उद्योगवार्ता

Submitted by साजिरा on 22 September, 2011 - 08:46

उद्योगजगतातल्या घडामोडी, बातम्या इ. बद्दलच्या गप्पांसाठी हे पान वापरू या. तुम्हाला समजलेल्या, तुम्ही इतरत्र वाचलेल्या घटना, निरनिराळ्या व्यवसाय-उद्योग क्षेत्रात चालत असलेल्या हालचाली आणि वेळॉवेळी होत असलेले किंवा होऊ घातलेले बदल इतरांना सांगण्यासाठी, आणि त्यावर मते मांडण्यासाठी हे पान.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोर्स मोटरची वैयक्तीक मालकीच्या गाड्यांच्या प्रकारात "फोर्स वन" च्या सहाय्याने एन्ट्री...

http://www.forceone.co.in/technology.php#content

२.२ लीटरच्या डीझेल इंजिनवर ही गाडी चालणार आहे.. इंजिन भारतात बनवलेले असून त्याचे लायसेन्स डॅमलर एजी, जर्मनी म्हणजेच मर्सीडीज कडे आए.. दिसायला तरी गाडी जबरी दिसते आहे.. आणि सध्याची किंमत १०.६ लाख (Ex-showroom Pune) ह्या प्रकारातल्या बाकीच्या गाड्यांच्या मानाने कमी आहे.. पण सध्या तरी त्यात ABS आणी Air bags नाहीयेत. ते येतील तेव्हा किंमत नक्कीच वाढेल पण तरीही बाकीच्या गाड्यांच्या बरोबरच असेल..

लघु उद्योजकांसाठी मोफत वेबसाइट

गुगलने देशातील लघु आणि मध्यम उद्योजकांना मोफत वेबसाइट देऊ केली आहे . www.indiagetonline.in या वेबसाइटवर गुगलने सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे . सविस्तर वृत्त : म.टा. बातमी