'देऊळ' आणि मायबोली

Submitted by Admin-team on 29 September, 2011 - 02:37

'मायबोली'वर आपण नेहमीच नवनवीन कल्पना आणि उपक्रम राबवत असतो. तुमच्या सहभागामुळेच ते उपक्रम वाढीस लागतात.

'मायबोली'ने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारणं, हाही या नव्या उपक्रमांचाच एक भाग आहे. याची सुरुवात झाली ती आपल्याच मायबोलीकरांच्या 'शब्द झाले मायबाप' या कार्यक्रमापासून.

आता पुढचे पाऊल टाकत आहोत 'देऊळ' या नवीन मराठी चित्रपटाचे माध्यम प्रायोजकत्व स्वीकारून.

’वळू’ आणि ’विहीर’नंतर उमेश विनायक कुलकर्णी आणि गिरीश पांडुरंग कुलकर्णी घेऊन येत आहेत
एका इरसाल गावाची हलकीफुलकी कथा - ’देऊळ’.

एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजक म्हणून सहभागी होणं, हे 'मायबोली'साठी अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद आहे.

deul_poster.jpg

४ नोव्हेंबर, २०११ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाच्या निमित्तानं मायबोलीवर असतील कलाकार-तंत्रज्ञांच्या मुलाखती, चित्रपटनिर्मितीची पडद्यामागची कहाणी आणि भरपूर स्पर्धा, खेळ व आकर्षक बक्षिसं..

तर मंडळी, तयार व्हा 'देऊळ'चं स्वागत करायला..मायबोली.कॉमवर..

विषय: 
Groups audience: 

आत्तच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत 'देऊळ'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक.
गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि संवाद पुरस्कार.

संपूर्ण 'देउळ' टीमचे हार्दिक अभिनंदन.

सर्व टीमचे अभिनंदन! तसेच माध्यम प्रायोजक म्हणून मायबोलीने केलेली निवडही यामुळे योग्य ठरली, त्यासाठी मायबोलीतील त्या टीमचेही अभिनंदन.

'देऊळ', 'बालगंधर्व' आणि 'शाळा' या तिन्ही चित्रपटांशी संबंधित सर्वांचे, तसंच आनंद पटवर्धन, वीरेंद्र वळसंगकर, विक्रम गायकवाडआणि रेणू सावंत यांचं हार्दिक अभिनंदन Happy

Pages