मासे ३५) सुरमई

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 September, 2011 - 03:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुरमईच्या ४-५ तुकड्या
चिमुटभर हिंग
हळद अर्धा चमचा चमचा
मसाला १ ते २ चमचे (तिखटाच्या आवडीवर)
मिठ अंदाजे

ही आहे सुरमई

क्रमवार पाककृती: 

१) सुरमईच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या.

२) तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या.

३) पॅन गरम करुन त्यात तेल चांगले गरम करा. गॅस मिडीयम ठेवा व त्यात तुकड्या सोडून द्या.

४) तुकड्या पातळ असतील तर ३-४ मिनीटे आणि जर जाड्या असतील तर मंद पेक्षा थोडा मोठा गॅस ठेउन ५-६ मिनीटे एक बाजु शिजवुन पलटून तेवढाच वेळ ठेवून गॅस बंद करावा. अगदीच रहावले नाही तर एक तुकडा जेवायच्या अधी मोडून खायला सुरमईची काहीच हरकत नसते Happy

महत्वाची सुचना : हा फोटो पाहुन कोणी जळू नये आणि जळल्यास मी जबाबदार नाही. Lol

वाढणी/प्रमाण: 
मोठा गहन प्रश्न आहे हा सुरमईच्या बाबतीत तो तुम्हीच सोडवावा.
अधिक टिपा: 

सुरमई ही मत्स्यप्रेमींची लाडकीच. त्यामुळे ही अर्थात कोळणींचीही लाडकीच. स्वस्त भावात सोडायला त्या तयार नसतात. हिची एक तुकडीच जवळ जवळ ५० रुपयाला मिळते.

सुरमई खात्री पुर्वक घ्यावी. कारण सुरमईच्या नावाखाली कुपा हा मासाही कोळणी खपवतात. कुपा माश्याला सुरमईची चव नसते. फक्त दिसायला साधारण तसाच असतो. सुरमई ही चकचकीत असुन छोट्या सुरमईच्या कातडीवर काळपट ठिपके असतात बाजुने तर मोठया सुरमई वरील फोटोत दाखवल्या प्रमाणे.

सुरमईचे कालवण इतर कालवणांसारखेच करतात.

तळताना तुमच्या आवडीनुसार आल-लसुण वाटण, लिंबु पिळून लावू शकता.

माहितीचा स्रोत: 
मस्तप्रेमिंना मला वाटत सुरमई बालपणापासूनच माहित असते.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुई रंगत येईल आता जेवणात.

सारीका मॅडम (शाळेतल्या शुद्धलेखन तपासणार्‍या ह्या अर्थाने :स्मित:) लिखाणात दुरुस्ती केली आहे.

महेश अजुन कोळी गाणी पण आहेत ना.

निकिता Happy

मलाही सुरमई अखियोमे गाणेच आठवले. दिवाळी आली की बाजारात सुरमईचा पाऊस पडायला लागतो.

आज दोन घास जास्त जातील जागु कृपेने.

मी एकदा चुकून कुपा आणलेला सुरमई सारखा दिसतो म्हणजे तसाच लागत असणार असे समजुन. भयाण लागतो Sad

दक्षे मला प्रचंड धक्का बसला तुझ वाक्य वाचुन. अग मग आख्खी तुकडीपण खाउन बघ.

अश्विनी Lol

साधना खुप जण फसतात.

दक्षे... दोन तुकडे?? मग बाकी राहिलं काय? Wink
माझा आवडता मासा. मोठी सुरमय, (आम्ही त्याला ईस्वण म्हणतो) रवा लावुन तळायची... यम्मी! Happy

मसाला .................???????????????

जागू, मस्त रेसिपी आणि लिहिल्येसही छान. Happy

कोणीतरी माहितगारांनी या माशांच्या मराठी आणि इंग्रजी नावांचा तक्ता करा प्लीज. इथे ओरिएन्टल मार्केट्समधे काही प्रकार मिळतात, पण माझ्यासारख्या नवमांसाहारींना ओळखता येत नाहीत.

Pages