बैजिंग ऑलिंपिक्स.... ऍथलेटिक्स...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

अमेरिकेच्या जेसिका हार्डिला... तिच्या रक्तात उत्तेजक सापडल्यामुळे.. टिममधुन परवा काढुन टाकले आहे.. त्या पार्श्वभुमिवर व एकंदरीत गेल्या १०-१२ वर्षात बरेच ऍथलिट्स.. खासकरुन अमेरिकेचे... उत्तेजकांच्या सेवनामुळे... बदनाम झाले असल्यामुळे(ज्यात अमेरिकेची प्रख्यात मेरिअन जोन्स सुद्धा गुंतली होती...) एकंदरीतच त्याचा जनमानसावर विपरित परिणाम झाला आहे व सध्या कोणीही जागतिक विक्रम केला तर सर्वप्रथम सगळ्यांच्या डोक्यात हाच विचार येतो... बहुतेक तो किंवा ती ...उत्तेजके घेत असला/असली पाहीजे!.... तश्या बनावटी व अन-एथिकल ऍथलिट्समुळे सर्व ऑलिंपिक्स व जागतीक स्पर्धांवर एक प्रकारचे उदासनितचे सावट पसरले आहे... त्यामुळे १९६० च्या रोम ऑलिंपिक्सम्धे अनवाणी धाउन मॅरेथॉन स्पर्धा जिंकणारा अबेबे बिकिला किंवा पोलिओतुन सावरलेली विल्मा रुडॉल्फ किंवा आफ्रिकेत... अतिशय गरीबीत मोठा झालेला हेली गेब्रसेलासी... यांच्या कहाण्या व त्यांचे प्रताप म्हणुन अजुनच थोर वाटु लागतात..

मित्रांनो... तरी एक क्रिडाप्रेमी म्हणुन.. या सर्व ऍथलिट्सना.. बेनिफिट ऑफ डाउट देउन.. मी या वर्षीच्या बैजिंग ऑलिंपिक्सच्या... ऍथलेटिक्सच्या स्पर्धा बघणार आहे.

(सर्वप्रथम... ज्यांच्याकडे हाय डेफिनेशन टिव्ही आहेत.. त्यांच्यासाठी...) एन बी सी चे बैजिंग ऑलिंपिक्सचे प्रक्षेपण.. हे ज्यांना क्रिडा हा प्रकार आवडत नाही... त्यांना सुद्धा टिव्हिवर खिळवुन ठेवेल... याची मला खात्री आहे... पिक्चर क्लॅरीटी व कॅमेरा अँगल्स... खासकरुन जलतरण,जिमनॅस्टिक्स व ऍथलेटिक्स इव्हेंट्स मधे... दर्शकांना अक्षरशः त्या त्या व्हेन्युमधे हजर असल्याचा अनुभव देतील याची मला खात्री आहे.. ज्यांच्याक्डे हाय डेफ टिव्ही आहे त्यांनी ही सुवर्णसंधी मुळीच सोडु नका.. व ज्यांच्याकडे तसा टिव्ही नाही त्यांनी त्यांच्या मित्रांकडे तसा टिव्ही असेल तर... त्यांच्याबरोबर या ऑलिंपिक्सचा आस्वाद घ्या...

दुसरी गोष्ट म्हणजे मला स्वतःला एन बी सी चा चिफ ऑलिंपिक्स ब्रॉडकास्टर... बॉब कॉस्टस.. याचे ऑलिंपिक्सचे विवेचन व तो घेत असलेल्या मुलाखती आवडतात.. पण या वर्षी... एन बी सी चा जिम मॅके... निधन पावला म्हणुन तो नसणार..

तर आता या बैजींग ऑलिंपिक्समधल्या ऍथलेटिक्समधल्या पाहण्यासारख्या गोष्टी...

सगळ्यात प्रथम... जगातला सर्वात वेगवान धावपटु.. म्हणजे १०० मिटर्स शर्यत.. जमैकाचे उसेन बोल्ट(सध्याचा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर)व असाफा(असाफाचा अर्थ... रायझिंग टु द ओकेजन!) पॉवेल हे हॉट फेव्हरेट आहेत.. त्यांना लढत असणार आहे अमेरिकेच्या टायसन गे,वॉल्टर डिक्स व डार्व्हिस पॅटन यांचे...

२०० मिटर्स मधे परत एकदा जमैकाचा उसेन बोल्ट फेव्हरेट आहे.. कदाचीत तो १०० व २०० मिटर्स या दोन्ही शर्यती जिंकेल... त्याला लढत असेल अमेरिकेच्या वॉल्टर डिक्स व शॉन क्रॉफर्डची..

४०० मिटर्स मधे अमेरिका १-२ असेल... लशॉन मेरिट व जेरेमी वॉरिनर..

ऑगस्ट २१ ला ११० मिटर्स हर्डल्समधे सर्व चायनाचे लक्ष असेल त्यांच्या लाडक्या.. अथेन्समधल्या सुवर्णपदक विजेत्या लु झिआंग वर... पण या वेळेला बहुतेक क्युबाचा डेरन रोबेल्स ही शर्यत जिंकेल.. पण शर्यत मस्त होइल... जरुर बघा..

८०० मिटर्समधे सुदानचा अबुबाकेर काकी.. फक्त १९ वर्षाचा... हा सुदानच्या दारफोर भागात जे चालले आहे.. त्याच्या दारूण पार्श्वभुमिवर... सुदानसाठी सुवर्णपदक मिळवुन.. सुदानला चांगले नाव मिळवुन देईल...

अमेरिकेचा बर्नार्ड लेगट १५०० मिटर्समधे बहुतेक जिंकेल..

५००० मिटर्स मधे इथियोपियाचे केनेसी बिकेला व तरिकु बिकेला या भावांकडे लक्ष असु द्या.. बहुतेक केनेसी बिकेला जिंकेल..

१०,००० मिटर्समधे परत एकदा इथियोपियाचेच धावपटु जिंकतील.. यात परत एकदा केनेसी बिकेला हॉट फेव्हरेट आहे व याच शर्यतीत आपल्याला इथियोपियाचा अजरामर.. हेली गेब्रसेलासी.. बहुतेक त्याच्या शेवटच्या ऑलिंपिक्समधे...वन लास्ट टाइम... बघायला मिळणार आहे.. तेव्हा तीही शर्यत बघाच..

महिलांमधे १०० मिटर्स हर्डल्स मधे अमेरिकेची लोलो जोन्स,२०० मिटर्समधे अमेरिकेची ऍलिसन फेलिक्स व ४०० मिटर्समधे अमेरिकेचीच सानिया रिचर्ड्स... अनस्टॉपेबल आहेत.. तर ५००० मिटर्समधे इथियोपियाची मेसरेट डेफर जिंकेल... तिला लढत असेल इथियोपियाच्याच मेस्लेक मेकामु व टिरुनेश डिबाबा यांची.. तर १०,००० मिटर्समधे लढत असेल इथियोपियाची टिरुनेश डिबाबा व त्यांच्याच मेस्टवेट टुफा या दोघीत... थोडक्यात काय... तर शॉर्ट डिस्टंसमधे अमेरिकन महिला पद्कांची लयलुट करतील तर दिर्घ पल्ल्यांच्या शर्यतीत इथियोपियन महिला..

पोल व्हॉल्टमधे रशियाची येलेना इझिनबायेव्हा(हिचा चेहरा मरिया शॅरापोव्हा सारखाच गोड आहे!) हिच जिंकेल.. तर उंच उडीत.. क्रोएशियाची ब्लांका व्ह्लासिक..

तर मंडळी.... या काही ठळक शर्यती मी बघण्याचा प्रयत्न करणार आहे.. तुम्हालाही या शर्यती व हे ऑलिंपिक्स बघण्यात आनंद मिळो हिच इच्छा... तर पुढचे २ आठवडे....एंजॉय द बैजिंग ऑलिंपिक्स!:)

तळटिपः सध्याच चायनामधे झालेल्या भूकंपातील प्रचंड जिवितहानीमुळे हे ऑलिंपिक्स बघताना त्यांचाही विचार मनात आल्याशिवाय राहणार नाही....

प्रकार: 

मुकुंद, छान लिहितोस, अगदी गप्पा माराव्यात इतक्या सहजतेने. ऑलिंपिक्सची गोडी नसलेल्या लोकांनाही एकदा तरी पाहावे असे वाटेल तुझे लेख वाचून. लिहीत राहा.

आत्ताच मी तुमचे सर्व लेख वाचले. तुमचा अभ्यास आणि लेखनशैली खुप भावली. त्यामुळे सहाजिकच उत्सुकता वाढली. या खेळांचं वेळापत्रक आणि भारतीय वेळेनुसार प्रसारण कोणत्या चॅनल्सवर याविषयी माहीती मिळेल का ?

अगदी अश्वीनी, मला पण विशेष माहीती नव्हती पण आता मी पण बघणार आहे, नाही तर बातम्या मधे जे दाखवतात ते तरी अजीबात सोडणार नाहीये.

मुकुन्द, तुम्हाला वेळ मिळेल तस ह्या ऑलिंपिक्स च्या शर्यतींच विश्लेषण कराल का?

मन्या जोशी.. भारतातल्या टिव्हीवर होणार्‍या ऑलिंपिक प्रक्षेपणाच्या वेळापत्रकाबद्दल मला माहीत नाही.. दिलगिर आहे.. पण अमेरिकेतल्या प्रक्षेपणाबद्दल तुम्हाला (एन बी सी ऑलिंपिक्स डॉट कॉम) वर डे बाय डे... व तास बाय तास... काय दाखवणार याची सखोल माहीती मिळु शकेल.. तसेच एन बी सी.... वेब वर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रक्षेपण करणार आहे.. तेव्हा त्यांच्या वेबसाइटवर जरुर टिचकी मारुन बघा....

अश्विनि..: ऑलिंपिक्स संपल्यावर बेसबॉल प्लेऑफ्स फार दुर नाहीत... मग फॉल व विंटरमधे तुमचे ब्रेडि आणि कंपनी आहेतच..:)

दिपाली.. वेळ मिळेल तसा जरुर प्रयत्न करीन....