कास पठार (निसर्गनिर्मित फुलांची आच्छादने पांघरलेला स्वर्गच)

Submitted by स्मितहास्य on 19 September, 2011 - 01:11

कधी एकदा सप्टेंबरचा मध्य उगवतोय असं झालेलं. त्यात रोज कासची आठवण येत होती. पण काहीही करून शनि - रविवारची गर्दी टाळायची होती म्हणून गुरूवारी रात्री सातार्‍याची वस पकडली आणि सकाळी ६ ला सातारा एस्.टी स्टँडवर हजर झालो.
शहराची काही माहीती नव्हती म्हणून विदिपांना फोन केला तर त्यांनी प्रसाद गोडबोले (पंत) बरोबर बोलण्यास सांगितले. तो नेमका सातार्‍याचाच. त्याने खूप मदत केली. कुठुन कसा जाशील हे कळल्याने पुढचा प्रवास सोपा झाला होता.
सातार्‍यात उतरल्यावर एक गाडी भाड्याने घेतली आणि निघालो कासला. सकाळची ७.३० ची वेळ, सर्वत्र पसरलेलं धुकं, माजलेला रानवारा आणि हाडं गोठवणारी थंडी या अवस्थेत पठारावर उतरलो. समोर दिसणारे द्रुश्य तर शब्दातीत न करता येण्याजोगं. दुरवर पसरलेली फुलांची दुलई आणि त्यांवर संथगतीने उडणारे ढग......
म्हटलं, कॅमेरा असाच ठेवावा गाडीत अन् अनुभवावं हे सारं. आमची आणि अजून एक दुसरी गाडी सोडली तर कोणी नव्ह्तं तिथे. वरुणराजा तो तिथेच असल्याची साक्ष देत होता. मग म्हटलं, आता हे सगळं आयुष्यभरासाठी जपावं म्हणून काढला कॅमेरा आणि घेतले फोटो.
सोसाट्याचा वारा, अंधूक प्रकाश आणि पावसाची रिपरिप या परिस्थितीत खालील फोटो काढले गेलेत.

मस्त वेळ गेला. पाय निघवत नव्हते. पण निघालो ते पुढल्यावर्षी नक्की परत भेट देण्याचा निर्धार करूनच..

=============================================================================

प्रचि १
कास पठार

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

गुलमोहर: 

अ प्र ति म नजारा!! फुलांचा गालिचा, मिकी माऊस, तेरडा सगळच अफलातुन उतरलय!!
डोळ्यांचं पारणं फिटलं! Happy

सुंदर.

अप्रतिम!!!

हे ठिकाण महाराष्ट्रात असल्याचा अभिमान वाटायला लागलाय....

खुप धन्यवाद मी पण नक्की जाणार:)

Pages