Submitted by छाया देसाई on 12 September, 2011 - 18:41
आटपाट नगराचे गोंदले बहर होते
या इथे कधीकाळी देखणे शहर होते
प्रेरणा न खचण्याची ,चेतना ,सजग गीता
उन्नतीस झटणारे जागते प्रहर होते
दिवस जात होते ,ते थकत होते तरीही
जिद्दिच्या खळाळाचे वाहते नहर होते
वाचताच त्याना मी ,ते धडे देत गेले
एक एक पान जणू मंत्रवत कहर होते
मायबाप गौरीहर ,लाभली दिव्य छाया
पार्वतीहरानेही पचवले जहर होते
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान....
छान....
अजून छान होऊ शकते....वेळ
अजून छान होऊ शकते....वेळ आहे...!
शुभेछा!!!
छाया, आशय छान आहे पण एकदा
छाया, आशय छान आहे पण एकदा वृत्त तपासावेत. तीन ठिकाणी तरी गडबड झालेली आढळली. कृगैन.
छायाजी, मस्त गजल. प्रत्येक
छायाजी,
मस्त गजल. प्रत्येक शेरात कल्पना सुरेख.आवडली. वृत्त्भंगाबद्दल बेफिकीरजीशी सहमत.
आशयपूर्ण गझल. ना जमीनजुमला ना
आशयपूर्ण गझल.
ना जमीनजुमला ना बँकबँलन्स पण ते
कष्ट सोसत कष्टाचे ते धडे देत गेले
वाचले फक्त त्याना शब्द जे कहर होते
या ओळींमध्ये, वृत्त थोडे पहायला हवे असे वाटते, छायाताई. लहान तोंडी मोठा घास घेतेय.. माफ करा/.
छान आहे. बाकी जेष्ठांनी
छान आहे.
बाकी जेष्ठांनी सांगितले आहेच.
सर्वांचे आभार ,योग्य ते बदल
सर्वांचे आभार ,योग्य ते बदल केले आहेत.धन्यवाद.
छान तरही ...आवडली.
छान तरही ...आवडली.
छान !
छान !
दिवस जात होते, ते थकत होते
दिवस जात होते, ते थकत होते तरीही
जिद्दिच्या खळाळाचे वाहते नहर होते
प्रेरणा न खचण्याची ,चेतना ,सजग गीता
उन्नतीस झटणारे जागते प्रहर होते
व्वा.
या शेराने "या इथे कधीकाळी देखणे शहर होते" ही ओळच धन्य झाली.
अशी काही विशेषतः असेल तरच त्या शहराची आठवण करायची गरज पडेल ना?