माझी कविता-९: मनपाखरू........

Submitted by डॉ अशोक on 7 September, 2011 - 07:31

या मनाचं सालं काही समजत नाही
जडल कुणावर काही उमगत नाही

लाल हिचे गाल कधी
लांब तिचे केसा कधी
घारे हिचे डोळे कधी
गोरा तिचा रंग कधी

भावल कुणाच काय नेमच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही

जाईल तिथं घात करील
दिसेल तिला डोळा मारील
ही आली, धड-धड झाली
चाल तिची तुडवून गेली

कुठ काय कधी होइल नेमच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही

आज पहा हिच्या प्रेमात
उद्या पहा तिच्या नादात
आज म्हणे "ही चांगली"
उद्या म्हणे "तीच बरी"

एकीवर पक्कं कधी बसताच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही

-अशोक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अप्रतिम कविता. Happy

प्रेम या शब्दाला आज जो सार्वजनीकरित्या अर्थ प्राप्त झालाय ना, त्याचे अगदी यतार्थ वर्णन उतरलेय कवितेत.

मनःपूर्वक आभार
प्रमोदजी....
मस्त चाल लावलीत कवितेला.
-अशोक

श्री बेफिकीर ....
या रचनेला "कविता आहे कां' हा प्र्श्न कशामुळे ते उमगले नाही. जरा विस्तारानं विचारलं तर सांगीन...