'मायबोली'वर आपण नेहमीच नवनवीन कल्पना आणि उपक्रम राबवत असतो. तुमच्या सहभागामुळेच ते उपक्रम वाढीस लागतात.
'मायबोली'ने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारणं, हाही या नव्या उपक्रमांचाच एक भाग आहे. याची सुरुवात झाली ती आपल्याच मायबोलीकरांच्या 'शब्द झाले मायबाप' या कार्यक्रमापासून.
आता पुढचे पाऊल टाकत आहोत 'देऊळ' या नवीन मराठी चित्रपटाचे माध्यम प्रायोजकत्व स्वीकारून.
’वळू’ आणि ’विहीर’नंतर उमेश विनायक कुलकर्णी आणि गिरीश पांडुरंग कुलकर्णी घेऊन येत आहेत
एका इरसाल गावाची हलकीफुलकी कथा - ’देऊळ’.
एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजक म्हणून सहभागी होणं, हे 'मायबोली'साठी अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद आहे.
४ नोव्हेंबर, २०११ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार्या या चित्रपटाच्या निमित्तानं मायबोलीवर असतील कलाकार-तंत्रज्ञांच्या मुलाखती, चित्रपटनिर्मितीची पडद्यामागची कहाणी आणि भरपूर स्पर्धा, खेळ व आकर्षक बक्षिसं..
तर मंडळी, तयार व्हा 'देऊळ'चं स्वागत करायला..मायबोली.कॉमवर..
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे वा! शुभेच्छा!!!
अरे वा!
शुभेच्छा!!!
अभिनंदन.
अभिनंदन.
ह्या चित्रपटाचं ट्रेलर मागे
ह्या चित्रपटाचं ट्रेलर मागे कुणी तरी पार्ल्यात दिलं होतं. आवडलं. नाना पाटेकर असल्यामुळे चित्रपट नक्की बघणार.
अरे वा... देवळाची वाट
अरे वा... देवळाची वाट पहातोय.. अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा
ग्रेट!!! अभिनंदन आणि भरपूर
ग्रेट!!!
अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा!!
मायबोली आणि देऊळ टीमला खुप
मायबोली आणि देऊळ टीमला खुप सार्या शुभेच्छा !
अर्रे.. क्या बात है.
अर्रे.. क्या बात है. अभिनंदन...
अरे वा!! अभिनंदन व
अरे वा!! अभिनंदन व नाविन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा.
स्वागत..... वाट पाहतोय..!!!
स्वागत..... वाट पाहतोय..!!!
शुभेछा अन् अभिनंदन !
शुभेछा अन् अभिनंदन !
अभिनंदन मायबोली.. Admin team
अभिनंदन मायबोली..
Admin team - हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित करायला काय करावे लागेल सांगू शकाल का? किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांशी / वितरकांशी आपला संपर्क असल्यास त्यांना विचारून सांगता येईल का? इथल्या महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने आधी वळू, मी शिवाजीराजे, कदाचित वगैरे चित्रपट आले होते तसाच हा चित्रपट आला तर त्याला नक्कि भरघोस प्रतिसाद मिळेल. आणि ब्रुहन महाराष्ट्र मंडळाची मदत घेऊन; विविध शहरातल्या महाराष्ट्र मंडळांना एकत्र आणून, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी लागणारी मदत आम्ही जमवू शकतो. अधिक माहिती मिळाल्यास वा चर्चेसाठी मला कधीही इमेल पाठवा.
धन्यवाद.
त्रिवार अभिनंदन!
त्रिवार अभिनंदन!
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
अभिनंदन, नाना, दिलीप
अभिनंदन,
नाना, दिलीप प्रभावळकर आणि सोनाली ... चित्रपट नक्कीच छान असणार.
@चौकट राजा... चित्रपटाच्या
@चौकट राजा...
चित्रपटाच्या निर्मात्यांशी / वितरकांशी आपला संपर्क असल्यास त्यांना विचारून सांगता येईल का???...>>> या चित्रपटाचे निर्माते श्री. अभिजीत घोलप हे महाराष्ट्रीय ऊद्योजक आहेत. त्यांची OPTRA Systems या नावाने एक Software कंपनी आहे, आणी त्यांचे Office, Silicon Valley मधे आहे. त्या द्वारे आपण प्रयत्न करु शकता...
अभिनंदन! सुंदर सुलेखन. अच्युत
अभिनंदन! सुंदर सुलेखन. अच्युत पालव?
सहीच! एक मायबोलीकरीण ह्या
सहीच! एक मायबोलीकरीण ह्या नात्याने माझी कॉलर टाईट! अभिनंदन
नव्या उपक्रमासाठी हार्दिक
नव्या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन!
विवेक - माहिती बद्दल धन्यवाद.
विवेक - माहिती बद्दल धन्यवाद.
आज पेपरमध्ये 'देऊळ'ची मोठी
आज पेपरमध्ये 'देऊळ'ची मोठी जाहिरात पाहिली. पण खाली 'मिडिया पार्टनर्स' म्हणून रेडियो-मिर्ची आणि अजून एका न्यूज-चॅनलचं नाव होतं. मग मायबोली ऑनलाईन मिडिया पार्टनर आहे का?
शुभेच्छा!!!
शुभेच्छा!!!
अभिनंदन ! अजून एक चांगला
अभिनंदन ! अजून एक चांगला मराठी सिनेमा
मस्त! बरं, पण माध्यमप्रायोजक
मस्त!
बरं, पण माध्यमप्रायोजक मायबोलीचा सभासद या नात्याने मी नेमके काय करणे अपेक्षित आहे?
पण खाली 'मिडिया पार्टनर्स'
पण खाली 'मिडिया पार्टनर्स' म्हणून रेडियो-मिर्ची आणि अजून एका न्यूज-चॅनलचं नाव होतं. >> मायबोली या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायच्या आधी बरंचंसं प्रसिद्धी साहित्य तयार झालं होतं. त्यामुळे त्यात मायबोलीचा लोगो आलेला नाही. आम्ही हा प्रतिसाद निर्मात्यांच्या नजरेस आणून दिला आहे.. धन्यवाद.
माध्यमप्रायोजक मायबोलीचा सभासद या नात्याने मी नेमके काय करणे अपेक्षित आहे?>> विविध स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये भाग घ्या आणि बक्षिसे मिळवा.
वा वा, अभिनंदन!
वा वा, अभिनंदन!
शुभेच्छा सह अभिनंदन !
शुभेच्छा सह अभिनंदन !
न्यू यॉर्क इथे पार पडलेल्या
न्यू यॉर्क इथे पार पडलेल्या 'साउथ एशियन फिल्म फेस्टिवल'मध्ये ’देऊळ’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाची (परीक्षकांचं आणि प्रेक्षकांचं) दोन पारितोषिकं मिळाली आहेत.
'मायबोली'तर्फे सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांचं हार्दिक अभिनंदन
Pages