हट्ट गणेशबाळाचा..

Submitted by पुरंदरे शशांक on 7 September, 2011 - 01:43

हट्ट गणेशबाळाचा....

गणेशबाळाचा आईकडे एकच हट्ट
"मलाही सेलफोन" धरला पदर घट्ट

"चारी हातात तुझ्या काही ना काही
कसा धरणार सेल, काही कळतच नाही"

"पितांबराला ना खिसा, मग कुठे ठेवणार ?
एक हरवल्यावर लगेच दुसरा मागणार"

"सोंड आहेना ही, अशी कानाशीही नेईल
सेल धरायची माझी बघशीलंच स्टाईल..."

बर्थ डे च्या आधीच मिळाला की सेल
गणेशबाप्पांना आता नवीनच खेळ

"हॅलो कार्तिक, गणेश कॉलिंग.."
बाप्पांचे एकदम फुल शायनिंग

(ऐटीत कार्तिकला कॉल लावला
"टचस्क्रीन भारीच आणलाय मला" )

"सुखकर्ता दु:खहर्ता"...ची वाजली धून
चमकून बघतात तर आपल्याच सेलमधून

मोदक जेव्हा आठवले आरती रिंगटोन ऐकून
सेल टाकून बाप्पा धावले सोंड उंचाऊन

गुलमोहर: 

मस्तच

लेकीला वाचुन दाखवली...विशेष आवडलेले...

<<गणेशबाळाचा आईकडे एकच हट्ट
"मलाही सेलफोन" धरला पदर घट्ट

"चारी हातात तुझ्या काही ना काही
कसा धरणार सेल मला कळतच नाही">>

<<"सोंड आहेना ही, अशी कानाशीही नेईल
सेल धरायची माझी बघशीलंच स्टाईल...">>

<<ऐटीत कार्तिकला कॉल लावला
"टचस्क्रीन भारीच आणलाय मला">> ह्यात आधी 'मॉल' होते ना ती ओळ

आज मइत्रिणीच्या (दुहेरी मात्रा कशी टाकायची? सापडतच नाही Sad )वाढदिवसाच्या पार्टीत वाचून दाखवायचा प्लान आहे.

छान Happy

श्रद्धादिनेश -
<< ऐटीत लावला कार्तिकला कॉल
पण ते होते बिझी शोधत मॉल
>>
अशी ती ओळ होती.
सर्वांचे मनापासून आभार..........

हाऽ हाऽऽ
भारी आहे बाप्पाची गम्मत.