबोलीच्या इतीहासात एका वेगळ्या अर्थाने सहाभागी होण्याची संधी मिळू देत. मुख्यतः गायक हवे आहेत. पट्टीचे गाणारे नसले तरी हरकत नाही . किमान ताल सूर याचे थोडे ज्ञान व दिलेली ओळ आपण सुरात म्हणू शकू एव्हडा आत्मविश्वास असेल तर फार काही अवघड काम नसेल- कोरस/समूह गान मध्ये तुम्ही नक्कीच सहभागी होवू शकाल.
मुख्य गायक अर्थातच पूर्व अनुभव व गायकीचे अंग असलेले, मायबोलीकर असतील. मायबोलीवर असे गायक/गायिका आहेत जे माहित आहेत, ऐकले आहेत, पण या बाफ वर अजूनही अधिक संख्येने अनेक नावे पुढे येतील अशी आशा करतो. तूर्तास फक्त मायबोलीवरील सभासद/सदस्य वा त्यांची मूले ईतपतच मर्यादीत आहे. लाहानांचाही खास कोरस/समूह गान असेलच. वाद्यवृंद मात्र अर्थातच बाहेरचे व्यावसायिक कलाकार असतील.
विभाग समन्वयक चे काम असे असेलः या गीतात US, UK, India, AUS, UAE, Gulf, SEA (Souht East Asia), East Asia, अशा अनेक देश, ऊपखंडातून असलेल्या सर्व मायबोलीकरांना यात सहभागी करून त्यांचे ध्वनिमुद्रण केले जाणार आहे. त्यासाठी त्यांना त्या त्या भागात एकत्र दिल्या वेळेला/तारखेला जमवणे (जागी वा नेट वर) हे काम करण्यासाठी मुख्यतः मदत करणे हे काम असेल. खरे तर यासाठी सहभागी माबो करांचे मिनी गटग देखिल होवू शकते. या सर्व कार्यक्रमाचे "मेकिंग ऑफ मायबोली शीर्षक गीत" अशा स्वरूपात व्हिडीयो रेकॉर्डींग करायची कल्पनाही मायबोली संस्थापकांनी मांडली आहे. त्या दृष्टिने विभाग समन्वयकांची भूमिका देखिल महत्वाची ठरेल.

सहभागी होण्यास ऊत्सुक असलेल्यां सर्वांनी (कशा प्रकारचा सहभाग) आपली नावे या बाफ वर नोंदवावीत. मग अशा सर्वांसाठी मर्यादीत दुसरा बाफ ऊघडून या ऊपक्रमाविषयी सर्व रुपरेषा वगैरे याची तिथेच चर्चा व योजना होईल.

गाण्याच्या म्युझिक ट्रॅक्स चे काम लवकरच मुंबईत सुरू होत आहे, दरम्यान या बाफ वरील नावे/नोंदी दिलेल्या तारखेपर्यंत पूर्ण झाल्या की पुढील काम हाती घेतले जाईल.

आभार!

स्काईप हे एक विनामूल्य माध्यम आहे आणि त्यावर एकाचवेळी १५-२० लोक एकत्र येऊन चर्चा शकतात...मायबोली शीर्षक गीताचा हा उपक्रम जागतिक पातळीवर राबवला जात आहे..म्हणूनच माझी एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण सूचना करतोय की इच्छुक लोकांनी स्काईप(नसल्यास) आपल्या संगणकावर उतरवून घ्यावे...योग ह्यांना संगीतकार म्हणून एकाच(ठरवलेल्या) वेळी अनेक कलाकारांशी एकत्रपणे संवाद साधता येईल.

अरे काय मस्तच!
मायबोलीचं शीर्षकगीत गायला मिळणे ही फार भाग्याची गोष्ट असेल माझ्यासाठी. खूपच शुभेच्छा.

मस्त उपक्रम..... शुभेच्छा..!!!
मला गायक म्हणून नक्की सहभागी व्हायला आवडेल....... कोणाला , कसा संपर्क करायचा.... पूर्वानुभव आहे.

>>कोणाला , कसा संपर्क करायचा

भुंगा, (व ईतर)
तूर्तास या बाफ वर तुमचे नाव व कशा प्रकारचा सहभाग याची नोंदणी केलीत की काम झाले. पण निव्वळ समूह गान नाही तर प्रमुख गायनातही सामील व्हायचे असेल तर गायनाचा अनुभव, शिक्षण/आवड याबद्दलही कळवलेत तर बरे होईल. म्हणजे तशी लिस्ट बनवता येईल.
शिवाय वर बाफ च्या सूचनेत म्हटल्याप्रमाणे तुमची खालील माहिती योग अथवा रुनी पॉटर यांना पाठवा.
(तुमचा पत्ता, ईमेल वगैरे माहिती सुरक्षित असावी म्हणून या बाफ वर न देता माबो-संपर्कातून पाठवलेत तरी चालेल.)
१. तुमचे सदस्य नाव
२. खरे नाव
३. राहण्याचे ठिकाण / शहर
४. संपर्कासाठी इमेल पत्ता.

वा मस्त उपक्रम !! आपली मायबोलीकरीण जयावी पण छान गाते हे तर सगळ्यांना माहित आहेच !!

मस्त उपक्रम ... खुप खुप शुभेच्छा Happy
मायबोलीचे गाणे ऐकायला कानातुर झालेत ..

उल्हास भिडे यांच अभिनंदन व या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा .माझा आवाज नेहमीच चांगला लागतो अस नाही ,कधी कधी खूप छान लागतो कधी कधी अजिबात लागत नाही ,अगदी बेभरवशाचा.त्यामुळे इच्छा असून सहभाग घेवु शकत नाही.

Pages