तुझ्या गळा, माझ्या गळा - विषय ३ : रतन टाटा आणि मुकेश अंबानी

Submitted by संयोजक on 5 September, 2011 - 05:48

मंडळी, तयार व्हा खेळ खेळायला... "तुझ्या गळा माझ्या गळा...."

सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक गमतीशीर खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन जोडीचे छायाचित्र दिले जाईल.
४. दिलेल्या जोडीच्या तोंडी संवाद घालायचे आहेत पण सगळे संवाद गाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजेत.
५. संवाद गळ्यात गळा घालून म्हटला आहे की एकमेकांचे गळे दाबत म्हटला आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
६. चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणी "मराठी किंवा हिंदी" असणे आवश्यक आहे.
७. संवादात केवळ धृवपद (किंवा त्या आधी काही चपखल बसणार्‍या ओळी असतील तर) देणे अपेक्षित आहे. कडव्यांच्या ओळी नसाव्यात. पूर्ण गाणे लिहू नये.
८. एका पात्राच्या तोंडी किमान एक आणि जास्तीत जास्त ५ गाणी घालू शकता. यापेक्षा जास्त नको. संवाद थोडक्यातच आटपलेला बरा, नाही का?
९. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन गीत संवाद देऊ शकत नाही.

*********************************************
Ambani vs Tata.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मुकेश अंबानी : आज मेरे पास पैसा है,शान है, शोहरत है, हर टाईप का बिझनेस है. तुम्हारे पास क्या है?

रतन टाटा : मेरे पास 'ईंडिका' है!

मुकेश अंबानी रतन टाटाला मुंबईतल्या आपल्या Altamount Road वरच्या घरी बोलावतो. पण बिल्डिंगचं काम अजून चालू असतं.

टाटा: उंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है, कैसे मै आऊ, दिल रजामंद है

मग मुकेशच खाली येतो.

मुकेशः पायो जी मैने राम रतन धन पायो

मुकेशचं घर पाहून टाटा इम्प्रेस होतात.

टाटा: एक घर बनाऊंगा तेरे घरके सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घरके सामने

यथावकाश त्याच रस्त्यावर पुढे टाटांचं घर बनतं.

मुकेशः घरसे निकलते ही कुछ दूर चलते ही रस्तेमे है उसका घर

.