अंतर

Submitted by मंदार-जोशी on 14 September, 2011 - 05:26

एरवी आपल्यातल्या अंतराला
नियतीची क्रूर चेष्टा
म्हटल्यावर...
"पार्ट ऑफ लाईफ आहे,
तक्रार नाही रे कसलीच"
असं धिटाईनं
समजावणारी तू

आणि आज.........
"आपण काय एकमेकांना
'एका हाकेवर' आहोत"
म्हटल्यावर....
भावनांचा हिशेब लगेच
किलोमीटरमधे मांडून
कुरकुरणारीही तूच

आपला प्रवास कायम
समांतर राहणार आहे
हे गृहितच धरलं आहेस का?

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 

@ निनाद
>>सुरेख. एकुणच साध्या नेहमी वापरातल्या शब्दांची कविता आणि विषय आवडला.

@ खारिक
>>एकदम साध्या मांडणीत खूप काही सांगून गेलास. मस्त!

@ अनघा_मीरा
>>वा, कमी शब्दात चांगल लिहीलय.

@ मनिमाऊ
तुझ्या कविता साध्या सरळ सोप्या पण आशयानी एकदम श्रीमंत असतात.

अनेक धन्यवाद. कवितेतले शब्द नेहमीच साधे-सोपे आणि नेहमीच्या वापरातले ठेवण्याकडेच माझा कल असतो. किंबहुना मला कठीण शब्द सुचतच नाहित असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. Happy
मने, तुला या कविता साध्या सोप्या आणि तरीही आशयाने श्रीमंत वाटणं हे सुद्धा माझ्या कवितेचं यश म्हणायला हवं.

अमित. यांनी एका चित्रपटातलं गाणं एकदा गप्पागोष्टींवर टाकलं होतं ते शेवटच्या कडव्याच्या संदर्भाने आठवलं:

हम तूम ट्रेन की दो पटरीयोंकी तरह
चलते रहे साथ साथ
मिलने की तमन्ना मे
दिल जानता, नही मिलेंगे
पर एक उम्मीद है
जो टुटती ही नही

आशय चांगला मांडला आहेस पण रचना थोडी लयबद्ध किंवा यमक प्रास जुळवता आले असते तर अधिक भावली असती...
(हेमावैम)

मंदारराजे,

कविता तसा माझा प्रांत नाही.

एखादा विचार जेंव्हा मनात येतो तेंव्हा लेखक तो विचार कोणत्या मार्गाने (गद्य,पद्य) व्यक्त करतो ही प्रक्रिया खरच आभ्यास करण्यासारखी आहे.

मला नेहमीच कवींचा हेवा वाटतो. येवढ्या कमी शब्दात आपण आपले विचार/प्रसंग/तगमग ठसठशीत मांडता.

खुपच छान कवीता.. दोन पार्ट मधेच सगळकाही... Happy

कळावे,
___मनस्वी राजन

@ मंदार.
सफाईदार आणि छान मांडणी. छान पोहोचवलंय सगळं Happy
हळूहळू स्वतःची अशी शैली डेव्हलप होतेय... भविष्यात कवीचं नाव न पाहताही सांगता येईल कविता कुणाची ते..

enticing Happy

Pages