'इगतपुरी' ट्रीप साठी माहिती हवी आहे

Submitted by रंगासेठ on 8 September, 2011 - 08:54

आम्ही मित्र मिळून 'इगतपुरी' ची एक दिवसाची ट्रीप करायची योजना बनवतोय. आम्ही पुण्याहून संध्याकाळी 'सिन्नर'ला बसने निघणार. रात्री सिन्नरला मुक्काम करणार. दुसर्‍या दिवशी सकाळी तिकडे एका मित्राला घेऊन इगतपुरीला फिरून त्याच दिवशी पुण्याला परत बसने (रात्री) येणार असा प्लॅन आहे.

तर इगतपुरीत एका दिवसात पाहण्यासारखी ठिकाणांबद्दल माहिती हवी आहे.
तसेच सिन्नर मध्ये कुणी कॅब भाड्याने देणारी कंपनी असेल तर त्याचीही माहिती हवी आहे. कारण पुण्याहून कॅब घेऊन ट्रीप करणे परवडणार नाही.

धन्यवाद.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इगतपुरीहुन साधारण ४०-५० किमी अंतरावरील भंडारदरा उत्तम ठिकाण आहे. Happy
(घोटी - सिन्नर मार्ग)

इगतपुरी जवळच धनुष्यतीर्थ धबधबा, विपश्यना केंद्र पाहण्यासारखे आहे.

कावनई, त्रिंगलवाडी हे एका दिवसात पाहण्यासारखे किल्लेही आहेत.

ईगतपुरीजवळ 'मानस' नामक एक रिसॉर्ट आहे. तिथे जेवायला जाता येइल. तिथल्या रेटस बद्द्ल कल्पना नाही. ईगतपुरीच्या आसपास ड्राईव्हला जाता येइल. मस्त आहे तो भाग. सध्या तर फारच सुंदर असेल सगळे. एक-दोन धार्मिक स्थळे पण आहेत पण डिटेल्स आठवत नाहीयेत. ईगतपुरीला असलेले विपश्यना केंद्र फक्त बघायला जाण्यासारखे आहे की नाही याची कल्पना नाही.
सिन्नरहुन तुम्हाला कॅब बहुदा नाही मिळणार पण तिथुनच एखादी गाडी भाड्याने घेऊ शकता.

जिप्सीने योग्य मार्गदर्शन केले आहे! भंडारदरा मस्तच आहे! आणि तुमच्या रस्त्यावर पण आहे. सिन्नर-घोटी-ईगतपुरी-सिन्नर्/नशिक-पुणे असा मार्ग ठरवता येइल.

इगतपुरी आणि खंडाळा या दोहोंची उंची साधारण सारखीच म्हणजे जवळपास १९०० फुट आहे.खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिदध झाले आहे,पण इगतपुरी म्हणजे रेल्वेचे मोठे जंक्शन या पलीकडे लोकांना इगतपुरीची विशेष माहीती नाही.खुद्द इगतपुरीत आणि जवळपास पाहण्यासारख्या अनेक जागा आहेत.

कसारा घाटा जवळ भातसा रिव्ह्रर व्हैली,उंट दरी,पाच धबधबे,घाट्नदेवीचे मंदीर अशी मस्त ठिकाणं आहेत.कसारा घाटातील धुकं अनुभवणं तर एक रोमांचकारी अनुभव असतो.तसंच इगतपुरी गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मगिरी हा मठ आहे.बौदधधर्मातील विपश्यना या ध्यानाच्या एका प्रकाराची साधना करण्यासाठी देशातील निरनिराळ्या भागातून,तसेच परदेशांतूनही अनेक लोक इथे येतात.

याखेरीज इगतपुरीत मुक्काम ठोकून आजूबाजूला पाहण्यासारख्या जागा म्हणजे अप्पर वैतरणा धरण - २६ कि.मी.,भंडारदरा - ३५ कि.मी.,खोडाळा - ३० कि.मी.,सुंदरनारायण गणेश मंदीर देवबांध- ३५ कि.मी. कि.मी.,याशिवाय कुलंग,अलंग,मदन,कळसूबाई,रतनगड या उत्तुंग आणि रौद्र डोंगररांगा तसेच अमृतेश्वर मंदीर,सांधन दरी,रंधा धबधबा या ठिकाणी जाण्यासाठी इगतपुरीत मुक्काम करणे सोयीचे ठरेल.