या इथे कधीकाळी देखणे शहर होते

Submitted by छाया देसाई on 12 September, 2011 - 18:41

आटपाट नगराचे गोंदले बहर होते
या इथे कधीकाळी देखणे शहर होते

प्रेरणा न खचण्याची ,चेतना ,सजग गीता
उन्नतीस झटणारे जागते प्रहर होते

दिवस जात होते ,ते थकत होते तरीही
जिद्दिच्या खळाळाचे वाहते नहर होते

वाचताच त्याना मी ,ते धडे देत गेले
एक एक पान जणू मंत्रवत कहर होते

मायबाप गौरीहर ,लाभली दिव्य छाया
पार्वतीहरानेही पचवले जहर होते

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान....

आशयपूर्ण गझल.

ना जमीनजुमला ना बँकबँलन्स पण ते

कष्ट सोसत कष्टाचे ते धडे देत गेले
वाचले फक्त त्याना शब्द जे कहर होते

या ओळींमध्ये, वृत्त थोडे पहायला हवे असे वाटते, छायाताई. लहान तोंडी मोठा घास घेतेय.. माफ करा/.

छान !

दिवस जात होते, ते थकत होते तरीही
जिद्दिच्या खळाळाचे वाहते नहर होते

प्रेरणा न खचण्याची ,चेतना ,सजग गीता
उन्नतीस झटणारे जागते प्रहर होते

व्वा.
या शेराने "या इथे कधीकाळी देखणे शहर होते" ही ओळच धन्य झाली.
अशी काही विशेषतः असेल तरच त्या शहराची आठवण करायची गरज पडेल ना? Happy