छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर-अनन्या

Submitted by विनार्च on 8 September, 2011 - 13:53

नाव - अनन्या

वय - ७ वर्षे

माझी मदत - तीच्या बरोबर कार्टून्स पहाणे
आवडते कार्टून कॅरॅक्टर अर्थातच "जेरी" कारण तो पण अनन्यासारखाच आहे "चीजखाव"

साहित्यः
DSCN0557.JPG
WORK IN PROGRESS!!
DSCN0560.JPG
जवळपास अर्ध्या पाऊण तासा नंतर हा आमचा जेरी तयार.
DSCN0595.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> रंग सगळेच मस्त. रंग कुठेही बाहेर नाही गेलाय.>> अगदी.. मस्तच काढलय. अनन्याला माझ्याकडून पैकीच्या पैकी मार्कस Happy

बाकी, पहिल्या फोटोत कागदाच्या उजवीकडे जे कॅरेक्टर आहे, ती ही लेकीचीच कलाकृती का?>>>>ललिता-प्रीती
हो ती ही अनन्याचीच करामत आहे.तीला डुडलींगची भारीच सवय आहे एकदा शाळेत घरचा अभ्यास जास्त दिला तर तीने त्याच्या बाजुला एक आग ओकणारा ड्रॅगन काढला आणि वर लिहिल "चल आता हा अभ्यास संपवून टाक हाsssहाssss"

झक्कास.

येस्स, सुपर्र्ब !
मस्त तर आहेच, पण ट्रेस वगैरे नाहि करतेत कोणी.
परिक्षकान्ना नम्बर काढणे अवघडच आहे Happy

सुंदर Happy

माफ करा विनार्च पण हे चित्र अनन्या काढलेले नाही.... तिने फक्त चित्र गिरवायचे छापायचे काम केले आहे..
२ नं फोटोत साफ दिसते आहे..कि कोणा मोट्या माणसाने चित्र काढुन अस्पष्ठ पुसलेले आहे..जेणेकरुन अनन्याला चित्र गिरवायला सोप्प जावे..

लहान मुलांना चित्र काढता यावी ह्यासाठी जवळ जवळ प्रत्येक पालक आशा स्वरुपाची क्लुप्ती करतात..
तुम्हीसुधा तेच केले आहात्..पण माझी मदत - तीच्या बरोबर कार्टून्स पहाणे
असे लिहिणे योग्य नाही....मुलांची प्रशंसा प्रतेक पालकाला आवडते..पण चुकिच्या प्रशंसेनेमुळे मुलांची शिकण्याची व मेहेनतीची इच्छा कमी होते..तुम्ही ति टाळावी...

माफ करा विनार्च पण हे चित्र अनन्या काढलेले नाही.... तिने फक्त चित्र गिरवायचे छापायचे काम केले आहे..
२ नं फोटोत साफ दिसते आहे..कि कोणा मोट्या माणसाने चित्र काढुन अस्पष्ठ पुसलेले आहे..जेणेकरुन अनन्याला चित्र गिरवायला सोप्प जावे..

लहान मुलांना चित्र काढता यावी ह्यासाठी जवळ जवळ प्रत्येक पालक आशा स्वरुपाची क्लुप्ती करतात..
तुम्हीसुधा तेच केले आहात्..पण माझी मदत - तीच्या बरोबर कार्टून्स पहाणे
असे लिहिणे योग्य नाही....मुलांची प्रशंसा प्रतेक पालकाला आवडते..पण चुकिच्या प्रशंसेनेमुळे मुलांची शिकण्याची व मेहेनतीची इच्छा कमी होते..तुम्ही ति टाळावी...>>>>>>>suja02
असले बिनबुडाचेटोकाचे आरोप करण्याआधी थोडा विचार करा. एका लहान मुलीच श्रेय तुम्ही हिरावताय.
तिला चांगली चित्र काढता यावीत या साठी आम्ही कोणतीही क्लुप्ती केलेली नाही.
ती कोणत्याही DROWING CLASSला ही जात नाही व आम्ही तीच्या चित्रासाठी तीला कोणती साधी
कल्पनाही पुरवत नाही. मुळात तीलाच ते आवडत नाही (अनन्याची चित्रकला विभागातील आधिची चित्रे पाहा). कार्टून्स पाहणे आम्हाला स्वत:लाही फार आवडत,त्यामुळे तो ही आरोप चुकिचाच.

Pages