कधी एकदा सप्टेंबरचा मध्य उगवतोय असं झालेलं. त्यात रोज कासची आठवण येत होती. पण काहीही करून शनि - रविवारची गर्दी टाळायची होती म्हणून गुरूवारी रात्री सातार्याची वस पकडली आणि सकाळी ६ ला सातारा एस्.टी स्टँडवर हजर झालो.
शहराची काही माहीती नव्हती म्हणून विदिपांना फोन केला तर त्यांनी प्रसाद गोडबोले (पंत) बरोबर बोलण्यास सांगितले. तो नेमका सातार्याचाच. त्याने खूप मदत केली. कुठुन कसा जाशील हे कळल्याने पुढचा प्रवास सोपा झाला होता.
सातार्यात उतरल्यावर एक गाडी भाड्याने घेतली आणि निघालो कासला. सकाळची ७.३० ची वेळ, सर्वत्र पसरलेलं धुकं, माजलेला रानवारा आणि हाडं गोठवणारी थंडी या अवस्थेत पठारावर उतरलो. समोर दिसणारे द्रुश्य तर शब्दातीत न करता येण्याजोगं. दुरवर पसरलेली फुलांची दुलई आणि त्यांवर संथगतीने उडणारे ढग......
म्हटलं, कॅमेरा असाच ठेवावा गाडीत अन् अनुभवावं हे सारं. आमची आणि अजून एक दुसरी गाडी सोडली तर कोणी नव्ह्तं तिथे. वरुणराजा तो तिथेच असल्याची साक्ष देत होता. मग म्हटलं, आता हे सगळं आयुष्यभरासाठी जपावं म्हणून काढला कॅमेरा आणि घेतले फोटो.
सोसाट्याचा वारा, अंधूक प्रकाश आणि पावसाची रिपरिप या परिस्थितीत खालील फोटो काढले गेलेत.
मस्त वेळ गेला. पाय निघवत नव्हते. पण निघालो ते पुढल्यावर्षी नक्की परत भेट देण्याचा निर्धार करूनच..
=============================================================================
फार सुंदर फोटो......... वर्णन
फार सुंदर फोटो......... वर्णन करायला शब्द नाहीत.
मस्त!!
मस्त!!
येकदम झ्यक्यास...अभिमान आहे
येकदम झ्यक्यास...अभिमान आहे कि हा कासचा निसर्ग दरवर्षी एकदातरी पाहाण्यात येतो
सुंदरच.
सुंदरच.
खरोखर सुंदर नयनरम्य मनोरम
खरोखर सुंदर नयनरम्य मनोरम दृष्य. फोटोग्राफीत आपला हातखंडा आहे.
अवांतर: फोटो प्रोसेस केले नाहीत ना?
धन्यवाद मंडळी.. पाषाणभेद,
धन्यवाद मंडळी..
पाषाणभेद, फोटो काँन्ट्रास्ट वाढविणे सोडले तर बाकी काही न करता अप केले गेलेत. फक्त बॉर्डर काळी ठेवली जेणेकरून फोटो जास्त ठळकपणे अपील होतील.
शब्दच नाही आहेत.....धन्यवाद
शब्दच नाही आहेत.....धन्यवाद इतकी झकास कासची सफर घडवल्या बद्द्ल
सुंदर आलेत फोटो..फुलं कसली
सुंदर आलेत फोटो..फुलं कसली आहेत?.जांभळी रंगाची -तेरडा आहे.ते पिवळ्या रंगाचं फुल काय मस्तं आहे...
सुंदर !
सुंदर !
(No subject)
बॉर्डर इतकी जाड का
बॉर्डर इतकी जाड का ठेवलीयस...?
सुंदर फोटो आहेत.... पण
सुंदर फोटो आहेत.... पण बॉर्डरच काहीतरी कर........
Pages