माझे १० वी चे वेळेचे नियोजन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आभ्यासापेक्षा मोकळीकच जास्त आहे. Happy
.

.
.

.
किती शब्द टाकावे लागतात आता. ईथे नंबर येत नाही.

विषय: 

Lol
माणसा, झोप आणि मोकळीक जास्त दिसतय वेळापत्रकात! मला आवडलेले म्हणजे महत्वाच्या मुद्द्यावर खुणा करणे-रेषा मारणे!!!
फार कष्ट पडलेत हो वाचतांना Light 1

महत्वाच्या मुद्द्यावर खुणा करणे-रेषा मारणे >>>
हे लै भारी माणसा Happy
मी पण एकदा वेळापत्रक बनवायचा विचार केला होता.. त्यात एकच नोंद होती.. वेळापत्रक बनवणे Happy

जब्बरी रे माणसा .. आपलं जुनं हस्ताक्षर ओळखता येत नाही ना ?

हायला, हे तुझे हस्ताक्षर आहे ? तु डावखुरा आहेस का ?
.
माझ्या नियोजनात उठुन आवरुन झाल्यावर १५ मिन. मांजरीशी खेळणे असायचे Wink

ए सिंड्रेला डावखुरा कशाला.. डावखुरा लोकांचं अक्षर छान असतं बर्का! .. निदान माझं आहे. Happy
माणसा, ते वेळापत्रक वाचण्यात जाम कष्ट पडले.. पण अफलातून आहे.. मोकळीक्,जेवण्,झोप हे किती महत्वाचे असते ना? माझ्या प्रत्येक टाईमटेबल मधे याच गोश्टी जास्त.. आणि तेव्हढ्याच करायला जमतात.. Biggrin
सही आहे.. माझंही असं वेळापत्रक सापडलं पाहीजे !

सही! तो टिपिकल वहीचा कागद आणि खाडाखोडी आणि अगदी पंधरा मिनिटांची अंतरं.. हे हे ..मजा आली वाचून. माझीही अशी टायम्टेबलं दर तीन दिवसांनी नव्याने बनायची: ))))

Happy
.
घरातले काहीतरी आवरत होते, त्यात माझी जुनी वही सापडली. तर लगेच हा फोटो काढुन पाठवला.
.
नाही मी डावखरा नाहीय. माझे अक्षर अजुनही असेच आहे, किंबहुणा ह्यापेक्षा बेकार झाले असेल आता. कारण गेल्या कित्येक दिवसात लिहील्याचे आठवत नाही.
.
.
लाईन मारणे लिहायचे होते, पण ते कुणी पाहील्यावर अर्थाचा गैरार्थ घेतला असता म्हणुन, रेषा मारणे. आणि English चे स्पेलींग येत नव्हते. म्हणुन Eग्रजी Happy

डावखुरा लोकांचं अक्षर छान असतं बर्का >>> मी कधी म्हंटले की माणसाचे अक्षर चांगले नाहीये Lol
माझ्या अगदी जवळच्या लोकांमधे चांगले आणि वाईट आणि जेमतेम वाचता येइल असे अक्षर असणारे तीन डावखुरे आहेत Happy
.
माणसा, आता project plan पण असाच बनवतोस का ? १ दिवस development मग २ दिवस मोकळीक Wink
.
आणि English चे स्पेलींग येत नव्हते. म्हणुन Eग्रजी >>> तु पाचवीत असताना अभ्यासाचं नियोजन करायचास म्हणजे महानच. पण सेम पिंच बरका....मला पण English चे स्पेलिंग यायचे नाही पाचवीत असताना Wink

तु पाचवीत असताना अभ्यासाचं नियोजन करायचास म्हणजे महानच. पण सेम पिंच बरका....मला पण English चे स्पेलिंग यायचे नाही पाचवीत असताना >>> पाचवी कुठून आली .. हे नियोजन तर दहावीतलं आहे ना?

BTW, माणसा, अभ्यास करताना कसली "मोकळीक" लागायची रे तुला? :p

हो की. तो english चे spelling येत नाही म्हणाला म्हणुन मला पाचवी आठवली. वेंधळेपणाचा बाफ कुठे आहे बरे ?

अहो हे १० वी चे timetable आहे. माझे इंग्रजी सुंदर होते तेव्हा.
.
बापरे!!! कसा काय मी post graduate झालो देवास ठावुक Happy
.
.
अभ्यास करताना कसली "मोकळीक" लागायची रे तुला? >>>> किशोर वयात लागते ती Wink

ही ही ही :), मी दरवर्षी वार्षिक परीक्षेचे टाइमटेबल लागले की मग धावतपळत असे वेळापत्रक करायला घ्यायचे. सगळा वेळ हेच मोजण्यात जायचा की किती दिवसात किती विषय, किती धडे, करायचेत आणि त्यावरुन परत नविन टाइमटेबल बनवण्यात. Proud
माणसा कसले रे ते सुवाच्य अक्षर तुझे (दामले मास्तरांचे वाक्य आठवतय खर तर मला इथे :)) आणि सव्वा दोन तास मुख्य मुद्द्यावर रेषा मारण्यासाठी Proud

बापरे. तुम्हा लोकांचे वाचुन मला जाम आश्चर्य, कौतुक वाटतय की तुम्ही वेळापत्रक तयार करायचात.
त्याच वेळेस ऐक वेगळीच् फिलींग येतेय की तुम्ही त्या वेळापत्रकात अडकलात. Happy मी कधीही वेळा पत्रक केले न्हवते.

माणसा लेका १० वितच रेषा माराचास का? आणि त्याच वेळेस फक्त? काय ट्युशन वैगरे होती का तेव्हां?

माझ्या नियोजनात उठुन आवरुन झाल्यावर १५ मिन. मांजरीशी खेळणे असायचे ................किती छान... मी पण असे करायचो.....

==============================================

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |

माणसा, लई म्हणजे लईच भारी!!!!!!!!
'आवरायला' पाऊण तास? Lol

माणसा, अणि प्रतिसाद देणारे, सर्वांना खूप खूप धन्यवाद जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल!!
माणसा, तुझ्या वेळापत्रकात टीव्ही नाही वाट्टं Proud माझे सापडले ना, तर त्यात आभाळमाया, टॉम & जेरी अशी नावेही मिळतील!! Lol
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
क्या मौसम आया है क्या मौसम आया है
गीत गाए नदीया बूँदो मे है सरगम..!!

अरे माणसा,
६ ला उठणे>> ६:४५ आवरणे>> ७:०० अभ्यासाचे नियोजन??? म्हणजे रे नक्की काय? Happy (येवढा वेळ मोकळीकच की..)
बाकी "मोकळीक" ह्या शब्दावर बरच प्रेम दिसतय? Biggrin
दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

अरे हे सर्व लिहिलंस मग मार्क किती मिळाले ते सांग ना Happy

१०वीत असे हस्ताक्षर आणि इन्ग्लिश चे स्पेलिंग येत नव्हते .. कायच्याकै !.. Happy
महत्त्वाच्या मुद्द्यावर खुणा करणे-रेषा मारणे!!! >>> Biggrin हे जबरी आहे.

Lol
अक्षर अविस्मरणिय आहे रे अगदी!

ही ही! (सगळ्यांच्या प्रतिक्रीयांसाठी Happy )

मला डॉक्टर व्हायचे होते, म्हणुन मी त्यांच्यासरखे लिहायचा प्रयत्न करायचो Happy ईतके वाईट अक्षर असुनही ७०-७२ का ७५% मिळाले होते १० वी मधे.

बहुतके अक्षर सुधारावे म्हणुनच ही दोन रेषांवाली वही घेतली होती. दोन ओळींमधे बसेल असे सुव्वाच्छ, सुबक मोत्यासारखे अक्षर यावे हा विचार होता. पण थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले, जर मी निट अक्षर काढले तर लिहीलेली उत्तरे किती चुकीची आहेत हे मास्तरांच्या लगेच लक्षात येईल. मग परत डॉक्टर लोकांसारखे लिहीणे सुरु केले. Happy

एका ओळीत ३ ते ४ रच शब्द कसे बसतील ह्याचा देखील सराव केला होता, म्हणजे जास्त पुरवण्या लावता येतात व उत्तरे मोठी मोठी वाटतात.

एका ओळीत ३ ते ४ रच शब्द कसे बसतील ह्याचा देखील सराव केला होता >>> बाप रे...जबरी मेहनत घेतलीस की Wink

माणसा, 'सुवाच्च'. पाचदा लिही! Happy

मृ. 'सुवाच्य' लिही बर आता १० वेळा Proud

आणि माणसा 'तोटे' लिही बर १० वेळा Happy
--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs

पाहीलेत ना नीट अक्षराचे टोते (ईथे दुष्परीणाम लिहायचे होते, पण ते स्पेलींग बरोबर आहे का नाही ते माहीत नाही.)

तोटे, दुष्परिणाम, पाहिलेत ना, इथे

>>तोटे, दुष्परिणाम, पाहिलेत ना, इथे

पाहिले, पाहिले Lol

सुवाच्य सुवाच्य सुवाच्य सुवाच्य सुवाच्य सुवाच्य सुवाच्य सुवाच्य सुवाच्य सुवाच्य...
थँक्यु शोनू! लिहिल्यावर जाणवलं, 'ये भी चुक्याच!'
माणसा, तुला 'शाणपणा' शिकवायला गेले आणि बघ... Happy

मस्तच माणसा. मी तर रोज नविन वेळापत्रक करायचे...कारण आधल्या दिवशी वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास झालेलाच नसायचा. मग काय re do... Happy

Pages