पुण्यातील गणेश विसर्जन - मानाचे गणपती

Submitted by आशुचँप on 12 September, 2011 - 08:36

क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.. खूप धन्यवाद!! कधीकाळी मीही त्या मुलांसारखी लहान असताना जायचे आईबाबांबरोबर मिरवणुकीला.. Happy

Awesome Photo's. डोळ्यांचे पारणे फिटले.

शरु च्या दुसर्‍या प्र चि मधे तिने तुलाच पोझ दिलाय Wink

आशुचँप,
यावेळी आवर्जुन जाऊन एकही गणपती अथवा मिरवणूक पाहिली नाही, पण तुझ्या फोटोंच्या माध्यमातून मिरवणूकित प्रत्यक्ष सामिल झाल्याची अनुभुती आली.
सर्व फोटो अत्यंत सुरेख.. Happy

अप्रतिम क्षणचित्रे. इतक्या गर्दीत इतकी सुंदर क्षणचित्रे टिपायची म्हणजे एक दिव्यच असते.

जोश आणि कृपादृष्टी म हा न !

सुंदर...सुंदर...सुंदर....सुंदर...
आशिष , तुला ढीगभर धन्यवाद ! अप्रतिम फोटो आहेत सगळे.
घरबसल्या तिथला जोष अनुभवता आला.
" कृपादृष्टी" चा फोटो तर अवर्णनीय सुंदर आला आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद. Happy

मस्त फोटो आशुचँप. मी प्रतिसाद दिला होता की अगदी सेमटुसेम फोटो मी पण काढले आहेत व ते फेसबुकावर अपलोड केले आहेत. अगदी प्रत्येक फोटोला झब्बु देऊ शकेन. Happy गायब झाला पण माझा प्रतिसाद. Sad

सहिच रे मित्रा

पुण्याचि खुप आठवण येते या वर्षि पहिल्यान्दा मिस्स केला आहे. तुझे फोटो फारच छान् आहेत जमल्यास मन्डई चा फोटो टाक मला तो बाकि वेबसाईट वर मिळाला नाहि

आता अनंतचतुर्दशीला जगात इतर कुठेही असू नये असंच वाटतं.

नीधप - अगदी अगदी मनातलं बोललात...

बाप्पांच्या डोळ्यांचा क्लोज अप - पाणी आणतो रे डोळ्यात.....

फार सुंदर प्रतिसाद

लामणदिवा - रूट म्हणजे नक्की काय अपेक्षीत आहे

शरु च्या दुसर्‍या प्र चि मधे तिने तुलाच पोझ दिलाय
हाहाहाहाहा, अगदी अगदी....

कांदापोहे - बरे झाले मग मी घाई करून आधीच फोटो टाकले ते Happy
...येऊ द्यात तुमचे फोटो...मी वाट पाहतोय...

श्रषिबेला - मी नाही थांबलो मंडई येईपर्यंत...

सर्वांना खूप खूप धन्यवाद...
तुम्ही दिलेल्या या भरभरून प्रतिसादामुळे मी अगदी भरून पावलो आहे...

आशु, तुझे हे सर्व फोटो जसेच्या तसे ईमेल मधुन फिरत आहेत, तुझ्या नावाच्या उल्लेखाशिवाय. Sad

जिप्सी - होय रे...काय करणार आता...
फार वेदना होतात अशा वेळी....
Sad

अॅडमिन - या अशा प्रकारची चोरी रोखण्यासाठी आपल्याला काहीच करता येणार नाही का...अशाने माबोवर फोटो टाकणार्यांचे प्रमाण कमी कमी होत जाईल...
माझा देखील यापुढे कानाला खडा....
झाले ते फोटो शेवटचे...यापुढे मायबोलीवर फोटो टाकताना १०० वेळेस विचार करेन...

अॅडमिन - या अशा प्रकारची चोरी रोखण्यासाठी आपल्याला काहीच करता येणार नाही का...अशाने माबोवर फोटो टाकणार्यांचे प्रमाण कमी कमी होत जाईल... >>

अनुमोदन .. खरच यावर काहितरी ठोस उपाय करायला पाहिजेत ..

आशुचँप,
फार सुरेख फोटो आहेत..
नेटचोरी अवघड प्रकार आहे.. फोटोंवर वॉटरमार्क तरी टाक तुझ्या नावाचा... चांगला मध्यभागी टाक एडिट करता येणार नाही असा.

दिपांजली - मी बाकीच्या फोटोंवर टाकतो...पण माझी अशी धारणा आहे की बाप्पांच्या फोटोंवर वॉमा टाकणे फारच धाडसाचे...
किमान मला तरी ते पटत नाही....
अर्थात मग अशा वेळी प्रश्न येतो की मग आता कशाला रडतोयस...
तर त्याला माझे असे उत्तर आहे की - भले मी वॉमा टाकले नाहीत म्हणून काय ती कुणाचीही मालमत्ता झाली का..की दिसले फोटो आणि टाकले वाटून सगळ्यांना...
याला कुठेतरी आळा बसला पाहीजे ना...काही वेबसाईटवर राईट क्लिक करून सेव्ह करण्याचा ऑप्शनच बंद केलेला असतो...
तसे काही आपल्याला इथे करता येणार नाही का...
कारण मीच असे नाही आत्तापर्यंत अनेकांचे फोटो आणि लिखाण माबोवरून चोरीला गेले आहे...
आणि मला वाटतं की ही एक गंभीर बाब आहे आणि यावर काहीतरी तोडगा निघायलाच हवा...

मी आज पाहिले इतके सुंदर फोटो. दुसरा फोटो अफलातुन आहे. बाप्पांचा क्लोसप पण अप्रतीम!! ते जांभळ्या कुर्त्यामधले बाळ अतीगोंडस Happy .. धन्यवाद आशुचँप.

Pages