हस्तकला: आरसे वापरून विणकाम सोबत एक उतरंड

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हे पाऊच संक्रांतीच्या वाणासाठी बनवले होते. त्याच्यावरचे काचकाम पण घरीच केले आणि पाऊच सुद्धा घरीच बनवले. एकूण ४० पाऊच बनवण्यासाठी ३ दिवस लागले होते.

vaan.jpgvaan_1.jpg

भाचीच्या रुखवदासाठी हि उतरंड ओळखीच्या कुंभाराकडून बनवून घेतली व घरी रंगवली. (प्रेरणा अर्थातच रूनीकडून)

utarand.jpg

विषय: 

सहिच आहेस ग. मस्त. मी बनवायचे असे काहीबाही आधी. आता नाही वेळ मिळत. तरी ३ वर्षापुर्वी मी २-३ गळ्यातले नेकलेस बनवले होते.

मस्त! Happy अन ३ दिवसात ४० पाऊच शिवणे एकवेळ शक्य आहे पण ते आरसेही बसवले विणकामाने म्हणजे खुपच भारी!

नलिनी, काय उद्योगी आहेस गं!! अर्थात चांगल्या अर्थाने Happy
घर, बाळ आणि कॉलेज संभाळून >> ३ दिवसात ४० पाऊच शिवणे >> आरसेही बसवले विणकामाने !!! ___/\___

घर, बाळ आणि कॉलेज संभाळून >> यापैकी मी एकतरी गोष्ट धड सांभाळू शकले काही गोंधळ न घालता तरी नवरा सादं घालेल मला...
हौस आहे मलाही असं छान काही बाही बनवायची पण अर्धा पसारा केला की उत्साह मावळतो. म्हणून शक्यतो घोळ नाही घालत. Sad

तू मात्र खरंच खूप अप्रतिम केलेस पाऊचेस!!!

लिंबुटिंबू, दिनेशदादा, ड्रीमगर्ल, स्मितागद्रे, अनघा, धन्यवाद. Happy

एका कापडावर सगळ्या काचा हव्या त्या अंतरावर चिकटवून घेतल्या होत्या. विणकाम हे शक्यतो पिल्लू झोपेल त्या वेळेत दुपारी आणि रात्री असे केले ( सुया, दोरे लागणारे मणी आणि इतर सामान म्हणून). ह्या सगळ्यात जरीचे ८-१० पदरी दोरे हाताळनेच जरा जिकरीचे काम वाटले.
सलग ४ तासात सगळे पाऊचेस शिवून झाले. त्यात सिलाई मशिन जरा आजारी असल्याने काही ठीकाणी मधेच शिलाई खराब आलीय.

हे शिकायला घेतलं तेव्हा भारतात रहाण्याचे दिवस संपत आले होतेच, गुणी बाळ शिवाय मी शिकायला जाई तेवढा वेळ त्याला सांभाळणारी योगितामाऊ...म्हणून शक्य झालं.:)

खूप सुन्दर.... आरसा च्या भोवती चे दोरे माळा नंतर हलत नाही का? कि चिकटवून लावल्या मुळे तसे राहतात?

मी_चिऊ, लाजो, वृषा, अमा, धन्यवाद!
आरसा च्या भोवती चे दोरे माळा नंतर हलत नाही का? कि चिकटवून लावल्या मुळे तसे राहतात?>>>> फक्त आरसे चिकटवून घेतलेले आहेत. विणताणाच जर दोरे व्यवस्थित ओढून घेतले तर शक्यतो काहीच हलत नाही.